Saturday, March 28, 2020


कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी
समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती ; जबाबदारी निश्चित  
नांदेड, दि. 28 :-कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी प्रतिबंधात्‍मक उपायोजनेची अंमलबजावणीचे अनुषंगाने जबाबदारी सोपविण्याबाबत (समन्‍वय अधिकारी) नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रधान सचिव, सार्वजनिक आरोग्‍य विभाग मुंबई यांनी राज्‍य शासनाने कोरोना विषाणूचा (कोव्हिड 19) प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी राज्‍यात साथरोग  प्रतिबंधात्‍मक कायदा 1897 दि. 13 मार्च 2020 पासून लागू करुन खंड 2,3 व 4 मधील  तरतुदीनुसार दिनांक 14 मार्च 2020 अधिसुचना निर्गमित केली आहे. त्‍यामध्‍ये जिल्हाधिकारी यांना प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी जिल्हाधिकारी यांना ज्‍या उपायोजना करणे आवश्‍यक आहे त्‍या करण्‍यासाठी सक्षम प्राधिकारी म्‍हणून घोषित केले आहे.
या अधिसूचनेतील जिल्हाधिकारी यांना प्राप्त अधिकार व आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अधिनियम 2005 मधील अधिकारीचा वापर करून कोरोना विषाणूचा (कोव्हिड 19) प्रादुर्भाव रोखणे व यासंदर्भात केलेल्‍या उपायोजनेच्‍या अनुषंगाने सोपविण्‍यात आलेली जबाबदारी पार पाडण्‍यासाठी 5 मार्च 2020 च्या आदेशामध्‍ये  पुढील प्रमाणे सुधारित आदेश निर्गमीत करुन त्‍यामध्‍ये नमुद अधिकाऱ्यांची  नियुक्‍ती करण्‍यात आली आहे.
(कंसात अधिकाऱ्यांचे नाव व पदनाम व संपर्क क्रमांक) कंसाबाहेर सोपविण्यात आलेली जबाबदारी (अपर जिल्‍हाधिकारी खुशालसिंह परदेशी (प्रमुख)- 9822426859.जिल्हा परिषदेचे अतिरिक्‍त मुख्‍य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी,-8329053875, 8888400647.उपजिल्‍हाधिकारी (रोहयो) सदाशिव पडदुने-9890613907.)-विविध स्‍वंयसेवी संस्‍था यांचेशी समन्‍वय साधने व त्‍यांच्‍या मार्फत गरजूंना अत्‍यावश्‍यक सेवा पुरवित असल्यास त्‍याचे नियोजन व आयोजन.
(उपजिल्‍हाधिकारी (सामान्‍य) (प्रमुख) शरद मंडलीक 9403763111 9423255890. सुधीर ठोंबरे उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी जि.प.नांदेड 9689099888.)- नांदेड जिल्‍हयात आपत्‍कालीन परिस्थितीमध्‍ये अन्‍नधान्‍य व इतर भाजीपाला/ अशा जीवनाश्‍यक वस्‍तुंचा नियमित पुरवठा वाहतुक सुरळीत ठेवण्‍यासाठी समन्‍वय.
(प्रशांत शेळके, उपजिल्‍हा निवडणूक अधिकारी नांदेड (प्रमुख) 8975593542, व्‍ही.आर.कोंडेकर  उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी जि.प.नांदेड 9423306059, 7219419966) -नांदेड जिल्‍हयातील वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व आरोग्य विषयक बाबी. उपचाराकरीता आवश्‍यक असलेली विविध साधने व साहित्‍य यांचे तांत्रिक विनिदेष निश्चित करणे व खरेदीची उपाययोजना करणे. वैद्यकीय महाविद्यालयामधील विद्यार्थ्‍याना आवश्‍यकतेनुसार प्रशिक्षण देणे व त्‍यांचा आपत्‍कालीन परिस्थितीमध्‍ये उपयोग करुन घेणे. सेवानिवृत्‍त तज्ञ व अन्‍य तांत्रिक वैद्यकीय सेवा सलंग्न अधिकारी/ कर्मचारी यांची जास्‍तीत जास्‍त सेवा उपलब्‍ध करुन घेण्‍यासाठी नियोजन करणे. वैदयकीय उपचारासं?बंधी येणा-या सर्व  तक्रारी  / जिल्‍हा शल्‍य चिकीत्‍सक, जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी, वैदयकीय अधिकारी यांचे समन्‍वयाने.
(श्रीमती संतोषी देवकुळे, उपजिल्‍हाधिकारी भूसंपादन (लसिका), नांदेड  (प्रमुख) -9422961090, श्री एस.व्‍ही. शिंगणे जिल्‍हा कार्यक्रम अधिकारी (म.बा.क.) जि.प.नांदेड 9421519613.)-  कोरोना विषाणू संसर्ग झालेल्‍या व्‍यक्‍तींशी जवळच्‍या संपर्कात आलेल्‍या व्‍यक्‍तींची यादी नांदेड महानगर पालिका यांचेकडून प्राप्‍त करणे. महानगरपालिका यांचे कडून अॅब्‍युलन्‍स उपलब्‍ध करुन घेण्‍याबाबत समन्‍वय करणे. संबंधीत हॉस्‍पीटल मधून संबंधीत व्‍यक्‍तींची तपासणी करुन घेण्‍याबाबत समन्‍वय साधणे. विविध प्रयोगशाळांना कोरोना तपासणी विषयक नमुने पाठविण्‍यासाठी वाहना विषयी जिल्‍हा शल्‍य चिकीत्‍सक यांचेशी समन्‍वय साधने.वैद्यकीय अधिकारी, मनपा, जिल्‍हा शल्‍य चिकीत्‍सक, जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी व संबंधित तहसिलदार  यांचेशी समन्‍वयाने नांदेड शहर व तालूका स्‍तरीय अलगीकरण व विलगीकरण केलेल्या रुग्‍णांची दैनंदिन माहिती मा.विभागीय आयुक्‍त व शासनास सादर करावी.
(प्रसाद कुलकर्णी, तहसिलदार (सामान्‍य) जि.अ.का.नांदेड (प्रमुख) 7020436783. सुधीर पाटील
उप कार्यकारी अभियंता, प्र.ग्रा.स.यो.जि.प.नांदेड 9518717299,9923526530. व्‍ही.आर.पाटील उपजिल्‍हा कार्यक्रम संमन्‍वयक म.ग्रा.रो.ह.यो.जि.प.नांदेड 9588683681,9422170843.)- विलगीकरणकक्षकरणेवत्‍याचेनियमनकरणे यासंदर्भात शासनाच्‍या नविन सूचनांप्रमाणे वेगवेगळया देशातुन एअरपोर्ट वर आलेल्‍या प्रवासी यांची यादी प्राप्‍त करणे व संबंधीत यंत्रणेना पुढील कार्यवाही करिता उपलब्‍ध करुन देणे. नांदेड जिल्‍हा कार्यक्षेत्रातील गृह अलगीकरण सनियंत्रणासाठी नेमण्‍यात आलेल्‍या अधिकारी व कर्मचारी यांचेवर सनियंत्रण करणे. लॉकडाऊनच्‍या अनुषंगाने इतर विभागा कडून व जनतेकडून येणारी तक्रारी/ अडी अडचणीबाबत संबंधित विभागाशी समन्‍वय साधने. घर ते घर सर्व्‍हे करणेकरिता नियुक्‍त केलेल्‍या पथकाकडून सर्व्‍हे बाबतची माहिती प्राप्‍त करुन घेऊन नियत्रण कक्षास कळविणे. कोरोना संसर्गाच्‍या अनुषंगाने आवश्‍यकते नुसार इमारत अधिग्रहण करणे. शासनाने जाहीर केलेल्‍या LockDown कालावधीत इतर जिल्‍हयात अडकून पडलेल्‍या नांदेड जिल्‍हयातील रहिवाशी यांना येणा-या अडचणी/तक्रारी अनुषंगाने संबंधित जिल्‍हा/तालूका प्रशासनाशी समन्‍वय साधणे व आवश्‍यक कार्यवाही करणे. तसेच नांदेड जिल्‍हयातील एका तालुक्‍यातील रहिवाशी जे दुस-या तालुक्‍यात अडकून पडलेले आहेत अशा जिल्‍हयातील रहिवाशी यांना येणा-या अडचणी /तक्रारी अनुषंगाने संबंधित तालूका प्रशासनाशी समन्‍वय साधणे व आवश्‍यक कार्यवाही करणे.
(आर.व्हि.मिटकरी, सहाय्यक जिल्‍हा पुरवठा अधिकारी, नांदेड (प्रमुख) 9049107792. पालेपवाड उपअभियंता सा.बांधकाम विभाग नांदेड 9421870740)- आयसोलेशनवार्डमध्‍येसर्वसुविधा,चहा, पाणी, जेवण, पोलीसबंदोबस्‍त, अॅब्‍यूलन्‍स  याअनुषंगाने प्राप्‍त तक्रारीबाबत वेळोवेळी आवश्‍यक ती कार्यवाही करणे.जिल्‍हाधिकारी कार्यालयातील आस्‍थापना व  इमारत इत्‍यादी संदर्भात विषाणू संसर्गाच्‍या अनुषंगाने प्रतिबंधात्‍मक उपायोजना करणे. सर्व माहिती नियंत्रण कक्षाला कळविण्‍यात यावी.
(श्रीमती उज्‍वला पांगरकर, महसूल सहाय्यक, जि.अ.का.नांदेड (प्रमुख) 9921145745. यु.पी.यमलवाड शाखा अभियंता प्र.ग्रा.स.यो.जि.प.नांदेड 9244187330) विभागीय आयुक्त कार्यालयाशी समन्वंय ठेवण्यात यावा. भारत सरकार, महाराष्ट्र शासन व विभागीय आयुक्त यांचेकडील आदेश व सूचना  जिल्हाधिकारी यांना अवगत करणे. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी कार्यालय यांचेशी समन्वय ठेवणे व आवश्यक ती माहिती विभागीय आयुक्त कार्यालयास पुरविणे. वाहन अधिग्रहन व वाहतुक व्यवस्था. केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशा प्रमाणे विहीत नमुन्यातील अहवाल वरिष्ठ? कार्यालयाकडे पाठविणे बाबत आवश्यक ती कार्यवाही करणे.
(श्रीमती वैशाली पाटील, तहसिलदार (संगायो) जि.का. नांदेड (प्रमुख) 9563744771. श्री कोटलवार उपअभियंता सा.बांधकाम विभाग नांदेड 9960842084)- जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा शल्य चिकित्सक, आरोग्य विभाग शिक्षण विभाग यांचेशी समन्वय साधून कोरोना या संसर्ग आजाराचा नांदेड जिल्हयाध्ये जनजागृती प्रतिबंधात्मक उपाययोजना करणेबाबत आवश्यक ती कार्यवाही करणे.
(राजेंद्र चव्‍हाण, जिल्‍हा प्रशासन अधिकारी (न.पा.प्र.) जिल्‍हाधिकारी कार्यालय, नांदेड  (प्रमुख) 9423008591, श्रीमती मीरा ढास प्र.जिल्‍हा माहिती अधिकारी नांदेड)-  नांदेड महानगरपालिका हद्दीतील होम कॉरंनटाईन बाबत दिलेल्‍या मार्गदर्शक सूचनाचे अंमलबजावणी होते किंवा कसे याची खात्री करणे. याअनुषंगाने आवश्‍यक ती कार्यवाही करणे व दैनंदिन माहिती नियंत्रण कक्षास देणे. वेळोवेळी प्राप्‍त, निर्गमीत सुचना,आदेश जिल्‍हा माहिती अधिकारी यांना प्रसिदधीसाठी कळविणे व मिडीया सेंटर प्रमुख म्‍हणून जबाबदारी पार पाडणे.
(प्रफुल्‍ल कर्णेवार, जिल्‍हा सूचना विज्ञान अधिकारी, नांदेड (प्रमुख) 9422962885,प्रदीप डुमणे
सहा.जिल्‍हा सूचना विज्ञान अधिकारी, नांदेड)- जिल्‍हा प्रशासनाच्‍या अधिकृत संकेतस्‍थळावर, twitter handle, facebook page इ. वर कोरोनाच्‍या विषयावर संसंर्गाच्‍या अनुषंगाने आवश्‍यक ती माहिती वेळोवेळी अद्ययावत करणे.  Media Monitoring and management बाबत आवश्‍यक ती कार्यवाही करणे.
(प्रविण फडणीस, जिल्‍हा उपनिबंधक सहकारी संस्‍था नांदेड(प्रमुख) 8275055275, श्रीमती शुभांगी गोंड तालका निबंधक नांदेड 7588632955)- शासनाने जाहीर केलेल्‍या LockDown कालावधीत बॅंक/ वित्‍तीय संस्‍था/ कृ..बा./ खरेदी विक्री संघ . तत्‍सम संस्‍था यांना येत असलेल्‍या अडचणी किंवा त्‍यासंबधाने प्राप्‍त तक्रारी बाबत समन्‍वय साधणे आवश्‍यक कार्यवाही करणे.
(अविनाश  राऊत, उपप्रादेशीक परिवहन  अधिकारी,  नांदेड (प्रमुख) 9822246023.राहूल जाधव सहा.प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड 8275592700) - शासनाने जाहीर केलेल्‍या LockDown कालावधीत वगळण्‍यात आलेल्‍या अत्‍यावश्‍यक सेवांच्‍या निगडीत आंतरराज्‍य वाहतुक संबंधाने  येणा-या अडचणी /तक्रारी अनुषंगाने प्रादेशिक परिवहन विभाग यांच्‍याशी समन्‍वय साधणे आवश्‍यक कार्यवाही करणे. तसेच शासनाने जाहीर केलेल्‍या LockDown कालावधीत वगळण्‍यात आलेल्‍या अत्‍यावश्‍यक सेवांच्‍या निगडीत आंतरजिल्‍हा /तालूका वाहतुक संबंधाने  येणा-या अडचणी / तक्रारी सोडविणे  अत्‍यावश्यक  वाहतुकीसाठी  Passes ची  व्‍यवस्‍था   करणे.
(डॉ.सचिन खल्‍लाळ, निवासी उपजिल्‍हाधिकारी नांदेड 9619822866, 02462-248418. श्री संजय बिरादार तहसिलदार सर्वसाधारण जि.का.नांदेड  8788006783)- नांदेड जिल्‍हयातील कायदा सुव्‍यवस्‍थेची कामे करणे. कायदा सुव्‍यवस्‍थेसंबंधी शासनाकडून प्राप्‍त होणा-या निर्देशानुसार वेळोवेळी जिल्‍हाधिकारी यांचे मान्‍यतेने आदेश निर्गमित करणे. 3) उपविभागीय दंडाधिकारी/तालका दंडाधिकारी तसेच पोलीस प्रशासनासमवेत समन्‍वयाची कामे. कोरोना विषाणू संसर्गाच्‍या अनुषंगाने सर्वसाधारण नियंत्रण ठेवून आवश्‍यक ती कार्यवाही पार पाडणे. जिल्‍हाधिकारी कार्यालयातील चालू असलेले नियंत्रण कक्षाशी संबंधित संपुर्ण जबाबदारी नियंत्रण कक्ष प्रमुख म्‍हणून  पार पाडणे.
वरील प्रमाणे नियुक्‍त अधिकारी यांना विषाणू संसर्गाच्‍या अनुषंगाने सर्व साधारणपणे जबाबदारी देण्‍यात आली आहे. सर्व समन्‍वय अधिकारी यांना देण्‍यात आलेल्‍या जबाबदारीच्‍या अनुषंगाने आवश्‍यक ती कार्यवाही करावी. तसेच नियुक्‍त अधिका-यांनी त्‍यांचे अधिनस्‍त मनुष्‍यबळ व साधन सामग्रीचा वापर करुन त्‍यांना सोपविण्‍यात आलेली जबाबदारी पार पाडावी. तसेच आपणास सोपविण्‍यात आलेल्‍या विषयाचे अनुषंगाने माहिती रोज सकाळी 11 वाजता व सायंकाळी 5 वाजता श्रीमती मृणाल जाधव, तहसिलदार संगायो शहर नांदेड (मो.क्र.9657576714) व जी.बी.सुपेकर, सहा.जिल्‍हा नियोजन अधिकारी नांदेड (मो.9420846532) हे वरील प्रमाणे सर्व बाबींचा दैनंदिन अहवाल संकलीत करुन निवासी उपजिल्‍हाधिकारी यांचेकडे सादर करतील.   
या कामात कोणत्‍याही अधिकारी, कर्मचारी यांच्‍याकडून कुचराई, दिरंगाई  केल्‍याचे निदर्शनास आल्‍यास त्‍यांचे विरुध्‍द महाराष्‍ट्र कोव्‍हीड -19 उपायोजना नियम 2020 मधील तरतुद व आपत्‍ती व्‍यवस्‍थापना अधिनियम 2005 च्‍या कलम 51 व इतर अनुषंगिक कायद्यानुसार कारवाई करण्‍यात येईल, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमीत केले आहेत.
000000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...