Wednesday, August 9, 2023

  वृत्त क्र 491

 

आदिवासी विकासासाठी शासन कटिबद्ध

-  आमदार भिमराव केराम

 

नांदेड (जिमाका) दि. 9 :- भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण विविध उपक्रमाने साजरा केला. अनेक नाविन्यपूर्ण योजना राबविल्या. आपल्या नांदेड जिल्ह्यातील आदिवासी किनवट तालुक्यात दूर्गम भागात असलेल्या पिंपळशेंडा या गावाला रस्ता मिळाला. जनतेच्या आरोग्य सुविधांपासून ग्रामीण आरोग्य केंद्रामार्फत महिलांच्या आरोग्यावर भर दिला गेला. या सर्व योजना सक्षमतेने ग्रामीण भागापर्यंत शासन पोहचवित आहे. किनवट सारख्या आदिवासी बहुल तालुक्यात अती दुर्गम गावांना रस्त्याच्या सुविधा अजून चांगल्या प्रमाणात मिळणे आवश्यक असून शासन यासाठी पुढाकार घेईलअसा विश्वास आमदार भिमराव केराम यांनी व्यक्त केला.

 

जागतिक आदिवासी दिनानिमित्त एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवटच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या विशेष समारंभात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, प्रकल्प संचालक तथा सहाय्यक जिल्हाधिकारी कार्तीकेयन एसतहसिलदार डॉ. मुणाल जाधव, गटविकास अधिकारी पुरुषोत्तम वैष्णवप्रा. किशन मिराशे आदी उपस्थित होते.

 

आदिवासी समुदायापर्यंत शासनाच्या योजना प्रभावीपणे पोहचविल्या जात आहेत. शासनाच्या सर्व संबंधित यंत्रणांना योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिलेले आहेत. वनहक्क धारकांसाठी असलेल्या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत विनासायास पोहचला पाहिजेयाची खबरदारी घेण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले असल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले. या भागातील जे काही आवश्यक विकास प्रकल्प आहेत त्याला गती देण्याचे काम करूअसेही त्यांनी सांगितले.

 

याप्रसंगी आदिवासी सेवक नारायण सिडाम व  प्रा. किशन मिराशे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी आदिवासीतील गुणवंत विद्यार्थी, प्रगतशील शेतकरी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. न्यूक्लिअस बजेट मधून पारधी अदिवासी युवकांना स्वयंरोजगारासाठी उपलब्ध करून दिलेल्या चारचाकी वाहनाची चाबी मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली. शासकीय आश्रम शाळा किनवटच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत गाईले. प्रास्तविक नियोजन अधिकारी संदीप कदम यांनी तर प्रा. गजानन सोनोने यांनी सूत्रसंचालन केले. कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती तुपेकर यांनी आभार मानले.

 00000




No comments:

Post a Comment

 लक्षवेध :नांदेड जिल्ह्यातील विधानसभा निहाय मतदानाची अंदाजीत अंतिम आकडेवारी लक्षवेध : नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीतील अंदाजीत अंतिम आकडेवारी वि...