Wednesday, April 19, 2023

 डॉ. अविनाश कौर महाजन यांच्या शोध निबंधाला मान्यता

नांदेड (जिमाका) दि. 19 :-  डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या डॉ. अविनाश कौर महाजन यांनी कोविड या आजाराचे मानसिक स्थितीवर होणारे परिणाम या विषयावर आधारित एक शोध निबंध भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेत सादर केला होता. या परिषदेच्या समितीत या शोध निबंधाला मान्यता मिळाली असून यासाठी त्यांना विद्यावेतनही मंजूर झाले आहे. डॉ. अविनाश कौर महाजन यांच्या या कामगिरीबाबत महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी कौतुक करुन शुभेच्छा दिल्या आहेत.

नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालयातील डॉक्टर्स नेहमी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उपक्रमात नाविण्य आणण्यासाठी प्रयत्नशिल असतात. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आयसीएमआर ही संशोधनाच्या बाबतील देशातील सर्वोच्च संस्था आहे. महाविद्यालयाचे मनोविकार विभागाचे डॉ. प्रदीप बोडके, सहयोगी प्राध्यापक डॉ. उमेश आत्राम यांचे डॉ. अविनाश कौर महाजन यांना मार्गदर्शन लाभले आहे.

0000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   पालकमंत्री अतुल सावे यांचा नांदेड दौरा   नांदेड दि. 24 जानेवारी :- राज्याचे इतर मागास बहूजन कल्याण , दूग्धविकास , अपारंपारि...