Tuesday, November 10, 2020

 

58  बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

        34 कोरोना बाधितांची भर  तर एकाचा मृत्यू

 

नांदेड (जिमाका) दि. 10 :- मंगळवार 10 नोव्हेंबर 2020 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 58 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 34 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 15 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 19 बाधित आले.

 

आजच्या एकुण 1 हजार 160 अहवालापैकी  1 हजार 111 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता  19 हजार 512 एवढी झाली असून यातील  18  हजार 474 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 330 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 23 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.

 

आज रोजी प्राप्त अहवालानुसार एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मंगळवार, दिनांक 10 नोव्हेंबर रोजी हदगाव तालुक्यातील तामसा येथील 69 वय वर्षाच्या पुरुषाचा खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या 533 झाली आहे.

 

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 5, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 22, हदगाव कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 1, लोहा कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 7, बिलोली कोविड केअर सेटर व गृहविलगीकरण 4, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 3, खाजगी रुग्णालय 10, किनवट कोविड  केअर सेटर व गृहविलगीकरण 6 असे एकूण 58 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.  उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 97.53 टक्के आहे.

 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 11, नांदेड ग्रामीण 1, लोहा तालुक्यात 1 हिंगोली 2 असे एकुण 15 बाधित आढळले. 

 

तर अँटिजेन तपासणीद्वारे  नांदेड मनपा क्षेत्र 10, नांदेड ग्रामीण 4, अर्धापूर तालुक्यात 1, हदगाव तालुक्यात 1, देगलूर तालुक्यात 1, यवतमाळ 1, हिंगोली 1 असे एकूण 19 बाधित आढळले.

 

जिल्ह्यात 330 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 42, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड येथे 27, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड (नवी इमारत) येथे 45, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 87, मुखेड कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 6, किनवट कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 17, देगलूर कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 12, हदगाव कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 3, बिलोली कोविड केअर सेंटर व गृह विलगीकरण 1, भोकर कोविड केअर सेंटर व गृह विलगीकरण 19, बारड अंतर्गत गृह विलगीकरण 1, धर्माबाद तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 2, हिमायतनगर तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 3, कंधार तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 4,  अर्धापूर तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 8, मुदखेड तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 1, खाजगी रुग्णालय 52 आहेत. 

 

मंगळवार 10 नोव्हेंबर 2020 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 159, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 74 एवढी आहे.

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 22 हजार 760

निगेटिव्ह स्वॅब- 99 हजार 823

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 19 हजार 512

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 18 हजार 474

एकूण मृत्यू संख्या- 533

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 97.53 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-11

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 0

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 353

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 330

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले- 23.

 

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. 

00000

 

                                                           पदवीधर मतदार संघाच्या मतदानासाठी

नांदेड जिल्हा प्रशासन सज्ज

जिल्ह्यात 123 मतदान केंद्र

 

नांदेड (जिमाकादि. 10 :-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघाची निवडणूक मतदान प्रक्रीया जिल्ह्यात सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने मतदान केंद्रनिहाय तयारी पूर्ण झाली आहे.  कोविड-19 अंतर्गत विशेष खबरदारी घेतली जात असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी माहिती दिली.

 

जिल्ह्यातील मतदारांसाठी मतदान सुलभ करता यावे यादृष्टीने मतदान केंद्राचे नियोजन करण्यात आले आहे. एकूण 123 केंद्रावर मतदान पार पडेल यासाठी 907 अधिकारी कर्मचारी नेमण्यात आले आहेत.  या प्रक्रीयेत सहभागी असणाऱ्या प्रत्येकाची कोरोनाची परिस्थिती लक्षात घेवून प्राथमिक चाचणी केली जाईल असेही स्पष्ट करण्यात आले आहे. प्रत्येक केंद्रावर एक हजाराच्या आतच मतदार संख्या ठेवण्यात आली आहे.  प्रत्येकाची थर्मल चाचणी केली जाईल ज्यांचे तापमान अधिक असेल अशा मतदारांना त्याच बुथवर सुरक्षीत मतदानाची सुविधा असेल. ग्रामीण भागातील मतदारांसाठी सर्कलनिहाय मतदान केंद्र निश्चित करण्यात आले असून या सर्व मतदान केंद्राची पाहणी निवडणूक विभागाच्या सर्व वरिष्ठ अधिकारी यांनी केली आहे.

 

वृत्त क्र. 828                                   

                                     कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचे

नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात

 

नांदेड (जिमाका) दि. 10 :-जिल्ह्यात नोव्हेंबर महिना आणि त्यानंतर करावयाच्या उपाययोजना गुलाबी बोंडअळी नियंत्रणासाठीचे व्यस्थापनाबाबत उपविभागीय  कृषि अधिकारी , नांदेड यांनी पुढीलप्रमाणे सल्ला दिला आहे.

 

 पतंगाच्या निराराणीसाठी कामगंध सापळे 2 प्रति एकरी याप्रमाणे लावावेत. आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यास सामुहीक पतंग पकडण्यासाठी 8 कामगंध सापळे प्रति एकरी लावावेत.  एकरी 20 बोंडे तोडुन त्यामध्ये गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव तपासावा. सरासरी आठ नर पतंग  प्रति सापळा 3 रात्री आढळल्यास किंवा 10 टक्के प्रादुर्भावग्रस्त बोंडात जिवंत अळया आढळल्यास रासायनिक किटकनाशक जसे की फेनव्हलेरेट 20 टक्के  EC  10 मिली किंवा  सायपमेथ्रीन 10 टक्के EC 10 मिली लाबंडा साहयालोथ्रीन 5EC 10  मिली किंवा इंडोक्साकार्ब 14.5 % 5 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के एसजी SG5 मिली किंवा थायोडीकार्ब  75 टक्के WP 20 ग्रॅम क्लोरापायरीफॉस 20 टक्के EC 25 मिली किंवा प्रोफेनोफॉस 50 टक्के EC 30 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळुन फवारणी 10 ते 15 दिवसाच्या अंतराने करावी .ज्या शेतात प्रति झाड 8-10  हिरवी बोंड असतील किंवा नवीन पात्या ,फुले छोटे बोंड असतील तर किटनाशकाची फवारणी करावी. फवारणी अगोदर फुटलेला कापुस वेचुन घ्यावा. वारंवार एकच एक किटकनाशक किटकनाशकाच्या मिश्रणाचा उपयोग टाळावा.

बोंडे सहन बुरशीजन्य रोगांच्या समस्येवर उपाययोजना

 सध्या पाऊस थांबलेला आहे. तापमानात घट होत आहे. अश्या अवस्थेत जिवाणुजन्य, बॅक्टेरिया असणाऱ्या आंतरिक बोंडसड जो  सप्टेंबर - ऑक्टोबर महिन्यात  आढळला. हयानंतरच्या उर्वरीत हंगामात हया रोगाची शक्यता नगन्य असल्यामुळे  त्यासाठी उपाययोजना करण्याची गरज नाही . परतु ओलीत असणाऱ्या कपाशीत दहीया, बुरशीजन्य करपा, बोंडाच्या पृष्ठभागावर होणारा बुरशीचा संसर्ग .  व्यस्थापनासाठी खबरदारीचा उपाय म्हणुन कार्बेडाझिम 50WP 20 ग्रॅम किंवा मेटारीम 55 टक्के पायराक्लोस्ट्रॉबीन 5 टक्के WG 20 ग्रॅम किंवा प्रोपीकॉनाझोल 25 टक्के EC 10मिली किंवा ॲझोझायसट्रॉबीन  18.2 टक्के WWअधिक डायफेनोकोनोझोल 11.4 टक्के W/W SC 10 मिली किंवा प्रोपीनेब 70 टक्के WP25-30 ग्रॅम किंवा क्रेसॉक्सिममिथिल 44.3 टक्के SC 10 मिली किंवा (फ्लुझापायरोक्झाड 167 ग्रॅम /ली अधिक पाय्राक्लोस्त्रोबीन 333 ग्रॅम /ली एस. सी ) 6 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी आर. टी. सुखदेव यांनी केले आहे .

000000

 

 

वृत्त क्र. 827                      

19 नोव्हेंबरला सरपंच पदाची आरक्षण सोडत

 

नांदेड (जिमाका) दि. 10 :- सरपंच पदाचे आरक्षण 2020-2025 आरक्षण सोडत 19 नोंव्हेंबर 2020 रोजी सकाळी 11 वाजता सर्व तालुका मुख्यालयी होणार आहे. तरी सर्व संबंधितानी यांची नोंद घ्यावी असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

    वृत्त क्रमांक 107 'युवा उमेद'ने युवकांना रोजगाराची संधी मिळेलः ना. अतुल सावे २२ फेब्रुवारीला अर्धापूरला भव्य रोजगार मेळावा नांदे...