नांदेड, दि. 2 :- मौलाना
आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळामार्फत देण्यात आलेल्या शैक्षणिक कर्जासाठी
जामीनदार असणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांकडून कर्जाची वसुली करण्याची करण्याचे
निर्देश शासनाने दिले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी संबंधित
कार्यालय प्रमुखांना पत्राद्वारे सुचना दिल्या आहेत.
मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास
महामंडळ हे अल्पसंख्यांक विकास विभागाच्या अधिपत्याखालील महामंडळ असून या
महामंडळाकडून नांदेड जिल्यातील अल्पसंख्यांक समुदायाच्या उच्च शिक्षण घेणाऱ्या
विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. शैक्षणिक अभ्यासक्रम
पुर्ण झाल्यावर,
नियमानुसार महामंडळाच्या कर्जाची परतफेड या विद्यार्थ्यानी करणे आवश्यक आहे.
अल्पसंख्याक विकास विभागाचे प्रधान सचिव यांच्या अ.शा. पत्रासोबत
यादीतील कर्जदारानी थकीत कर्जाची परतफेड न केल्याने कायदे सल्लागाराकडून The Negotiaable Instrument Act 1981 मधील कलम 138 अंतर्गत थकीत कर्जाचा भरणा करण्यासाठी कर्जदारांना कायदेशीर
नोटीस पाठविण्यात आल्याचे कळविले आहे. ज्या कर्जदारांनी कर्जाच्या परतफेडीसाठी
अग्रीम स्वरूपात दिलेला धनादेश न वठल्याने भरतीय दंड संविधानाच्या (IPS) कलम 138 अन्वये गुन्हे दाखल झाल्याचे कळविले आहे.
शैक्षणिक कर्जासाठी अर्ज स्विकारतांना जामीनदारांची नमुना 24
(अ) वर स्वाक्षरी घेतलेली आहे. अर्जदाराला शैक्षणिक कर्जासाठी जामीन रहात असल्याबाबत
जामीनदारांनी प्रतिज्ञापत्र सादर केलेले आहे. तसेच शैक्षणिक कर्ज करारनाम्यावर
जामीनदाराची स्वाक्षरी आहे. जामीनदाराने सदर कर्जाची परतफेड केली जाईल, अशा स्वरूपाचे वचनपत्र (promisory
note) याशिवाय, कर्ज मंजूर झाल्यानंतर जामीनदाराने स्वतंत्र प्रतिज्ञपत्र नोटराईज
करून सदर कर्जाची परतफेड करण्याबाबत हमी दिल्याचे अ.शा.पत्रान्वये कळविले आहे.
मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाकडून
शैक्षणिक कर्ज घेतलेल्या लाभार्थ्यांनी कर्जाची परतफेड न केल्यामुळे त्यांना
कर्ज मिळण्यासाठी जामीनदार राहिलेल्या शासकिय, निमशासकीय व अनुदानित संस्थेत वेतन घेणारे
अधिकारी / कर्मचारी यांच्या वेतनातून कर्जाची थकीत रक्कम वसूल करण्याबाबत
जामीनदाराच्या संबंधित कार्यालयाला कळविण्याबाबत सुचीत केले आहे.
अधिनस्त संबंधित अधिकारी / कर्मचारी यांच्या
वेतनातून वसुल केलेली थकीत कर्जाची रक्कम पुढील बँक खात्यात जमा करण्याबाबत
सुचित केले आहे. Account
Name: MAULANA AZAD ALPSANKHYANK ARTHIK
VIKAS MAHAMANDAL LTD Account No: 11265870539, IFSC CODE: SBIN0000433 Bank Name:
STATE BANK OF INDIA DOCTORS LANE NANDED एकुण 17 अर्जदारांकडील एकुण 26
लाख 59 हजार 648 रुपये थकीत आहेत, अशी माहिती नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाकडून
देण्यात आली आहे.
0000
No comments:
Post a Comment