Friday, August 2, 2019

जप्‍त रेती साठयाचा सोमवारी लिलाव



नांदेड, दि. 2 :- विनापरवानगी अनाधिकृत रेतीसाठा केल्‍याचे नांदेड तालुक्‍यात निदर्शनास आले आहे. या रेती साठा जप्‍त करुन त्‍याची ईटीएस मोजणी करण्‍यात आली आहे. या रेती साठयाचा लिलाव दुसरी फेरी व तिसरी अंतिम फेरी नांदेडचे उपविभागीय अधिकारी यांच्‍या अधिपत्‍याखाली सोमवार 5 ऑगस्ट 2019  रोजी सकाळी 11 वा. तहसिल कार्यालय नांदेड येथे घेण्‍यात येणार आहे.
हा रेती साठा पुढील ठिकाणी आहे. दुसरी फेरी मौ. नागापूर येथे 966 ब्रास, मौ. सिध्‍दनाथ 326 ब्रास साठा तर अंतिम तिसऱ्या फेरीत मौ. भनगी 1261 ब्रास, मौ.  गंगाबेट 730 ब्रास, मौ. नाळेश्‍वर 191 ब्रास रेती साठा असून एकुण 3 हजार 474 ब्रास रेतीसाठा उपलब्ध आहे. नांदेड तालुक्‍यातील  दर्शविलेल्‍या या ठिकाणी  रेतीसाठा गट नंबर निहाय असून तो आपण पाहुन तपासुन घेवुन लिलावात भाग घ्‍यावा. स्‍थळाचे ठिकाण असलेला साठा तपासुनच बोलीत भाग घ्‍यावा. अटी शर्ती बाबत माहिती या कार्यालयाचे गौण खनिज विभागात कार्यालयीन वेळेत पाहवयास मिळेल. संबंधीत नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन तहसिलदार नांदेड यांनी केले आहे.   
00000

No comments:

Post a Comment

  मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण २०२६ प्रारूप मतदार यादीत आजच आपले नाव तपासा मतदार मदत क्रमांक १८०० २२ १९५० वर संपर्क करा #मतदारय...