वृत्त क्र. 828
कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचे
नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात
नांदेड (जिमाका) दि. 10 :-जिल्ह्यात नोव्हेंबर महिना आणि
त्यानंतर करावयाच्या उपाययोजना गुलाबी बोंडअळी नियंत्रणासाठीचे व्यवस्थापनाबाबत उपविभागीय कृषि अधिकारी , नांदेड यांनी पुढीलप्रमाणे सल्ला दिला आहे.
पतंगाच्या निराराणीसाठी कामगंध सापळे 2 प्रति एकरी
याप्रमाणे लावावेत. आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यास
सामुहीक पतंग पकडण्यासाठी 8 कामगंध सापळे प्रति
एकरी लावावेत. एकरी 20 बोंडे तोडुन
त्यामध्ये गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव तपासावा. सरासरी आठ नर
पतंग प्रति सापळा 3 रात्री आढळल्यास किंवा
10 टक्के प्रादुर्भावग्रस्त बोंडात जिवंत अळया आढळल्यास रासायनिक किटकनाशक जसे की फेनव्हलेरेट
20 टक्के EC 10 मिली किंवा सायपमेथ्रीन 10 टक्के EC
10 मिली लाबंडा साहयालोथ्रीन 5EC 10
मिली किंवा इंडोक्साकार्ब 14.5 % 5 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के एसजी SG5 मिली किंवा
थायोडीकार्ब 75 टक्के WP 20 ग्रॅम क्लोरापायरीफॉस
20 टक्के EC 25 मिली किंवा प्रोफेनोफॉस 50 टक्के EC
30 मिली प्रति 10 लिटर पाण्यात
मिसळुन फवारणी 10 ते
15 दिवसाच्या अंतराने करावी .ज्या शेतात
प्रति झाड 8-10 हिरवी बोंड असतील किंवा नवीन पात्या ,फुले व छोटे बोंड असतील तर किटनाशकाची फवारणी करावी.
फवारणी अगोदर फुटलेला कापुस वेचुन घ्यावा. वारंवार एकच एक
किटकनाशक व किटकनाशकाच्या मिश्रणाचा उपयोग टाळावा.
बोंडे सहन व बुरशीजन्य रोगांच्या समस्येवर उपाययोजना
सध्या पाऊस थांबलेला आहे. तापमानात घट होत
आहे. अश्या अवस्थेत
जिवाणुजन्य, बॅक्टेरिया असणाऱ्या आंतरिक बोंडसड जो सप्टेंबर - ऑक्टोबर महिन्यात आढळला. हयानंतरच्या उर्वरीत हंगामात हया रोगाची शक्यता नगन्य असल्यामुळे त्यासाठी
उपाययोजना करण्याची गरज नाही
. परंतु ओलीत असणाऱ्या कपाशीत दहीया, बुरशीजन्य करपा,
बोंडाच्या पृष्ठभागावर होणारा बुरशीचा संसर्ग इ. व्यवस्थापनासाठी खबरदारीचा उपाय म्हणुन कार्बेडाझिम 50WP 20 ग्रॅम किंवा मेटारीम 55 टक्के पायराक्लोस्ट्रॉबीन 5 टक्के
WG 20 ग्रॅम किंवा प्रोपीकॉनाझोल 25 टक्के EC 10मिली किंवा ॲझोझायसट्रॉबीन 18.2 टक्के WWअधिक डायफेनोकोनोझोल
11.4 टक्के W/W SC 10 मिली किंवा प्रोपीनेब 70 टक्के
WP25-30 ग्रॅम किंवा क्रेसॉक्सिम –मिथिल
44.3 टक्के SC 10 मिली किंवा (फ्लुझापायरोक्झाड 167 ग्रॅम
/ली अधिक पाय्राक्लोस्त्रोबीन 333 ग्रॅम
/ली एस. सी
) 6 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात
मिसळुन फवारणी करावी, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी आर. टी.
सुखदेव यांनी केले आहे .
000000
No comments:
Post a Comment