Wednesday, August 9, 2023

  वृत्त क्र 491

 

आदिवासी विकासासाठी शासन कटिबद्ध

-  आमदार भिमराव केराम

 

नांदेड (जिमाका) दि. 9 :- भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण विविध उपक्रमाने साजरा केला. अनेक नाविन्यपूर्ण योजना राबविल्या. आपल्या नांदेड जिल्ह्यातील आदिवासी किनवट तालुक्यात दूर्गम भागात असलेल्या पिंपळशेंडा या गावाला रस्ता मिळाला. जनतेच्या आरोग्य सुविधांपासून ग्रामीण आरोग्य केंद्रामार्फत महिलांच्या आरोग्यावर भर दिला गेला. या सर्व योजना सक्षमतेने ग्रामीण भागापर्यंत शासन पोहचवित आहे. किनवट सारख्या आदिवासी बहुल तालुक्यात अती दुर्गम गावांना रस्त्याच्या सुविधा अजून चांगल्या प्रमाणात मिळणे आवश्यक असून शासन यासाठी पुढाकार घेईलअसा विश्वास आमदार भिमराव केराम यांनी व्यक्त केला.

 

जागतिक आदिवासी दिनानिमित्त एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवटच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या विशेष समारंभात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, प्रकल्प संचालक तथा सहाय्यक जिल्हाधिकारी कार्तीकेयन एसतहसिलदार डॉ. मुणाल जाधव, गटविकास अधिकारी पुरुषोत्तम वैष्णवप्रा. किशन मिराशे आदी उपस्थित होते.

 

आदिवासी समुदायापर्यंत शासनाच्या योजना प्रभावीपणे पोहचविल्या जात आहेत. शासनाच्या सर्व संबंधित यंत्रणांना योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिलेले आहेत. वनहक्क धारकांसाठी असलेल्या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत विनासायास पोहचला पाहिजेयाची खबरदारी घेण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले असल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले. या भागातील जे काही आवश्यक विकास प्रकल्प आहेत त्याला गती देण्याचे काम करूअसेही त्यांनी सांगितले.

 

याप्रसंगी आदिवासी सेवक नारायण सिडाम व  प्रा. किशन मिराशे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी आदिवासीतील गुणवंत विद्यार्थी, प्रगतशील शेतकरी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. न्यूक्लिअस बजेट मधून पारधी अदिवासी युवकांना स्वयंरोजगारासाठी उपलब्ध करून दिलेल्या चारचाकी वाहनाची चाबी मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली. शासकीय आश्रम शाळा किनवटच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत गाईले. प्रास्तविक नियोजन अधिकारी संदीप कदम यांनी तर प्रा. गजानन सोनोने यांनी सूत्रसंचालन केले. कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती तुपेकर यांनी आभार मानले.

 00000




 वृत्त क्र 490 

अस्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या

पालकांच्या मुलांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना     

 

नांदेड (जिमाका) दि. 9 :- अस्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. या योजनेचा पात्र विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावाअसे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आउलवार यांनी केले आहे. या योजनेत इयत्ता ली ते 10 वी वर्गात शिकणाऱ्या अनिवासी (वसतीगृहात न राहणारे) विद्यार्थ्यांना हजार रुपये वार्षिक शिष्यवृत्ती तसेच इयत्ता 3 री ते 10 वी  वर्गात शिकणाऱ्या निवासी (वसतीगृहात राहणाऱ्या) विद्यार्थ्यांना हजार रुपये वार्षिक शिष्यवृत्ती मंजूर केली जाते.  

 

ज्या विद्यार्थ्यांचे पालक अस्वच्छ व्यवसायात काम करतात अशा मुलांना या  योजनेंतर्गत शिष्यवृत्ती दिली जातेया योजनेचा उद्देश हा अस्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना आर्थिक सहाय्य देणे हा आहे. हाताने मेहतर काम करणाऱ्या व्यक्ती तसेच बंदिस्त व उघड्या गटाराची साफसफाई करणाऱ्या व्यक्तीअस्वच्छ व्यवसायाशी संबंध परंपरेने असलेले सफाईगारकातडी कमावणारे आणि कातडी सोलणारेकचरा गोळा करणे/उचलणेधोकादायक सफाई व्यवसायात काम करणाऱ्या व्यक्तीचा यात समावेश होतो.

   

राज्य शासनामार्फत मान्यता प्राप्त शाळांमधील विद्यार्थी हे या लाभासाठी पात्र असतील. या योजनेसाठी सर्व जाती धर्माचे विद्यार्थी हे पात्र असतील. या योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांना इतर कोणत्याही प्रीमॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेचा लाभ अनुज्ञेय असणार नाही. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज व आवश्यक कागदपत्रे त्वरित संबंधित शाळेमध्ये सादर करावे. शासनाच्या www.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर या योजनेचा शासन निर्णय दिनांक मार्च 2021 सोबत अर्जाचा विहित नमुना उपलब्ध करून देण्यात आला आहे.  

 

विद्यार्थ्यांनी अर्जासोबत अस्वच्छ व्यवसाय करीत असल्याबाबतचे प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र ग्रामपंचायत क्षेत्रात ग्रामसेवक व सरपंचनगरपालिका क्षेत्रात मुख्याधिकारी तर महानगरपालिका क्षेत्रात आयुक्त / उपायुक्त यांचे सादर करणे आवश्यक आहे.विद्यार्थ्यांची गतवर्षीचे गुणपत्रिकेची छायांकित प्रतअन्य कोणत्याही शिष्यवृत्तीचा लाभ घेतल्या नसल्याचे प्रमाणपत्रविद्यार्थी वसतीगृहात राहत असल्यास वसतीगृह अधिक्षकाचे प्रमाणपत्रबँक पासबुकची छायांकीत प्रतआधार कार्डची छायांकित प्रत व अपत्याचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.  

 

विद्यार्थ्यांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रे संबंधित शाळेमध्ये सादर केल्यानंतर संबंधित गटशिक्षणाधिकारी यांनी ते अर्ज व कागदपत्रे जिल्हा समाज कल्याण कार्यालयास सादर करण्यास दिरंगाई होणार नाही याची दक्षता घ्यावीअसेही आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आउलवार यांनी केले आहे.

00000 

 वृत्त क्र. 488 

आयटीआय उमेदवारांसाठी 11 ऑगस्ट रोजी भरती मेळाव्याचे आयोजन

 

नांदेड (जिमाका) दि. 9 :- औद्योगिक प्रशिक्षण संस्था हदगांव यांच्यावतीने 11 ऑगस्ट 2023  रोजी सकाळी वा. आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी शिकाऊ उमेदवारी भरती/रोजगार भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांनी या रोजगार मेळाव्यास उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्राचार्य फारुकी ए.डब्ल्यु यांनी केले आहे.

 

या मेळाव्यामध्ये सुझूकी मोटर्स गुजरात ही आस्थापना सहभागी होणार आहे. या मेळाव्यामध्ये 850 प्रशिक्षणार्थ्यांची भरती होणार आहे. आयटीआय. फिटरटर्नर वेल्डरइलेक्ट्रीशियन टुल ॲण्ड डायमेकरपीपीओमशिनिष्टट्रॅक्टर मेकॅनिकडिझेल मेकॅनिकमोटर मेकॅनिकपेंटर जनरलऑटोमोबाईल (सीओईया व्यवसायाच्या उत्तीर्ण उमेदवारांनी या कॅम्पस मुलाखतीमध्ये सहभागी व्हावे. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक 02462-222424 
मो.क्र. 9890439679  वर संपर्क साधावा, असे औद्योगिक प्रशिक्षण संस्था हदगांव यांनी कळविले आहे.

0000

 वृत्त क्र. 487

मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेअंतर्गत

अर्ज करण्याचे आवाहन करणेबाबत


नांदेड (जिमाका) दि. 9 :- राज्यात मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे योजना राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत जिल्हयात सन 2022-23  2023-24 या आर्थिक वर्षात एकूण 1 हजार 428 शेतकऱ्यांनी अर्ज केलेले आहेतयापैकी 654 अर्ज प्रक्रियेत असुन 369 शेतकऱ्यांना शेततळे खोदण्यासाठी पुर्व संमती देण्यात आलेली आहेतर 285 शेतकऱ्यांची लॉटरीत निवड होऊनही कागदपत्रे अपलोड केलेली नाहीततरी सर्व संबंधीत शेतकऱ्यांनी या योजनेत तात्काळ कागदपत्रे अपलोड करावेत जेणे करुन त्यांना पुर्वसंमती देता येईलतसेच या योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अर्ज करुन योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.


या योजनेअंतर्गत लाभार्थी पात्रता

अर्जदार शेतकऱ्याकडे स्वत:च्या नावावर किमान 0.40 हेक्टर क्षेत्र असणे आवश्यक, अर्जदार शेतकऱ्यांनी जमीन शेततळे खोदण्यास तांत्रीकदृष्टया योग्य असणे आवश्यक. अर्जदार शेतकऱ्यांनी यापुर्वी  मागेल त्याला शेततळेसामूहिक शेततळे अथवा भात खाचरातील बोडी किंवा इतर कुठल्याही शासकिय योजनेतून शेततळे या घटकाकरिता शासनाच्या अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा.


लाभार्थी निवड 

 मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे या घटकासाठी उपलब्ध अनुदानाच्या प्रमाणात संगणकिय प्रणालीतून होणाऱ्या सोडती नुसार लाभ देण्यात येईल.


अर्ज सादर करण्याची पध्दत 

महाडीबीटी पोर्टलचे http://mahadbtmahit.gov.in  या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावा. शेतकरी स्वत:चा मोबाईलसंगणकलॅपटॉप्टॅबलेटसामुदायिक सेवा केंद्र (सीएससी), ग्रामपंचायतमधील संग्राम केंद्र यासारख्या माध्यमातून संकेतस्थळावर जाऊन अर्ज करु शकतील.


शेततळयासाठी आकारमान 

मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेअंतर्गत्‍ विविध आकारमानाच्या शेततळयासाठी कमाल मर्यादा 75 हजार रुपये रकमेच्या मर्यादेत अनुदान देय राहीलतपशिल सोबत देण्यात येत आहे.


शेततळयाच्या अनुदानाची रक्कम आकारमानानुसार निश्चित करण्यात आली आहेतथपि देय अनुदानाची कमाल रक्कम रुपये 75 हजार रुपये इतकी राहीलरक्कम 75 हजार रुपयापेक्षा जास्त खर्च झाल्यास हा अतिरिक्त खर्च संबधित लाभार्थ्याने स्वतकरणे अनिवार्य राहील. अर्ज करण्यासाठी जवळच्या सेतू सुविधा केंन्द्रगावातील कृषि सहाय्यकतालुका कृषि अधिकारी यांचेशी  संपर्क साधावा असे कृषि विभागाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

00000


 वृत्त क्र. 486 

जिल्ह्यात युरिया खताचा मुबलक साठा उपलब्ध,

शेतकऱ्यांनी आवश्यकतेनुसार खरेदी करावी

नांदेड (जिमाका) दि. 9 :- जिल्ह्यास माहे जुलै व ऑगस्ट महिन्यात युरिया खताची मागणी वाढत असल्यामुळे जिल्ह्यात 21 हजार 779 मे. टन युरिया खताचे पुरवठा नियोजन प्राप्त झाले आहे. त्यानुसार सध्या विविध कंपनीचे 23 हजार 503 मे. टन युरिया खताच्या रॅक प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात युरिया खताचा मुबलक साठा उपलब्ध असून शेतकऱ्यांना युरिया खताची टंचाई भासणार नाही यांचे नियोजन केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी गरजेनुसार युरिया खताची खरेदी करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी यांनी केले आहे.

जिल्ह्यास युरिया खत आवश्यकतेनुसार उपलब्ध आहे व पुढे सुध्दा उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांनी तेलवर्गीय सोयाबीन पिकास युरिया खताचा वापर टाळावा. सोयाबीन हे तेलवर्गीय पिक असल्यामुळे पिकांच्या मुळावर उपलब्ध असलेल्या गाठी हवेतील नत्र शोषण करुन पिकास नत्र उपलब्ध करुन देतात. त्यामुळे सोयाबीन पिकास युरिया खताचा वापर टाळून पिकाची अनावश्यक वाढ थांबवता येईल. त्यामुळे  खर्चात बचत होऊन उत्पादनात वाढ होईल. अमोनियम सल्फेट ज्यामध्ये नत्र 20.6 सल्फर 23 टक्के असणाऱ्या खताचा पर्याय म्हणून वापर केल्यास पिकास हळूहळू अमोनियम सल्फेट मधील नत्र उपलब्ध होईल व पिकास सल्फरची कमतरता भासणार नाही. तसेच जिल्ह्यात नॅनो युरिया उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी युरिया खताचा पर्याय म्हणून नॅनो युरिया खताचा वापर केल्यास युरिया खतामुळे कमी होणारी जमिनीची पोत टाळता येईल व पिकाना त्वरीत वेळेवर नत्र उपलब्ध होईल. तरी शेतकऱ्यांनी पिकाच्या गरजेनुसार व कृषि विद्यापीठ शिफारस मात्रेनुसारच पिकास युरिया खताचा वापर करावा, असे कृषि विकास अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

वृत्त क्र. 485

 

कंजंक्टिवायटिसपिंक आय आजार पसरू नये

यासाठी नागरिकांनी काळजी व दक्षता घ्यावी

-         मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल

 

नांदेड (जिमाका) दि. 9 :-  कंजंक्टिवायटिस, पिंक आय (Pink Eye) या आजाराची साथ पसरु नये यासाठी जिल्‍हा प्रशासन सर्वतोपरी दक्षता घेत आहे. सर्व आरोग्‍य संस्‍थांना मुबलक प्रमाणात औषधी उपलब्‍ध करुन देण्‍यात आली आहे. नागरीकांनी स्‍वतःची काळजी व दक्षता घेऊन, आजारास प्रतिबंध करावा. या आजाराची लक्षणे दिसल्यास नजिकच्‍या आरोग्‍य संस्‍थेत जाऊन तात्‍काळ उपचार घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केले आहे.

सध्‍या मान्‍सून कालावधी चालू असून, पावसाळ्याचे दिवस आहेत.  वातावरणातही शीघ्र बदल होत आहेत. अशा या वातावणात डोळे आलेले कंजंक्टिवायटिस या आजाराच्‍या रुग्‍णांची संख्‍या वाढलेली दिसत असून येत आहे. नांदेड जिल्‍हयातही असे रुग्‍ण आढळून येत आहेत. कंजंक्टिवायटिसचा संसर्ग प्रामुख्याने वातावरणामध्ये बदल झाल्याने होतो. बॅक्टेरिया किंवा वायरस सारख्या सूक्ष्म जीवाणूंमुळे हा आजार फैलावतो. डोळ्यांच्या आजाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

कंजंक्टिवायटिसज्याला पिंक आय डोळे येणे असे देखील म्हणतात. या आजारात कंजंक्टिवा (नेत्रश्लेष्मला) म्हणजेच डोळ्याच्या पांढऱ्या भागावरती असलेल्या पातळ ऊतींची आणि पापणीच्या आतल्या बाजूस दाह होण्याची शक्यता असते.

आजार कुणालाही होऊ शकतो. संवेदनशीलता डोळ्यांची योग्य ती काळजी घेतल्यास आणि डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास यामुळे होणाऱ्या दूरगामी समस्या टाळता येऊ शकतात. हा संसर्ग प्रामुख्याने वातावरणामध्ये बदल झाल्याने होतो आणि बॅक्टेरिया किंवा वायरस सारख्या सूक्ष्म जीवाणूंमुळे हा आजार पसरतो.

कंजक्टिवायटिसची लक्षणे :

कंजंक्टायवायटिस (नेत्रश्लेष्मला) वरती सूज येणे, डोळ्याचा पांढरा भाग किंवा डोळ्यांचा पापणीचा आतील भाग लाल होणे, डोळ्यांची आग होणे आणि खाज सूटणे, धुसर दृष्टी आणि प्रकाशाप्रती संवेदनशीलता, डोळ्यातून स्राव येणे.

कंजंक्टिवायटिसचा प्रतिबंध करण्याकरिता सूचना:

स्वच्छता राखणे जसे नियमित पणे हात धुवावे आणि डोळ्यांना सारखा हात लावणे टाळावे, टॉवेल किंवा रूमाल एकमेकांचा वापरू नये, उशीची खोळ नियमित पद्धतीने बदलावी, डोळ्यांची सौंदर्य प्रसाधने किंवा डोळ्यांची काळजी घेणाऱ्या वस्तू  एकमेकांच्या वापरू नये.

 

कंजंक्टिवायटिस झाल्यास घ्यावयाची काळजी

संपूर्ण विलगनासह घरी राहून विश्रांती घ्यावी त्यामुळे आजाराचा प्रादुर्भाव टाळता येऊ शकेल. आपला टॉवेल किंवा रूमाल कुणालाही वापरायला देऊ नये. आपले कपडे वेगळे धुतले जातील याची काळजी घ्यावी. लक्षणे दिसून आल्यास स्वतःच्या मनाने औषध घेऊ नये नेत्रतज्ञांचा सल्ला घ्यावा,

संसर्ग जाई पर्यंत दररोज उशीची खोळ बदलावी. संसर्ग झालेला डोळा बोटाने चोळू नये. आवश्यक असल्यास टिशुचा वापर करावा. डोळ्यावर आवरण किंवा डोळा. झाकू नये. त्यामुळे संसर्ग बळावू शकतो. डोळ्यात धूळ जाण्यापासून किंवा काही जाण्‍यापासून जपावे त्‍यामूळे स्‍त्रास वाढू शकतो.

आजारावर योग्य तो उपचार घेणे महत्वाचे असते यामुळे डोळ्याच्या पडद्याच्या संसर्गाची तीव्रता कमी होते आणि दृष्टीवरती होणारी पुढील गुंतागुंत टाळता येऊ शकते. डोळ्यातून येणारा कोणताही स्त्राव स्टराईल वाईपच्या मदतीने पुसावा. हा आजार प्रामुख्याने एका व्यक्तिकडून दुसऱ्या व्यक्तिकडे सहज पसरू शकतो. पण योग्य वेळेला निदान झाल्यास काही चिंता नाही. हा आजार फक्त शरीर संपर्काद्वारे आणि स्‍त्राव संपर्काद्वारे फैलावू शकतो. जर तुम्हाला या संबंधित काही लक्षणे दिसल्यास नजिकच्‍या आरोग्‍य संस्‍थेत जाऊन उपचार घ्यावा असे जिल्हा आरोग्‍य अधिकारी डॉ.बालाजी शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

 वृत्त क्र. 489

 

स्वातंत्र्याचे मूल्य ओळखून लोकसहभागाच्या

कर्तव्याचेही पालन आवश्यक 

- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

 

· मेरी माटी मेरा देश’ व जागतिक आदिवासी दिनानिमित्त तेलंगणाच्या काठावर आदिवासी मांडवीत जागर  

· जनतेच्या आरोग्याला सशक्त करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात आयुष्यमान भारत कार्ड कॅम्प

 

नांदेड (जिमाका) दि. 9 :- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करुन आपण आता सांगते कडे वळलो आहोत. एक देश म्हणून आपण प्रगतीचे विविध टप्पे पार करताना आता नागरिक म्हणून आपल्या हक्कासह कर्तव्याचे अधिक सजग भान ठेवले पाहिजे. अतिदुर्गम भागातीलडोंगर-दऱ्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या माणसालाही विकासाच्या प्रवाहात येता आले पाहिजे. यादृष्टीने शासनाने अनेक कल्याणकारी योजना हाती घेतल्या आहेत. यातील आरोग्याच्या दृष्टीने प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना या अत्यंत महत्वाच्या आहेत. यासाठी प्रत्येकाजवळ कार्ड असणे आवश्यक असून ते प्रत्येकाला मिळावे यासाठी आम्ही कटिबध्द असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.

 

मेरी माटी मेरा देश’ व जागतिक आदिवासी दिनानिमित्त तेलंगणाच्या काठावर असलेल्या मांडवी येथे आयोजित प्रधानमंत्री आयुष्यमान कार्ड वाटप शिबिरात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवालप्रकल्प संचालक तथा सहाय्यक जिल्हाधिकारी कार्तीकेयन एसमांडवीच्या सरपंच श्रीमती सुमनबाई पेंदोरजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

प्रत्येक व्यक्तीचे आरोग्य चांगले राहावे यासाठी शासनाने गावपातळीवर आरोग्य यंत्रणा भक्कम करण्यावर भर दिला आहे. प्रत्येक गोरगरीब लाभार्थ्यांना आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या तर त्यांना मोफत उपचार घेता यावेत यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री जन आरोग्य योजना हाती घेतली. महाराष्ट्र शासनाने महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना प्रभावीपणे राबविण्यावर भर दिला आहे. लाख रुपयांपर्यतचे उपचार आता या योजनेअंतर्गत मोफत मिळणार आहेत. यासाठी गावपातळीवर जनजागृतीची मोठी चळवळ निर्माण झाली पाहिजे असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले. यादृष्टीने जिल्हा परिषदने जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून मांडवी सारख्या अतिदुर्गम आदिवासी गावात आयुष्यमान कार्ड वितरणासाठी भव्य प्रमाणात उपक्रम यशस्वी केल्याबद्दल त्यांनी जिल्हा परिषदेचे कौतूक केले. 

 

लोकशाहीच्या सशक्तीकरणासाठी प्रत्येक नागरिकाची सकारात्मक भूमिका आवश्यक असते. यासाठी मतदान प्रक्रियेतील प्रत्येक नागरिकांचा सहभाग हा प्रत्येकाच्या कर्तव्याचा भाग आहे. आपली कर्तव्य ओळखून त्यांच्या पालनासाठी परस्परात सौहार्दता निर्माण करण्यासाठी अधिक सजग राहीले पाहिजेअसे त्यांनी स्पष्ट केले. 

 

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानंतर आता अमृतकाळ सुरु झालेला आहे. हा अमृतकाळ प्रत्येक नागरिकाच्या कर्तव्याचाजागरुकतेचा आहे हे आपण विसरता कामा नये. या अमृत काळात प्रत्येक व्यक्तीला आरोग्याची हमी मिळावी त्यांना उपलब्ध असलेल्या महत्वपूर्ण आरोग्याच्या योजनाचा लाभ घेता यावा यादृष्टीने मांडवी येथे आदिवासीसाठी हा विशेष कॅम्प घेतल्याचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी सांगितले. सर्व सामान्यांच्या आरोग्य उपचारासाठी ही चांगली योजना आहे. या योजनेबाबत नागरिकांनी अधिक माहिती घेवून ही योजना समजून घेतली पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या शिबिरात 200 व्यक्तींना जन आरोग्य कार्डचे वाटप करण्यात आले. नव्याने ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी यावेळी शिबिरात सेवा केंद्रातील विशेष टिम ठेवण्यात आली होती. यावेळी आदिवासी समाजातील विशेष योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.

 

किनवट तालुक्यातील दिग्रस येथे

‘मेरी माटी मेरा देश’ अंतर्गत शिला फलकाचे अनावरण 

किनवट तालुक्यातील दिग्रस येथे ‘मेरी माटी मेरा देश’ कार्यक्रमातर्गंत ग्रामपंचायतीतर्फे उभारण्यात आलेल्या शिलाफलकाचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवालगट विकास अधिकारी पुरुषोत्तम वैष्णवसरपंच श्रवण मिरासेउपसरपंच नर्मदाबाई साबळे व जेष्ठ नागरिक उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी पंचप्राण शपथ दिली.

00000






 लक्षवेध :नांदेड जिल्ह्यातील विधानसभा निहाय मतदानाची अंदाजीत अंतिम आकडेवारी लक्षवेध : नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीतील अंदाजीत अंतिम आकडेवारी वि...