Friday, August 2, 2019


कृषि उद्योजक व शेतकरी उत्पादक कंपनी
यांची जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न
       
नांदेड, दि. 1 :- छोटया शेतकऱ्यांचा केंद्रिय कृषि व्यापार संघ नवी दिल्ली यांच्यावतीने कृषि उद्योजक व शेतकरी उत्पादक कंपनी यांच्यासाठी व्हेंचर कॅपिटल अर्थसहाय्य योजना, समभाग निधी योजना व पतहमी निधी या योजनांचा प्रचार व प्रसार बुधवार 31 जुलै रोजी प्रकल्‍प संचालक आत्‍मा कार्यालय नांदेड येथे कार्यशाळा आयोजित केली होती.
या कार्यशाळेस मार्गदर्शक म्हणून कृषि वित्त निगम मर्यादित नवी दिल्ली यांचे तज्ज्ञ मार्गदर्शक विभागीय व्यवस्थापक एस. बी. कटियार यांनी योजनांची उद्दीष्‍टे, पात्रतेचे निकष, अर्ज प्रक्रिया यांची माहिती दिली. तसेच शेतकरी उत्‍पादक कंपनीच्‍या प्रतिनिधीची विविध समस्‍यांवर मार्गदर्शन केले.  
उद्घाटक म्हणून प्रकल्प संचालक आत्मा तथा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे यांनी शेतकरी उत्‍पादक कंपनाच्‍या बळकटीकरणासाठी शेतमालावर प्राथमिक प्रक्रिया उद्योग ग्रामस्‍तरावर उभारावे. त्‍यासाठी नानाजी देशमुख कृषि संजिवनी प्रकल्‍प व गटशेती सारख्‍या योजनातून लाभ घ्‍यावा, असे अवाहन केले. नाबार्डचे व्‍यवस्‍थापक राजेश धुर्वे व जिल्हा अग्रणी बँकेचे श्री. निनावे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.  
या कार्यशाळेस कृषि विज्ञान केंद्राचे वरीष्‍ठ शास्‍त्रज्ञ डॉ. देविकांत देशमुख, जिल्‍हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. गायकवाड, जिल्‍हा रेशीम अधिकारी श्री. नरवाडे, जिल्‍हा उद्योग केंद्राचे अनिल कदम व  विविध विभागाचे अधिकारी व जिल्हयातील 46 स्थापित शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष प्रगतशिल शेतकरी, कृषि उद्योजक शेतकरी गटातील शेतकरी यांनी मार्गदर्शनाचा लाभ घेतला.  
कार्यशाळेच्‍या शेवटी आत्माचे प्रकल्प उपसंचालक एम. आर. सोनवणे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. या कार्यशाळेच्‍या यशस्‍वीतेसाठी एस.पी. बिरादार, प्रमोद झरे व व्‍ही. ए. जगताप यांनी परिश्रम केले.
00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...