Wednesday, April 19, 2023

 समता पर्व निमित्त संविधान जनजागृती 

नांदेड (जिमाका) दि. 19 :सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्गंत समाज कल्याण कार्यालयाच्यावतीने 1 एप्रिल ते 1 मे 2023 या कालावधीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता पर्व अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानातर्गंत सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजना थेट जनतेपर्यत पोहोचविण्याच्या अनुषंगाने विविध उपक्रम राबविण्यावर भर देण्यात येत आहे.

 

सामाजिक समता पर्वा निमित्त 18 एप्रिल रोजी माजी न्यायमुर्ती तथा अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष सी.एल.थुल यांच्या हस्ते संविधान जनजागृती एलईडी व्हॅनला हिरवी झेंडी दाखवून सुरवात करण्यात आली. यावेळी सहाय्यक आयुक्त डॉ. तेजस माळवदकर, समाज कल्याण अधिकारी बापु दासरी व कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती. या एलईडी व्हॅनमार्फत ग्रामीण भागात व शहरात समता पर्व निमित्त संविधान जनजागृती करण्यात येत आहे.

0000



 जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या “आपली पेन्शन आपल्या दारी” मोहिमेला राज्य शासनाचा प्रथम पुरस्कार

▪️ राजीव गांधी प्रशासकिय गतिमानता (प्रगती) अभियान स्पर्धेचे निकाल जाहीर
▪️ नांदेड जिल्ह्यातही ही मोहीम राबविण्याची पूर्व तयारी सुरू - जिल्हाधिकारी अभिजीत राऊत
नांदेड (जिमाका), दि. 19 :- प्रशासनातील सेवांच्या गुणवत्तेमध्ये वाढ व्हावी, यात लोकाभिमुखता यावी व पारदर्शकतेसमवेत सर्वांच्या सहकार्यातून उत्तम प्रशासन कार्यान्वित होण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा ही योजना सुरू केली. सन 2022-23 या वर्षाकरीता घेतलेल्या सदर स्पर्धेचे निकाल राज्य शासनाने जाहिर केले असून विभागीय स्तरावरील निवड समितीद्वारे प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सुरू केलेल्या संजय गांधी निराधार योजना अनुदान घरपोच वाटप या अभिनव उपक्रमाला 10 लाख रुपयांचा प्रथम पुरस्कार जाहीर केला आहे. राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय निवड समिती मार्फत हे पारितोषिक शासन निर्णयाद्वारे आज 19 एप्रिल रोजी जाहीर केले आहेत.
समाजातील वृद्ध, निराधार, दिव्यांगजणासाठी शासनाने विविध आर्थीक लाभाच्या योजना सुरू केल्या आहेत. हे अर्थसहाय्य घेण्यासाठी प्रत्येकवेळी त्यांना बँकेपर्यंत जाण्यासाठी लागणारे कष्ट, वेळ व खर्च लक्षात घेता “आपली पेन्शन आपल्या दारी” ही अभिनव योजना अभिजीत राऊत यांनी जळगाव जिल्हाधिकारी म्हणून सुरू केली होती. या योजनेने सर्वसामान्यांना दिलासा देण्यासमवेत संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, दिव्यांग निवृत्ती वेतन योजना, वयोवृद्ध, अनाथ बालके आदी योजनेतील लाभार्थ्यांना याचा लाभ झाला.
नांदेड जिल्ह्यातही ही अभिनव योजना लवकरच सुरू - जिल्हाधिकारी अभिजीत राऊत
नांदेड जिल्ह्याचा विस्तार हा व्यापक आहे. यात किनवट, हदगाव, हिमायतनगर सारखे आदिवासी बहुल तालुकेही आहेत. सर्वसामान्यांना त्यांच्या योजनेचे लाभ विनासायास त्यांच्या पर्यंत पोहोचावेत अशी यंत्रणा उभी करण्याचा आनंद खूप वेगळा आहे. नांदेड जिल्ह्यातही “आपली पेन्शन आपल्या दारी” ही अभिनव योजना लवकरच कार्यान्वित करीत असल्याचे सुतोवाच जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी काढले. यासंदर्भात प्राथमिक नियोजन व पूर्व तयारी सुरू केली असून त्यांची लवकरच प्रचिती येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
00000



 डॉ. अविनाश कौर महाजन यांच्या शोध निबंधाला मान्यता

नांदेड (जिमाका) दि. 19 :-  डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या डॉ. अविनाश कौर महाजन यांनी कोविड या आजाराचे मानसिक स्थितीवर होणारे परिणाम या विषयावर आधारित एक शोध निबंध भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेत सादर केला होता. या परिषदेच्या समितीत या शोध निबंधाला मान्यता मिळाली असून यासाठी त्यांना विद्यावेतनही मंजूर झाले आहे. डॉ. अविनाश कौर महाजन यांच्या या कामगिरीबाबत महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी कौतुक करुन शुभेच्छा दिल्या आहेत.

नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालयातील डॉक्टर्स नेहमी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उपक्रमात नाविण्य आणण्यासाठी प्रयत्नशिल असतात. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आयसीएमआर ही संशोधनाच्या बाबतील देशातील सर्वोच्च संस्था आहे. महाविद्यालयाचे मनोविकार विभागाचे डॉ. प्रदीप बोडके, सहयोगी प्राध्यापक डॉ. उमेश आत्राम यांचे डॉ. अविनाश कौर महाजन यांना मार्गदर्शन लाभले आहे.

0000

 शुक्रवारी स्वमग्नता असलेल्या मुलांच्या

पालकांसाठी मार्गदर्शन शिबिर

नांदेड (जिमाका) दि. 19 :-  डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विष्णुपुरी येथील मानसोपचार विभागातर्फे शुक्रवार 21 एप्रिल 2023 रोजी स्वमग्नता असलेल्या मुलांच्या पालकांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 10 ते 2 या कालावधीत शिबिर होईल. स्वमग्नता  असलेल्या मुलांच्या पालकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन वैद्यकीय महाविद्यालयातर्फे करण्यात आले आहे.

 

या शिबिरात स्वमग्नता  या आजाराविषयी संपूर्ण माहिती दिली जाणार आहे. या आजारामुळे येणाऱ्या अपंगत्वाचे प्रमाणपत्र काढण्याची प्रक्रीया व या प्रमाणपत्राचे फायदे यावर मार्गदर्शन केले जाणार आहे. यासाठी मानसोपचार विभागातील डॉ. प्रदीप बोडके, डॉ. उमेश आत्राम, डॉ. विशाल पेदे, डॉ. रोहित ठक्करवाड, डॉ. अदिती आकुलवार व अमोल निंबाळकर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

0000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...