Friday, August 2, 2019

जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 52.70 मि.मी. पाऊस


नांदेड, दि. 3 :- जिल्ह्यात शनिवार 3 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 52.70 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून दिवसभरात एकूण 843.25 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 359.44 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 37.44 टक्के एवढा पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात 3 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे कंसात एकूण पाऊस : नांदेड- 61.88 (322.42), मुदखेड- 49.67 (390.35), अर्धापूर- 50.00 (323.31), भोकर- 57.25 (377.45), उमरी- 44.33 (349.44), कंधार- 36.50 (306.83), लोहा- 46.50 (275.90), किनवट- 88.71 (519.96), माहूर- 41.50 (489.34), हदगाव- 67.71 (361.00), हिमायतनगर- 92.67 (435.69), देगलूर- 41.17 (227.99), बिलोली- 40.20 (401.00), धर्माबाद- 46.33 (330.99), नायगाव- 39.40 (351.80), मुखेड- 39.43 (287.55). आज अखेर पावसाची सरासरी 359.44 (चालू वर्षाचा एकूण पाऊस 5751.02) मिलीमीटर आहे.
00000

पाच वर्षात जिल्हा योजनेत १५ हजार ४७५ कोटी रुपयांची वाढ राज्याच्या चौफेर विकासाला प्राधान्य- सुधीर मुनगंटीवार



            मुंबई, दि. २:   राज्य शासनाने  जिल्हा वार्षिक योजनेत सन २००९-१० ते २०१३-१४ च्या तुलनेत १५४७५ .९९ कोटी रुपयांनी वाढ केली असल्याची माहिती अर्थ व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
२००९ ते २०१४ सरासरी ४३०५ कोटी रुपयांचा निधी
श्री. मुनगंटीवार पुढे म्हणाले की सन २००९-१० ते २०१३-१४ पर्यंत जिल्हा वार्षिक योजनेसाठी २१,५२७.९६ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. पाच वर्षांची याची सरासरी काढल्यास ती ४३०५.५९ कोटी रुपये इतकी होती.
जिल्हा वार्षिक योजनेसाठी वर्षनिहाय उपलब्ध करून दिलेला निधी


.क्र
वर्ष
एकूण
सरासरी (रु. कोटीत)
२००९-१०
२८४३.२७


४३०५.५९
२०१०-११
४१०९.७४
२०११-१२
४३१९.५०
२०१२-१३
५०१०.९५
२०१३-१४
५२४४.५०

एकूण
२१५२७.९६



७४००.७९
२०१४-१५
५९०२.००
२०१५-१६
७७२७.९३
२०१६-१७
७५६२.०२
२०१७-१८
७५६२.००
१०
२०१८-१९
८२५०.००

एकूण
३७००३.९५

२०१४ ते २०१९ सरासरी ७४०० कोटी रुपयांचा निधी
मागील पाच वर्षात म्हणजे २०१४-१५ ते २०१८-१९ या पाचवर्षात राज्य शासनाने जिल्हा वार्षिक योजनेसाठी ३७००३.९५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला  आहे. या पाच वर्षांची सरासरी ७ हजार ४०० कोटी रुपये आहे.
अर्थमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, प्रत्येक जिल्ह्याची स्थानिक आणि भौगोलिक वैशिष्ट्ये असतात, प्रत्येक जिल्ह्याची गरज वेगवेगळी असते हे लक्षात घेऊन जिल्हास्तरीय योजनांची आखणी होते, त्याची प्राधान्याने पूर्तता करण्यासाठी जिल्हा योजनेतून निधी देण्यात येतो. यात विविध सामाजिक क्षेत्रांबरोबर जिल्ह्याच्या पायाभूत सुविधांच्या विकास कामांचाही समावेश असतो. जनहिताच्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठीही यातून निधी उपलब्ध करून दिला जातो. जिल्हा विकसित झाला तर राज्य विकसित होण्याची प्रक्रिया अधिक वेगवान होते त्यामुळे गाव, खेडे केंद्रीभूत मानून विकास नियोजन करतांना त्या त्या जिल्ह्याला विकासासाठी अधिक निधी मिळावा आणि त्यातून राज्याची चौफेर प्रगती व्हावी याकडे शासनाने अधिक लक्ष दिले आहे. 
००००


१५० महिला चालकांची भरती
एसटीचे स्टेअरिंग आता महिलांच्या हाती
मुंबई, दि. २ : एसटीत महिला वाहक असतानाच आता चालक म्हणूनही महिला दाखल होणार आहेत. एसटीकडून चालक-वाहकम्हणून केल्या जाणाऱ्या भरतीत १५० महिलांची निवड झाली असून ऑगस्ट महिन्यापासून त्यांचे एक वर्ष प्रशिक्षण होणार आहे. त्यानंतर या महिला सेवेत दाखल होतील. त्यामुळे एसटीचे स्टेअरिंग आता महिलांच्या हाती जाणार आहे.
सध्या एसटी महामंडळाची भरती प्रक्रिया सुरु आहे. यात महिलांसाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत. जास्तीत जास्त महिलांचा प्रतिसाद मिळावा यासाठी काही अटींमध्ये बदलही करण्यात आले आहेत. पुरुष व महिलांसाठी अवजड वाहन परवाना व तीन वर्षे वाहन चालवण्याचा अनुभव अशी अट यापूर्वी होती. मात्र अट शिथील करून महिलांसाठी अवजड ऐवजी हलकी वाहने चालवण्याचा एक वर्षांचा परवाना अशी अट ठेवण्यात आली. त्यानुसार महिलांनी अर्ज केले. सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर चालक-वाहक पदासाठी १५० महिला पात्र ठरल्या आहेत. त्यांना अवजड वाहन चालवण्याचा अनुभव नसल्याने त्यांना नियमानुसार एक वर्षाचे प्रशिक्षण दिले जाईल. त्यानंतर त्या सेवेत दाखल होतील. या महिला चालकांना प्रथम छोट्या अंतरावरील एसटी चालवण्याचा अनुभव दिला जाईल. त्यानंतर लांबपल्ल्याच्या मार्गावर त्यांची नियुक्ती केली जाईल.
महामंडळामार्फत आदिवासी युवतींसाठी वाहन चालक प्रशिक्षण योजनाराबविण्यात येत आहे. यातून आतापर्यंत २१ आदिवासी युवतींना एसटी महामंडळामार्फत वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
महिला चालकांसाठी अबोली रंगाच्या रिक्षा
परिवहन विभागामार्फत रिक्षा आणि टॅक्सीसाठी देण्यात येणारे परवाने मुक्त करण्यात येऊन मागील पाच वर्षात सुमारे २ लाख ४० हजार परवाने देण्यात आले. हे परवाने देताना महिलांचाही विचार करण्यात आला. महिला रिक्षा चालकांना अबोलीरंगाच्या रिक्षा देण्यात येतात. आतापर्यंत १ हजार १०८ इतक्या रिक्षा महिला चालकांना देण्यात आल्या आहेत. मुंबई, ठाणे आदी शहरांमध्ये महिला चालक या रिक्षा चालविताना दिसत आहेत.
०००००

मराठवाड्यात अद्याप मोठ्या पावसाची प्रतिक्षा विभागात 222 मि.मी पाऊस



औरंगाबाद,दि. 2 (विमाका) :- मराठवाडा विभागात ढगाळ वातावरण असले तरी पावसाचा जोर मात्र दिसून येत नाही. विभागात अद्यापही मोठ्या पावसाची प्रतिक्षा आहे. सकाळी आठ वाजता मागील चोवीस तासांत विभागातील अनेक तालुके कोरडे राहिले असून काही ठिकाणी कमी- अधिक प्रमाणात पावसाच्या सरी कोसळल्या. आजपर्यंत एकूण 222.82 मि.मी पाऊस विभागात झाला आहे. नांदेड, हिंगोली, उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत  काल पावसाने कमी प्रमाणात हजेरी लावली आहे.
            जिल्हानिहाय  आजपर्यंत झालेल्या पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. नांदेड 306.75 मि.मी, औरंगाबाद- 260.54 मि.मी, हिंगोली -269.82 मि.मी, जालना - 232.61 मि.मी, परभणी -195.06 मि.मी, लातूर 192.25 मि.मी, उस्मानाबाद 185.14 मि.मी. आणि बीड 140.38 मि.मी.
आज सकाळी मागील चोवीस तासांतील पाऊस व कंसात आजपर्यंत झालेला पाऊस याची तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. सर्व आकडेवारी मिलीमीटर परिमाणात आहे.
औरंगाबाद जिल्हा- औरंगाबाद 1.30 (223.80), फुलंब्री 0.00 (296.25), पैठण 1.40 (168.23), सिल्लोड 3.13 (359.19), सोयगाव 5.00 (371.33), वैजापूर 0.00 (226.60), गंगापूर 0.33 (205.22), कन्नड 1.00 (276.25), खुलताबाद 4.67 (218.00). जिल्ह्यात एकूण 260.54 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
जालना जिल्हा- जालना 0.00 (194.56), बदनापूर 0.80 (237.40), भोकरदन 2.50 (337.50), जाफ्राबाद 3.80 (269.20), परतूर 0.00 (204.48), मंठा 0.00 (229.00), अंबड 0.00 (199.86), घनसावंगी 0.43 (188.43), जिल्ह्यात एकूण 232.61 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
परभणी जिल्हा- परभणी 2.51 (169.80), पालम 0.83 (159.67), पूर्णा 5.20 (222.80), गंगाखेड 0.50 (179.50), सोनपेठ 0.00 (201.00), सेलू 0.60 (171.80), पाथरी 2.33 (187.63), जिंतूर 0.67 (216.63), मानवत 3.63 (247.33), जिल्ह्यात एकूण पावसाची नोंद 195.06 मि.मी. झाली आहे.
हिंगोली जिल्हा- हिंगोली 3.57 (259.14), कळमनुरी 10.33 (327.75), सेनगाव 4.17 (253.17), वसमत 2.29 (170.29), औंढा नागनाथ 2.00 (338.75). जिल्ह्यात एकूण 269.82 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
नांदेड जिल्हा- नांदेड 6.50 (260.50), मुदखेड 4.67 (340.67), अर्धापूर 1.33 (273.32), भोकर 11.00 (320.50), उमरी 6.67 (305.12), कंधार 1.50 (266.83), लोहा 3.67 (227.23), किनवट 19.86 (422.90), माहूर 14.00 (457.44), हदगाव 9.86 (290.71), हिमायत नगर 21.00 (349.99), देगलूर 4.50 (186.83), बिलोली 16.40 (360.80), धर्माबाद 17.67 (284.67), नायगाव 7.00 (312.40), मुखेड 1.00 (248.14), जिल्ह्यात एकूण 306.75 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
बीड जिल्हा- बीड 1.73 (128.91), पाटोदा 5.50 (165.50), आष्टी 1.57 (146.86), गेवराई 0.00 (109.00), शिरुर कासार 1.00 (100.67), वडवणी 0.00 (120.00), अंबाजोगाई 0.00 (138.80), माजलगाव 017 (189.57), केज 0.71 (147.29), धारुर 2.67 (127.00), परळी 1.00 (170.64), जिल्ह्यात एकूण 140.38 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
लातूर जिल्हा- लातूर 2.13 (140.00), औसा 1.29 (120.57), रेणापूर 1.00 (173.00), उदगीर 2.43 (203.86), अहमदपूर 0.83 (257.17), चाकुर 2.80 (168.60), जळकोट 0.00 (285.50), निलंगा 5.00 (190.63), देवणी 2.00 (213.17), शिरुर अनंतपाळ 5.00 (197.00), जिल्ह्यात एकूण 192.25 मि.मी. पाऊस झाला आहे.
उस्मानाबाद जिल्हा- उस्मानाबाद 3.63 (176.25), तुळजापूर 5.43 (224.43), उमरगा 3.40 (214.60), लोहारा 4.33 (226.67), कळंब 3.17 (154.17), भूम 4.80 (193.70), वाशी 5.67 (174.33), परंडा 7.00 (116.60), जिल्ह्यात एकूण 185.14 मि.मी. पाऊस झाला आहे.
******


आरटीओचे शिबीर
तांत्रिक अडचणीमुळे रद्द
नांदेड, दि. 2 :- धर्माबाद येथील दरमहा आयोजित होणारे नांदेड प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या मासिक शिबिराचे कामकाज तांत्रिक अडचणीमुळे शुक्रवार 16 ऑगस्ट 2019 रोजी कॅम्प रद्द करण्यात आले आहे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे
000000

महसूल दिन उत्साहात संपन्न



नांदेड, दि. 2 :- येथील जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्यावतीने महसूल दिन 1 ऑगस्‍ट रोजी कै. शंकरराव चव्‍हाण प्रेक्षागृह येथे उत्साहात साजरा करण्‍यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे होते तर उद्घाटक म्‍हणून मनपा आयुक्त लहुराज माळी व प्रमुख पाहुणे म्‍हणून उपवनसंरक्षक आशिष ठाकरे तसेच व अपर जिल्‍हाधिकारी खुशालसिंह परदेशी, सहा.जिल्‍हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अभिनव गोयल यांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी जिल्‍हयातील पाणी टंचाईची परिस्‍थती, जलयुक्‍त शिवार अभियान, पी एम किसान योजना, तसेच  होट्टल महोत्सव, कर्करोग जनजागृती, योग दिवस, असे अनेक उल्‍लेखनिय कामाचा उलगडा मनोगतामध्‍ये केला.
मनपा आयुक्त लहुराज माळी, उपवनसंरक्षक आशिष ठाकरे, अपर जिल्हाधिकारी  खुशालसिंह परदेशी व सर्व संघटनेचे पदाधिकारी यात प्रामुख्‍याने किरण अंबेकर, लक्ष्‍मण नरमवाड, कुणाल जगताप, प्रफुल खंडागळे यांनी मनोगत व्‍यक्‍त केले.
            या कार्यक्रमात महसूल विभागामार्फत सन 2018-19 या वर्षात केलेल्‍या उल्‍लेखनिय कामाचे सविस्‍तर प्रास्‍ताविक निवासी उपजिल्‍हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी  यांनी केले तर सुत्रसंचलन तहसिलदार श्रीमती वैशाली पाटील व नायब तहसिलदार श्रीमती स्‍नेहलता स्‍वामी यांनी केले.
           
यावेळी जिल्‍ह्यातील एकूण 53 उत्‍कृष्‍ट अधिकारी / कर्मचारी यांना प्रशस्‍तीपत्र देऊन त्‍यांचा गौरव करण्‍यात आला. तसेच एकूण 37 सेवा निवृत्‍त अधिकारी / कर्मचारी यांचे सपत्‍नीक शाल व श्रीफळ देऊन सत्‍कार करण्‍यात आला. महसूल विभागातील दहावी व बारावीमध्‍ये 90 टक्के पेक्षा अधिक गुण घेतलेल्‍या अधिकारी / कर्मचारी यांच्‍या एकूण 20 गुणवंत पाल्‍यांना सन्‍मान चिन्‍ह व प्रशस्‍तीपत्र देऊन गौरव करण्‍यात आला. 16-नांदेड लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 अंतर्गत स्‍थापित दिव्‍यांग मतदान केंद्रावर स्‍वयंप्रेरणेने सहभाग घेतले एकूण 04, दिव्‍यांग कर्मचारी यांचा प्रशस्‍तीपत्र देऊन गौरव करण्‍यात आला.
पाचव्या अंतरराष्‍ट्रीय योन दिनानिमित्त 21 जून 2019 रोजी नांदेड येथे राज्‍यस्‍तरीय योग शिबिराचे यशस्‍वीरित्‍या कार्यक्रमांचे आयोजन केल्‍याबाबत श्री माळी आयुक्‍त, मनपा, श्री परदेशी अपर जिल्‍हाधिकारी, नांदेड, श्रीमती ढालकरी निवासी उपजिल्‍हाधिकारी नांदेड व सर्व टिम प्रमुख उपजिल्‍हाधिकारी व इतर अधिकारी यांनी योग दिनाचा कार्यक्रम यशस्‍वी करण्‍यासाठी  केलेल्‍या कामकाजाबाबत त्‍यांचाही  प्रशस्‍तीपत्र देवून गौरव करण्‍यात आला.
अ.का. गिरीष येवते यांनी मनाली ते लेह खार्दुंकला हे जगातील दुस-या कमांकाचे उंच ठिकाण असून या ठिकाणी त्‍यांनी 550 कि.मी. सायकलींग प्रवास 10 दिवसात पुर्ण केल्याबाबत प्रशस्‍तीपत्र देऊन गौरविण्‍यात आले.
यावेळी नांदेड जिल्‍ह्यामधून विविध संवर्गातून उत्कृष्‍ट काम करणाऱ्या भोकरचे उपविभागीय अधिकारी पवन चांडक, अर्धापूरचे तहसिलदार सुजीत नरहरे, संजय सोलंकर, ना.त. मुदखेड, संतोष शहाणे लघुलेखक (नि.श्रे.), शे.रफीक शे.शे.गुलाब वाहनचालक तहसिल कार्यालय उमरी तसेच जिल्‍हाधिकारी कार्यालयातून फैय्याज अहेमद खान पि.युसूफ खान अव्‍वल कारकून, माधव पवार लिपीक, गजानन काळे शिपाई यांना प्रशस्‍तीपत्र देवून गौरविण्‍यात आले. सर्व उपविभागातून  प्रत्‍येकी एका उत्‍कृष्‍ट अ.का., मं.अ., लिपीक, तलाठी, शिपाई, कोतवाल यांना प्रशस्‍तीपत्र देवून गौरविण्‍यात आले.
       या कार्यक्रमास जिल्‍ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसिलदार, सर्व महसूल संघटणेचे पदाधिकारी व अधिकारी/कर्मचारी हे बहुसंख्‍येने उपस्थित होते. शेवटी मुगाजी काकडे, नायब तहसिलदार यांनी सर्व मान्‍यवरांचे, उपस्थितांचे आभार मानले.
00000

मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाची शैक्षणिक कर्ज वसुलीची प्रक्रिया सुरु



नांदेड, दि. 2 :- मौलाना आझाद अल्‍पसंख्‍यांक आर्थिक विकास महामंडळामार्फत देण्‍यात आलेल्‍या शैक्षणिक कर्जासाठी जामीनदार असणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांकडून कर्जाची वसुली करण्याची करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी संबंधित कार्यालय प्रमुखांना पत्राद्वारे सुचना दिल्या आहेत.
मौलाना आझाद अल्पसंख्‍यांक आर्थिक विकास महामंडळ हे अल्‍पसंख्‍यांक विकास विभागाच्‍या अधिपत्‍याखालील महामंडळ असून या महामंडळाकडून नांदेड जिल्‍यातील अल्‍पसंख्‍यांक समुदायाच्‍या उच्‍च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्‍यांना शैक्षणिक कर्ज उपलब्‍ध करून देण्‍यात येते. शैक्षणिक अभ्‍यासक्रम पुर्ण झाल्‍यावर, नियमानुसार महामंडळाच्‍या कर्जाची परतफेड या विद्यार्थ्‍यानी करणे आवश्‍यक आहे.
            अल्पसंख्याक विकास विभागाचे प्रधान सचिव यांच्या अ.शा. पत्रासोबत यादीतील कर्जदारानी थकीत कर्जाची परतफेड न केल्‍याने कायदे सल्‍लागाराकडून The Negotiaable Instrument Act 1981 मधील कलम 138 अंतर्गत  थकीत  कर्जाचा भरणा करण्‍यासाठी कर्जदारांना कायदेशीर नोटीस पाठविण्‍यात आल्‍याचे कळविले आहे. ज्‍या कर्जदारांनी कर्जाच्‍या परतफेडीसाठी अग्रीम स्‍वरूपात दिलेला धनादेश न वठल्‍याने भरतीय दंड संविधानाच्‍या (IPS) कलम 138 अन्‍वये गुन्‍हे दाखल झाल्‍याचे कळविले आहे.
            शैक्षणिक कर्जासाठी अर्ज स्विकारतांना जामीनदारांची नमुना 24 (अ) वर स्‍वाक्षरी घेतलेली आहे. अर्जदाराला शैक्षणिक कर्जासाठी जामीन रहात असल्‍याबाबत जामीनदारांनी प्रतिज्ञापत्र सादर केलेले आहे. तसेच शैक्षणिक कर्ज करारनाम्‍यावर जामीनदाराची स्‍वाक्षरी आहे. जामीनदाराने सदर कर्जाची परतफेड केली जाईल, अशा स्‍वरूपाचे वचनपत्र (promisory note) याशिवाय, कर्ज मंजूर झाल्‍यानंतर  जामीनदाराने स्‍वतंत्र प्रतिज्ञपत्र नोटराईज करून सदर कर्जाची परतफेड करण्‍याबाबत हमी दिल्‍याचे अ.शा.पत्रान्‍वये कळविले आहे.
            मौलाना आझाद अल्‍पसंख्‍यांक आर्थिक विकास महामंडळाकडून शैक्षणिक कर्ज घेतलेल्‍या लाभार्थ्‍यांनी कर्जाची परतफेड न केल्‍यामुळे त्‍यांना कर्ज मिळण्‍यासाठी जामीनदार राहिलेल्‍या शासकिय, निमशासकीय व अनुदानित संस्‍थेत वेतन घेणारे अधिकारी / कर्मचारी यांच्‍या वेतनातून कर्जाची थकीत रक्‍कम वसूल करण्‍याबाबत जामीनदाराच्‍या संबंधित कार्यालयाला कळविण्याबाबत सुचीत केले आहे.
अधिनस्‍त संबंधित अधिकारी / कर्मचारी यांच्‍या वेतनातून वसुल केलेली थकीत कर्जाची रक्‍कम पुढील बँक खात्‍यात जमा करण्‍याबाबत सुचित केले आहे. Account Name:  MAULANA AZAD ALPSANKHYANK ARTHIK VIKAS MAHAMANDAL LTD Account No:   11265870539,      IFSC CODE:   SBIN0000433 Bank Name: STATE  BANK OF INDIA DOCTORS LANE NANDED एकुण  17 अर्जदारांकडील एकुण 26 लाख 59 हजार 648 रुपये थकीत आहेत, अशी माहिती नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
0000

जप्‍त रेती साठयाचा सोमवारी लिलाव



नांदेड, दि. 2 :- विनापरवानगी अनाधिकृत रेतीसाठा केल्‍याचे नांदेड तालुक्‍यात निदर्शनास आले आहे. या रेती साठा जप्‍त करुन त्‍याची ईटीएस मोजणी करण्‍यात आली आहे. या रेती साठयाचा लिलाव दुसरी फेरी व तिसरी अंतिम फेरी नांदेडचे उपविभागीय अधिकारी यांच्‍या अधिपत्‍याखाली सोमवार 5 ऑगस्ट 2019  रोजी सकाळी 11 वा. तहसिल कार्यालय नांदेड येथे घेण्‍यात येणार आहे.
हा रेती साठा पुढील ठिकाणी आहे. दुसरी फेरी मौ. नागापूर येथे 966 ब्रास, मौ. सिध्‍दनाथ 326 ब्रास साठा तर अंतिम तिसऱ्या फेरीत मौ. भनगी 1261 ब्रास, मौ.  गंगाबेट 730 ब्रास, मौ. नाळेश्‍वर 191 ब्रास रेती साठा असून एकुण 3 हजार 474 ब्रास रेतीसाठा उपलब्ध आहे. नांदेड तालुक्‍यातील  दर्शविलेल्‍या या ठिकाणी  रेतीसाठा गट नंबर निहाय असून तो आपण पाहुन तपासुन घेवुन लिलावात भाग घ्‍यावा. स्‍थळाचे ठिकाण असलेला साठा तपासुनच बोलीत भाग घ्‍यावा. अटी शर्ती बाबत माहिती या कार्यालयाचे गौण खनिज विभागात कार्यालयीन वेळेत पाहवयास मिळेल. संबंधीत नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन तहसिलदार नांदेड यांनी केले आहे.   
00000

मोटार सायकलची नवीन मालिका सुरु



नांदेड, दि. 2 :- मोटार सायकलसाठी एमएच 26- बीआर ही नविन मालिका मंगळवार 6 ऑगस्ट 2019 पासून सुरु होत आहे.  ज्या अर्जदारांना पसंती क्रमांक घ्यावयाचा आहे त्यांचे (आधारकार्ड, पॅनकार्ड मोबाईल नंबर ईमेलसह) अर्ज 3 ते 5 ऑगस्ट 2019 कालावधीत दुपारी 2.30 पर्यंत स्विकारण्यात येणार आहेत, त्यानंतर पसंती क्रमांकासाठी अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत.
ज्या पसंती क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास 5 ऑगस्ट 2019 रोजी सायंकाळी 5 वा. कार्यालयात त्याची यादी प्रदर्शित करण्यात येईल. टेस्ट मॅसेजद्वारे संबंधीत अर्जदारास कळविण्यात येईल. तसेच या क्रमांकाचा जाहिर लिलाव मंगळवार 6 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 11 वा. कार्यालयात आयोजित करण्यात येईल. सर्वांनी याबाबतची नोंद घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी, नांदेड यांनी केले.
00000

कर्जमाफी तक्रार निवारण समितीची स्थापना शेतकऱ्यांना समितीकडे अर्ज करण्याचे आवाहन



नांदेड, दि. 2 :- छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 या योजनेतंर्गत ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ अद्याप मिळाला नाही. अशा पात्र शेतकऱ्यांनी तालुकास्तरावर तक्रार निवारण समितीकडे अर्ज करुन आपले म्हणणे सादर करावे, असे आवाहन नांदेडचे सहकारी संस्था  जिल्हा उपनिबंधक प्रवीण फडणीस यांनी केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 या योजनेतंर्गत काही शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ अद्याप मिळाला नसल्याबाबतच्या तक्रारी शासनाकडे व सहकार विभागाच्या विविध कार्यालयाकडे प्राप्त होत आहे. तसेच या योजनेच्या लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना बँकांकडून नव्याने कर्जपुरवठा केला जात नाही अशा तक्रारी प्राप्त होत असल्याने शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी शासनाने 12 जुलै 2019 च्या शासन निर्णयान्वये तालुकास्तरीय समिती गठीत केली आहे.
या आदेशानसार जिल्ह्यातील सर्व उप / सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था तालूका कार्यालयात उपनिबंधक / सहायक निबंधक यांच्या उपस्थितीत आठवड्यातील सोमवार व गुरुवारी असे दोन दिवस सकाळी 10 ते दुपारी 4 यावेळेत समितीची सभा होईल. या सभेत बँकेच्या अधिकाऱ्यासमवेत चर्चा करुन शेतकऱ्याच्या प्रश्न सोडविण्याच्या सूचना आहेत, अशी माहिती प्रसिद्धी पत्राद्वारे नांदेडचे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी दिली आहे.

00000

जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 9.16 मि.मी. पाऊस



नांदेड, दि. 2 :- जिल्ह्यात शुक्रवार 2 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 9.16 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून दिवसभरात एकूण 146.63 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 306.74 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 31.93 टक्के एवढा पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात 2 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे कंसात एकूण पाऊस : नांदेड- 6.50 (260.54), मुदखेड- 4.67 (340.68), अर्धापूर- 1.33 (273.31), भोकर- 11.00 (320.20), उमरी- 6.67 (305.11), कंधार- 1.50 (270.33), लोहा- 3.67 (229.40), किनवट- 19.86 (431.25), माहूर- 14.00 (447.84), हदगाव- 9.86 (293.29), हिमायतनगर- 21.00 (343.02), देगलूर- 4.50 (186.82), बिलोली- 16.40 (360.80), धर्माबाद- 17.67 (284.66), नायगाव- 7.00 (312.40), मुखेड- 1.00 (248.12). आज अखेर पावसाची सरासरी 306.74 (चालू वर्षाचा एकूण पाऊस 4907.77) मिलीमीटर आहे.
00000

ग्रामविकास मंत्री पंकजा गोपीनाथ मुंडे यांचा दौरा



नांदेड, दि. 2 :- राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बाल विकास मंत्री पंकजा गोपीनाथ मुंडे या नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
शनिवार 3 ऑगस्ट 2019 रोजी मुंबई येथून खाजगी विमानाने सकाळी 9.30 वा. श्री गुरुगोविंद सिंघजी विमानतळ नांदेड येथे आगमन. सकाळी 9.40 वा. वाहनाने अंबाजोगाई जि. बीडकडे प्रयाण करतील.
00000


कृषि उद्योजक व शेतकरी उत्पादक कंपनी
यांची जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न
       
नांदेड, दि. 1 :- छोटया शेतकऱ्यांचा केंद्रिय कृषि व्यापार संघ नवी दिल्ली यांच्यावतीने कृषि उद्योजक व शेतकरी उत्पादक कंपनी यांच्यासाठी व्हेंचर कॅपिटल अर्थसहाय्य योजना, समभाग निधी योजना व पतहमी निधी या योजनांचा प्रचार व प्रसार बुधवार 31 जुलै रोजी प्रकल्‍प संचालक आत्‍मा कार्यालय नांदेड येथे कार्यशाळा आयोजित केली होती.
या कार्यशाळेस मार्गदर्शक म्हणून कृषि वित्त निगम मर्यादित नवी दिल्ली यांचे तज्ज्ञ मार्गदर्शक विभागीय व्यवस्थापक एस. बी. कटियार यांनी योजनांची उद्दीष्‍टे, पात्रतेचे निकष, अर्ज प्रक्रिया यांची माहिती दिली. तसेच शेतकरी उत्‍पादक कंपनीच्‍या प्रतिनिधीची विविध समस्‍यांवर मार्गदर्शन केले.  
उद्घाटक म्हणून प्रकल्प संचालक आत्मा तथा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे यांनी शेतकरी उत्‍पादक कंपनाच्‍या बळकटीकरणासाठी शेतमालावर प्राथमिक प्रक्रिया उद्योग ग्रामस्‍तरावर उभारावे. त्‍यासाठी नानाजी देशमुख कृषि संजिवनी प्रकल्‍प व गटशेती सारख्‍या योजनातून लाभ घ्‍यावा, असे अवाहन केले. नाबार्डचे व्‍यवस्‍थापक राजेश धुर्वे व जिल्हा अग्रणी बँकेचे श्री. निनावे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.  
या कार्यशाळेस कृषि विज्ञान केंद्राचे वरीष्‍ठ शास्‍त्रज्ञ डॉ. देविकांत देशमुख, जिल्‍हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. गायकवाड, जिल्‍हा रेशीम अधिकारी श्री. नरवाडे, जिल्‍हा उद्योग केंद्राचे अनिल कदम व  विविध विभागाचे अधिकारी व जिल्हयातील 46 स्थापित शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष प्रगतशिल शेतकरी, कृषि उद्योजक शेतकरी गटातील शेतकरी यांनी मार्गदर्शनाचा लाभ घेतला.  
कार्यशाळेच्‍या शेवटी आत्माचे प्रकल्प उपसंचालक एम. आर. सोनवणे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. या कार्यशाळेच्‍या यशस्‍वीतेसाठी एस.पी. बिरादार, प्रमोद झरे व व्‍ही. ए. जगताप यांनी परिश्रम केले.
00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...