Thursday, May 11, 2023

 जिल्हा उद्योग केंद्राच्या विविध सभांचे 16 मे रोजी आयोजन

नांदेड (जिमाका) दि.  11 :- जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयाच्या जिल्हा उद्योग मित्र समिती सभाजिल्हा सल्लागार समिती सभास्थानिक लोकांना रोजगारात प्राधान्य जिल्हास्तरीय समिती सभा व आजारी उद्योग पुनरुज्जीवन जिल्हास्तरीय समितीची सभा मंगळवार 16 मे 2023 रोजी दुपारी 4.30 वा. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे आयोजित करण्यात आल्या आहेत. संबंधितांनी या सभांना उपस्थित रहावेअसे आवाहन नांदेड जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांनी केले आहे.  

000000

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

 संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास

महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 11 :- संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत चर्मकार समाजाच्या (चांभार, मोची, ढोर व होलार) इ. व्यक्तींचा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी सन 2023-24 मध्ये राज्य शासनाच्या अनुदान व बिजभांडवल योजना राबविण्यात येत आहेत. तसेच ज्या लाभार्थ्यांनी यापूर्वी केंद्र शासनाच्या एन.एस.एफ.डी.सी. योजनेअंतर्गत कर्ज प्रस्ताव जिल्हा कार्यालयात दाखल केलेले असून ज्याची लाभार्थी निवड समिती झालेली आहे व जे परिपूर्ण कर्जप्रस्ताव जिल्हा कार्यालयामार्फत प्रधान कार्यालयास मंजूरीसाठी शिफारस करण्यात आलेली आहेत, अशा लाभार्थ्याची यादी महामंडळाच्या नोटीस बोर्डवर लावली आहे. संबंधित अर्जदारानी महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात संपर्क साधून कागदपत्र दाखल करावेत. अधिक माहितीसाठी महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक अरुण राऊत यांनी केले आहे.

0000

समस्याग्रस्त व पीडित महिलांसाठी 15 मे रोजी महिला लोकशाही दिन

 समस्याग्रस्त व पीडित महिलांसाठी

15 मे रोजी महिला लोकशाही दिन 

 

नांदेड, (जिमाका) दि. 11:-  समस्याग्रस्त व पिडीत महिलांसाठी सोमवार 15 मे 2023 रोजी महिला लोकशाही दिन आयोजित केला आहे. या लोकशाही दिनात समस्याग्रस्त व पिडीत महिलांनी आपले अर्ज विहित नमुन्यात सादर करावे, असे आवाहन जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी नांदेड व सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.  

 

दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन घेण्यात येतो. सोमवार 15 मे 2023 रोजी सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली महसूल प्रबोधनी प्रशिक्षण केंद्रजिल्हाधिकारी कार्यालय परिसरनांदेड येथे महिला लोकशाही दिन होणार आहे. संबंधीत समितीचे सदस्य व शासन निर्णयात नमूद संबंधित विभागाचे अधिकारी यांनी उपस्थित रहावे, असेही आवाहन सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000

 

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...