Wednesday, December 5, 2018


विद्यार्थ्यानी सकारात्म विचाराने परीक्षेला सामोरे जावे
- डि.वाय.एस.पी अश्विनी शेडगे
      
 नांदेड, दि. 5 :- स्पर्धा परीक्षेला सामोरे जातांना विद्यार्थ्यांनी सातत्य नियोजनपूर्वक अभ्यास  केल्यास यश हमखास मिळते, पण यासाठी स्वत:ला झोकू देऊन परीक्षेची तयारी करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन डि.वाय.एस.पी अश्विनी शेडगे  यांनी केले. त्या जिल्हा प्रशासनाच्यावतीने आयोजीत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना बोलत होत्या.
या शिबीराला संतोष ट्टमवार, कैलास तिडके  जिल्हा ग्रंथालय धिकारी आशिष ढोक यांची उपस्थिती होती. श्री. ट्टमवार यांनी गणित बुध्दीमता या विषयावर अभ्यासपुर्ण  असे मार्गदर्शन केले. तसेच महिला बालविकास अधिकारी श्री. तिडके यांनी या महिन्यात होणाऱ्या महिला बालविकास अधिकारी  परीक्षेबाबत मार्गदर्शन केले. प्रास्ताविक व्याखात्यांचा परिचय जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री. ढोक यांनी करुन दिला. सुत्रसंचालन आभार मुक्तिराम शेळके यांनी मानले. शिबिराचे यशस्वी आयोजनासाठी आरती कोकुलवार, बाळू पावडे, रघुव, संजय कर्वे, कोडिंबा गाडेवाड यांनी सहाय्य केले.

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...