Friday, January 13, 2017

  महसूलच्या अव्वल कारकुनांची सेवाजेष्‍ठता यादी प्रसिद्ध ;
आक्षेप सादर करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 13 :- अव्‍वल कारकून संवर्गातील सेवानिवृत्‍त, स्‍वेच्‍छासेवानिवृत्‍त व मयत कर्मचारी यांचे कुटुंबियांनी उक्‍त जेष्‍ठता सुचीचे अवलोकन करावे आणि जेष्‍ठतासूची संबंधी काही आक्षेप असल्‍यास आपण ज्‍या कार्यालयातून सेवानिवृत्‍त, स्‍वेच्‍छासेवानिवृत्‍त व मयत (मयत कर्मचा-यांचे कुटुंबियांनी) झाले आहेत त्‍या कार्यालयाचे नाव नमुद करुन आक्षेप अर्ज सबळ पुराव्‍यासह सोमवार 23 जानेवारी 2017 पुर्वी जिल्‍हाधिकारी कार्यालय नांदेड येथे सादर करावेत. या तारखेनंतर प्राप्‍त होणारे आक्षेप विचारात घेतले जाणार नाहीत, असे आवाहन नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.  
महाराष्‍ट्र नागरी सेवा (जेष्‍ठतेचे विनियमन) नियमावली 1982 अन्‍वये अव्‍वल कारकून संवर्गातील कर्मचा-यांची दि. 1.6.1982 ते 31.12.2015 या कालावधीच्‍या सेवा जेष्‍ठता सूच्‍या  प्रसिध्‍द करण्‍याच्‍या सूचना शासनाकडून दिल्‍यानुसार जिल्‍हाधिकारी कार्यालय नांदेडचे आस्‍थापनेवरील महसूल विभागातील अव्‍वल कारकून संवर्गातील कर्मचारी यांच्‍या सेवाजेष्‍ठता याद्या सुधारीत करुन प्रसिध्‍दीस्‍तव http//:nanded.nic.in या संकेतस्‍थळावर व सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालये तसेच जिल्‍हाधिकारी कार्यालयातील सर्व कार्यासने यांचेकडे पाहण्‍यासाठी उपलब्‍ध केल्‍या आहेत. 

000000

    वृत्त क्रमांक 107 'युवा उमेद'ने युवकांना रोजगाराची संधी मिळेलः ना. अतुल सावे २२ फेब्रुवारीला अर्धापूरला भव्य रोजगार मेळावा नांदे...