Sunday, July 16, 2017

जिल्ह्यात गत 24 तासात
 सरासरी 30.72 मि. मी. पाऊस
जिल्ह्यात आतापर्यंत 24.38 टक्के पाऊस
          नांदेड, दि. 17 :- जिल्ह्यात सोमवार 17 जुलै 2017 रोजी  सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 30.72 मिलीमीटर  पावसाची  नोंद  झाली  असून  जिल्‍ह्यात  दिवसभरात एकुण 491.49  मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 232.97 मि.मी. पावसाची  नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 24.38 टक्के एवढा पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात सोमवार 17 जुलै रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये  तालुका निहाय पुढील  प्रमाणे,  कंसात  एकूण  पाऊस : नांदेड- 75.63 (372.80), मुदखेड- 45.67 (291.16), अर्धापूर- 37.00 (221.66), भोकर- 31.50 (269.75), उमरी- 50.67 (214.66), कंधार- 39.17 (249.17), लोहा- 25.33 (213.32), किनवट- 9.00 (270.01), माहूर- 13.38 (247.89), हदगाव- 26.57 (268.03), हिमायतनगर- 16.00 (161.14), देगलूर- 17.50  (151.98), बिलोली- 22.40 (203.20), धर्माबाद- 23.67 (214.01), नायगाव-27.00 (182.66), मुखेड- 31.00 (196.00) आज  अखेर  पावसाची सरासरी 232.97 (चालू वर्षाचा एकूण पाऊस 3727.44) मिलीमीटर आहे.

00000
जिल्ह्यात गत 24 तासात
 सरासरी 11.16 मि. मी. पाऊस
जिल्ह्यात आतापर्यंत 21.17 टक्के पाऊस
          नांदेड, दि. 16 :- जिल्ह्यात रविवार 16 जुलै 2017 रोजी  सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 11.16 मिलीमीटर  पावसाची  नोंद  झाली  असून  जिल्‍ह्यात  दिवसभरात एकूण 178.53  मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 202.25 मि.मी. पावसाची  नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 21.17 टक्के एवढा पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात 16 जुलै 2017 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये  तालुका निहाय पुढील  प्रमाणे  कंसात  एकूण  पाऊस : नांदेड- 6.13 (297.17), मुदखेड- 9.33 (245.49), अर्धापूर- 5.00 (184.66), भोकर- 13.75 (238.25), उमरी- 12.33 (163.99), कंधार- 9.00 (210.00), लोहा- 8.50 (187.99), किनवट- 18.29 (261.01), माहूर- 40.50 (234.51), हदगाव- 16.43 (241.46), हिमायतनगर- 13.33 (145.14), देगलूर- 1.17  (134.48), बिलोली- 6.60 (180.80), धर्माबाद- 8.00 (190.34), नायगाव-7.60 (155.66), मुखेड- 2.57 (165.00) आज  अखेर  पावसाची सरासरी 202.25 (चालू वर्षाचा एकूण पाऊस 3235.95 मिलीमीटर आहे.

00000
किनवट नगरपरिषदेत
गुरुवारी सदस्य पदांचे आरक्षण  
  नांदेड, दि. 16 :- किनवट नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक-2017 साठी राज्य निवडणूक आयोगानी ठरवून दिलेल्या आरक्षणाच्या प्रमाणपत्रानुसार गुरुवार 20 जुलै 2017 रोजी नगरपरिषद किनवट येथे सकाळी 11 वा. सोडत पद्धतीने सदस्य पदांचे आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे. किनवट नगरपरिषद क्षेत्रातील संबंधीत नागरिकांनी सोडतीच्या ठिकाणी वेळेत उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.  
आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष / प्राधिकृत अधिकारी उपविभागीय अधिकारी हदगाव हे राहतील. किनवट नगरपरिषद क्षेत्रातील एकूण प्रभागापैकी अनुसूचित जाती (स्त्री), अनुसूचित जमाती (स्त्री), नागरिकांचा मागास प्रवर्ग व नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्त्री) आणि सर्वसाधारण स्त्रीयांसाठी गुरुवार 20 जुलै रोजी चिठ्या काढून सोडत पद्धतीने सदस्य पदांचे आरक्षण निश्चित करण्यात येणारआहे.

00000
व्यवसाय कर्ज प्रस्तावासाठी
जिल्हा उद्योग केंद्राचे आवाहन
नांदेड दि. 16 :- जिल्हा उद्योग केंद्रामार्फत सर्वसाधारण, अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, सुशिक्षीत बेरोजगार युवक-युवतींसाठी शासनाच्या सुधारीत बीज भांडवल योजना व जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजनेंतर्गत व्यवसायासाठी कर्ज प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. इच्छुक व पात्र सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतीनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन नांदेड जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांनी केले आहे.
सुधारीत बीज भांडवल योजनेंतर्गत उद्योग व सेवासाठी 25 लाख रुपये कर्ज दिल्या जाते. अर्जदाराचे वय 18 ते 50 दरम्यान असावे. अर्जदाराने सेवायोजन कार्यालयात नाव नोंदणी केलेली असावी. अर्जदाराचे शिक्षण सातवीच्या पुढे असावे. अर्जदारास कर्ज मंजूर झाल्यास बँकेमार्फत 75 टक्के कर्ज व उद्योग केंद्रामार्फत 15 ते 20 टक्के सुधारीत बीज भांडवल मिळेल.
जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजना ही उद्योग व सेवा उद्योगसाठी लागू आहे. अर्जदाराचे वय 18 ते 50 दरम्यान असावे. अर्जदार ग्रामीण भागातील व ग्रामीण कारागीर असावा. अर्जदार शिक्षणीत / निरक्षर असावा. अर्जदारास कर्ज मंजूर झाल्यास बँकेमार्फत 65 ते 75 टक्के कर्ज व उद्योग केंद्रामार्फत 20 ते 30 टक्के मार्जीन मनी बीज भांडवल मिळेल, असेही प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

000000
चर्मकार विकास महामंडळ  
जिल्हा कार्यालयास तात्पुरते उद्दीष्ट
नांदेड दि. 16 :- संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या नांदेड जिल्हा कार्यालयास सन 2017-18 या आर्थिक वर्षासाठी तात्पुरत्या स्वरुपाचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. विशेष घटक योजना 22 व बीज भांडवल योजनेसाठी 5 असे उद्दीष्ट ठरवुन दिले आहे, अशी माहिती मंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

000000
जिल्हा कुष्ठरोग कार्यालयाचा
नवीन दुरध्वनी क्रमांक
नांदेड दि. 16 :- जिल्हा कुष्ठरोग कार्यालय व पर्यवेक्षिय नागरी कुष्ठरोग पथक नांदेड ही दोन्ही कार्यालय डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जुनी इमारत, सामान्य रुग्णालय परिसर, वजिराबाद नांदेड येथे स्थालांतरीत करण्यात आले आहे. या कार्यालयाचा नवीन दूरध्वनी क्र. 02462-230128 हा आहे. संबंधीतांनी नवीन दुरध्वनी क्रमांकाची नोंद घ्यावी, असे आवाहन नांदेडचे आरोग्य सेवा कुष्ठरोग सहाय्यक संचालक डॉ. डी. टी. कानगुले यांनी केले आहे.

000000
बालकांच्या हक्काबाबत
समाजात जागरुकता आवश्यक
- न्या. वसावे
नांदेड दि. 16 :- मुलांना इयत्ता पहिली ते आठवी पर्यंत मोफत शिक्षण आहे. कोणत्याही शैक्षणिक संस्थेने बालकांना प्रवेश शुल्क परिक्षा शुल्क घेतल्यास संस्थेवर दंडात्मक कार्यवाही होते. बालकांच्या शैक्षणिक हक्कासंबंधी संरक्षणाबाबत संस्थेने पालाकांना माहिती देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकाराचे सचिव न्या. डी. टी. वसावे यांनी केले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्यावतीने सुमन मुलींचे बालगृह, हनुमानगड नांदेड येथे ‘‘बालकांचे अधिकार, त्यांची काळजी संरक्षण या विषयावर कायदे विषयक शिबीराचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षावरुन न्या. वसावे हे बोलत होते. यावेळी बाल कल्याण समितीचे अध्यक्ष हरदीप सिंघ, अभिवक्ता संघाचे उपाध्यक्ष अॅड. जगजीवन भेदे, सुमन मुलींचे बालगृहाचे अधिक्षक . व्ही. दिनकर, आर. जी. कानोटे, अॅड. वैशाली ढवळे, श्रीमती पुरन शेट्टीवार, श्रीमती तुमवाड, श्री. घाटे यांची उपस्थिती होती.
न्या. वसावे यांनी बालकांच्या विविध कायदविषयी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून मिळणाऱ्या विविध सुविधांची माहिती दिली. तत्पुर्वी डॉ. हरदीपसिंघ यांनी बाल कल्याण समितीचे कार्य याविषयी सांगितले. अॅड. भेदे यांनी बाल गुन्हेगारांचे संरक्षण तर अॅड. वैशाली ढवळे, अॅड. कानोटे यांनी बाल गुन्हेगारांची काळजी याबाबत माहिती दिली.
श्रीमती तुमवाड बालगृहाचे अधिक्षक श्री. दिनकर यांनी संस्थेतील मुलींच्या यशाबद्दल व त्यांच्या पुनर्वसनाबाबत माहिती दिली.  यावेळी संस्थेच्या विद्यार्थीनी निकीता गोविंद मोरे, कांचन बद्रे, अनुराधा घुगे यांनी  मार्गदर्शन केल्याबद्दल मान्यवरांचे आभार मानले. अॅड. नयुम खान पठाण यांनी सुत्रसंचलन केले. यावेळी सुमन बालगृहातील मुली उपस्थित होत्या.  

000000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...