Tuesday, April 24, 2018


 

अतिविशेष मिशन इंद्रधनुष्य अभियान जिल्हास्तरीय कार्यबल गटाची बैठक संपन्न

 

नांदेड,दि.24:- केंद्र शासनाने माहे एप्रिल, 2018 मध्ये ग्राम स्वराज अभियानातंर्गत राज्यातील 23 जिल्ह्यातील 192 गावांमध्ये अतिविशेष अतिविशेष मिशन इंद्रधनुष्य मोहिम (  Simi) कार्यक्रम हाती घेतला आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील 10 तालुक्यातील 20 गावातील एकूण 24 लसीकरण सत्रासाठी निवड करण्यात आली आहे, असे उपजिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कक्षात अतिविशेष मिशन इंद्रधनुष्य अभियान जिल्हास्तरीय कार्यबल गटाच्या आयोजित बैठकीत ते बोलत होते.

या बैठकीस जिल्हा परिषदेचे बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी एस. व्ही. शिंगणे, जिल्हा शिक्षण अधिकारी श्रीमती विद्या झिने, जिल्हा क्षयरोग अधिकारी शाम नागापूरकर, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. राजेंद्र पवार, युनिसेफच्या कन्सल्टंट डॉ. ज्योती पोतरे , डब्ल्युएचओ एसएमओ अमोल व्ही. गायकवाड,  जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी सुभाष खाकरे, जिल्हास्तरीय पर्यवेक्षक किरण रेपेकर, श्रीमती एम.एस. भरदम आदि विभागांचे विभाग प्रमुखांची यावेळी उपस्थिती होती.

उपजिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी म्हणाले की, अतिविशेष मिशन इंद्रधनुष्य अभियान कार्यक्रमातंर्गत एप्रिल ते जून, 2018 या तीन महिन्यात जिल्ह्यामध्ये राबविण्यात येणार आहे. एप्रिल, 2018 मध्ये            दि. 23, 24 व 26 एप्रिल रोजी अतिविशेष मिशन इंद्रधनुष्य मोहिमेचे नियोजन करण्यात आले आहे.

तसेच 10 तालुक्यातील उपकेंद्र, प्राआ केंद्र , तालुका आरोग्य अधिकारी, जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय पर्यवेक्षक यांचे एक दिवसीय प्रशिक्षण दिनांक 10 एप्रिल, 2018 रोजी घेण्यात आले आहे. दि. 11 एप्रिल, 2018 रोजी संबंधित 20 गावातील आरोग्य सेविका, आशा , अंगणवाडी कार्यकर्ती इत्यादींचे प्रशिक्षण उपकेंद्र , प्राआकेंद्र स्तरावर घेण्यात आले आहे. दि. 12 व 13 एप्रिल, 2018 रोजी निवडलेल्या गावांचा सर्व्हे , लसीकरणासाठी देय मातां आणि बालकांची यादी (ड्युलिस्ट ) तयार करण्यात आली आहे. त्यानुसार या गावांचा सुक्ष्म कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. दिनांक 23 , 24 व 26 एप्रिल, 2018 रोजी  शुन्य ते दोन वर्षातील 251 बालके व 59 गरोदर मातांना लसीकरणाद्वारे संरक्षित करण्यात येणार आहे. यासोबतच संबंधित गावांतील माता व बालकांची शंभर टक्के नोंदणी आरसिएच पोर्टलवर देण्यात असून , प्रत्येक लाभार्थ्यांना लसी दिल्यानंतर तात्काळ नोंदी करण्यात येणार आहेत.
          माहे एप्रिल ते जून, 2018 या कालावधीमध्ये घेणाऱ्या अतिविशेष मिशन इंद्रधनुष्य कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय कार्यबल गटाची बैठक दरमहा घेवून , या बैठकीत निवडलेल्या 20 गावांतील गरोदर माता व बालकांचे शंभर टक्के लसीकरणाद्वारे संरक्षण करण्याबाबत विविध शासकीय , अशासकीय विभागांचे सहकार्य घेणे तसेच कार्यक्रमाचे मुल्यमापन , आढावा व संनियंत्रण करण्याबाबत शासनाच्या सुचना आहेत.

जिल्हास्तरावर या मोहिमेच्या अनुषंगाने आवश्यक असलेली औषधी, साधनसामुग्री, मनुष्यबळ इत्यादींचे नियोजन करण्यात आले आहे. या मोहिमेची व्यापक स्तरावर प्रसिध्दी करण्यात येत आहे. तसेच जिल्हा व तालुकास्तरावरुन जिल्हास्तरीय अधिकारी व तालुकास्तरीय अधिकारी तसेच आरोग्य पर्यवेक्षकांमार्फत अतिविशेष मिशन इंद्रधनुष्य मोहिमेचे निकटचे संनियत्रण करण्यात येवून शंभर टक्के बालकांना व गरोदर मातांना लसीकरण करण्यात येणार आहे.

****

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...