व्यवसाय
कर्ज प्रस्तावासाठी
जिल्हा
उद्योग केंद्राचे आवाहन
नांदेड दि. 16 :- जिल्हा
उद्योग केंद्रामार्फत सर्वसाधारण, अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, सुशिक्षीत
बेरोजगार युवक-युवतींसाठी शासनाच्या सुधारीत बीज भांडवल योजना व जिल्हा उद्योग
केंद्र कर्ज योजनेंतर्गत व्यवसायासाठी कर्ज प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. इच्छुक
व पात्र सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतीनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन नांदेड
जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांनी केले आहे.
सुधारीत बीज भांडवल
योजनेंतर्गत उद्योग व सेवासाठी 25 लाख रुपये कर्ज दिल्या जाते. अर्जदाराचे वय 18
ते 50 दरम्यान असावे. अर्जदाराने सेवायोजन कार्यालयात नाव नोंदणी केलेली असावी.
अर्जदाराचे शिक्षण सातवीच्या पुढे असावे. अर्जदारास कर्ज मंजूर झाल्यास बँकेमार्फत
75 टक्के कर्ज व उद्योग केंद्रामार्फत 15 ते 20 टक्के सुधारीत बीज भांडवल मिळेल.
जिल्हा उद्योग केंद्र
कर्ज योजना ही उद्योग व सेवा उद्योगसाठी लागू आहे. अर्जदाराचे वय 18 ते 50 दरम्यान
असावे. अर्जदार ग्रामीण भागातील व ग्रामीण कारागीर असावा. अर्जदार शिक्षणीत /
निरक्षर असावा. अर्जदारास कर्ज मंजूर झाल्यास बँकेमार्फत 65 ते 75 टक्के कर्ज व
उद्योग केंद्रामार्फत 20 ते 30 टक्के मार्जीन मनी बीज भांडवल मिळेल, असेही
प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
000000
No comments:
Post a Comment