Sunday, July 16, 2017

बालकांच्या हक्काबाबत
समाजात जागरुकता आवश्यक
- न्या. वसावे
नांदेड दि. 16 :- मुलांना इयत्ता पहिली ते आठवी पर्यंत मोफत शिक्षण आहे. कोणत्याही शैक्षणिक संस्थेने बालकांना प्रवेश शुल्क परिक्षा शुल्क घेतल्यास संस्थेवर दंडात्मक कार्यवाही होते. बालकांच्या शैक्षणिक हक्कासंबंधी संरक्षणाबाबत संस्थेने पालाकांना माहिती देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकाराचे सचिव न्या. डी. टी. वसावे यांनी केले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्यावतीने सुमन मुलींचे बालगृह, हनुमानगड नांदेड येथे ‘‘बालकांचे अधिकार, त्यांची काळजी संरक्षण या विषयावर कायदे विषयक शिबीराचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षावरुन न्या. वसावे हे बोलत होते. यावेळी बाल कल्याण समितीचे अध्यक्ष हरदीप सिंघ, अभिवक्ता संघाचे उपाध्यक्ष अॅड. जगजीवन भेदे, सुमन मुलींचे बालगृहाचे अधिक्षक . व्ही. दिनकर, आर. जी. कानोटे, अॅड. वैशाली ढवळे, श्रीमती पुरन शेट्टीवार, श्रीमती तुमवाड, श्री. घाटे यांची उपस्थिती होती.
न्या. वसावे यांनी बालकांच्या विविध कायदविषयी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून मिळणाऱ्या विविध सुविधांची माहिती दिली. तत्पुर्वी डॉ. हरदीपसिंघ यांनी बाल कल्याण समितीचे कार्य याविषयी सांगितले. अॅड. भेदे यांनी बाल गुन्हेगारांचे संरक्षण तर अॅड. वैशाली ढवळे, अॅड. कानोटे यांनी बाल गुन्हेगारांची काळजी याबाबत माहिती दिली.
श्रीमती तुमवाड बालगृहाचे अधिक्षक श्री. दिनकर यांनी संस्थेतील मुलींच्या यशाबद्दल व त्यांच्या पुनर्वसनाबाबत माहिती दिली.  यावेळी संस्थेच्या विद्यार्थीनी निकीता गोविंद मोरे, कांचन बद्रे, अनुराधा घुगे यांनी  मार्गदर्शन केल्याबद्दल मान्यवरांचे आभार मानले. अॅड. नयुम खान पठाण यांनी सुत्रसंचलन केले. यावेळी सुमन बालगृहातील मुली उपस्थित होत्या.  

000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...