Tuesday, April 24, 2018


आणिबाणीच्या कालावधीत बंदीवास / तुरुंगवास भोगलेल्या
व्यक्तींनी 2 मे पर्यंत माहिती सादर करण्याचे आवाहन     
नांदेड दि. 24 :- सन 1975 ते 1977 मधील आणिबाणीच्‍या कालावधीत ज्‍या व्‍यक्‍तींना बंदीवास / तुरुंगवास सोसावा लागला त्‍यांनी दहा मुद्यांच्या माहिती आवश्‍यक पुरावा कागदपत्रांच्या प्रमाणित प्रतीसह बुधवार 2 मे 2018 पर्यंत  कार्यालयीन वेळेत नांदेड जिल्‍हाधिकारी कार्यालयात सादर करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.
सन 1975 ते 1977 मधील आणिबाणीच्‍या कालावधीत लोकशाहीसाठी लढा देणाऱ्या ज्‍या व्‍यक्‍तींना बंदीवास / तुरुंगवास सोसावा लागला अशा व्‍यक्‍तींचा सन्‍मान / यथोचित गौरव करण्‍यासंबंधी धोरण ठरविण्‍याबाबत राज्याचे महसूल मंत्री यांचे अध्‍यक्षतेखाली मंत्रीमंडळ उपसमितीची बैठक घेण्‍यात आली. या बैठकीतील चर्चेच्‍या अनुषंगाने सन 1975 ते 1977 मधील आणिबाणीच्‍या कालावधीत ज्‍या व्‍यक्‍तींना बंदीवास / तुरुंगवास सोसावा लागला या संदर्भातील माहिती गोळा करण्‍याबाबत शासनाने सचना दिल्‍या आहेत.
माहिती सादर करावयाचे मुद्दे पुढील प्रमाणे आहेत. कारावास भोगलेल्‍या व्‍यक्‍तीचे नाव, पत्‍ता व दुरध्‍वनी क्रमांक
 ारूालयास. कारावास भोगलेली व्‍यक्‍ती हयात आहे किंवा मयत, मयत असल्‍यास मृत्‍यू दिनांक. बंदी स्‍वतः मयत असन त्‍यांची वारस पत्‍नी / पती हयात असल्‍यास त्‍यांचे नाव, पत्‍ता व दुरध्‍वनी क्रमांक. कारावास भोगलेल्‍या व्‍यक्‍तीचा संबंधीत कारागृहातील बंदी क्रमांक व कारागृहाचा तपशील. संबंधीत पोलीस स्‍टेशनचा तपशील व सि.आर क्रमांक / गुन्‍हा नोंदवही क्रमांक. अटक करण्‍यासाठी लावण्‍यात आलेली कलमे व अटक करण्‍याचे कारण. ज्‍या न्‍यायालयात खटला चालू होता त्‍या न्‍यायालयाचा तपशील. अटक केल्‍याचा दिनांक. सुटकेचा दिनांक. तुरुंगातील कालावधी. याप्रमाणे दहा मुद्यांची माहिती आवश्‍यक पुरावा कागदपत्रांच्‍या प्रमाणित प्रतीसह बुधवार 2 मे 2018 पर्यंत  संबंधीतांनकार्यालयीन वेळेत जिल्‍हाधिकारी कार्यालया सादर करावी, असेही आवाहन  केले आहे.  
00000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...