नांदेड, दि. 2 :-
मोटार सायकलसाठी एमएच 26- बीआर ही नविन मालिका
मंगळवार 6 ऑगस्ट 2019 पासून सुरु
होत आहे. ज्या
अर्जदारांना पसंती क्रमांक घ्यावयाचा आहे त्यांचे (आधारकार्ड,
पॅनकार्ड मोबाईल नंबर व ईमेलसह) अर्ज
3 ते 5 ऑगस्ट 2019 कालावधीत
दुपारी 2.30 पर्यंत स्विकारण्यात येणार आहेत,
त्यानंतर पसंती क्रमांकासाठी अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत.
ज्या पसंती क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज
प्राप्त झाल्यास 5
ऑगस्ट 2019 रोजी सायंकाळी
5 वा. कार्यालयात त्याची यादी प्रदर्शित करण्यात येईल.
टेस्ट मॅसेजद्वारे संबंधीत अर्जदारास कळविण्यात येईल. तसेच या क्रमांकाचा जाहिर लिलाव मंगळवार 6 ऑगस्ट 2019 रोजी
सकाळी 11 वा. कार्यालयात आयोजित करण्यात येईल. सर्वांनी याबाबतची नोंद
घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी,
नांदेड यांनी केले.
00000
No comments:
Post a Comment