Saturday, April 7, 2018

मतदारांनी ओळखपत्रासाठी रंगीत फोटो बीएलओ,तहसिल कार्यालयाकडे जमा करावीत.

धर्माबाद:दिनांक-07/04/2018 

धर्माबाद तालुक्यातील ज्या मतदारांची मतदार यादीत फोटो नाहित व  मतदार ओळखपत्रात ब्लॅक & व्हाईट फोटो आहेत त्यांनी रंगीत फोटो  बीएलओ कडे  देवून उत्फुर्त प्रतिसाद दिला आहे.
     मतदार यादी शुध्दीकरण मोहिम आयोजीत केली असुन ज्या मतदारांचे मतदार यादीत फोटो नाहीत किंवा ब्लॅक & व्हाईट फोटो आहेत त्या मतदान केंद्रनिहाय बी.एल.ओ.यांचा दि 07 एप्रिल 2018 रोजी तहसिल येथे आढावा घेतला असता मास्टी येथील बी.एल.ओ.ए.डी.मंगनाळे,बाभळी येथील बी.एल.ओ.यादव चाबुकस्वार,रत्नाळी येथील बी.एल.ओ.जी.बी.मदनुरकर व नजिर शेख,विळेगांव थडी येथील बी.एल.ओ.एम.एन.हिमगिरे,
बाळापूर येथील बी.एल.ओ.भालके,करखेली येथील बी.एल.ओ.डहाळे व धर्माबाद येथील बी.एल.ओ.सोनार व सोनकांबळे तसेच बी.एल.ओ.यांचे पर्यवेक्षक तथा तलाठी नारायण गाजेवार,पवन देशपांडे,आंबेराय,विसपुते यांनी दोन दिवसात मतदार यांच्या कडे संपर्क साधून व प्रसिध्दी केल्यांने मतदार यांनी बी.एल.ओ. कडे रंगित फोटो गोळा केले.तालूक्यातील उर्वरित मतदार  यांचे बी.एल.ओ. यांनी  दि 11/04/2018 पुर्वी रंगित फोटो जमा करावेत असे बैठकीत नायब तहसीलदार सुनील माचेवाड यांनी सांगितले.

सदरिल मोहिम यशस्वी करण्यासाठी बीएलओ ,तलाठी,मंडळ अधिकारी व प्रेरक,तहसिल कार्यालयातील  मिलिंद टोणपे,ऑपरेटर मोहन भंडरवाड अदि परिश्रम घेत आहेत.    
                ....  तहसिलदार धर्माबाद

सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचा दौरा
नांदेड , ‍दि. 7 :- राज्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
सोमवार 9 एप्रिल 2018 रोजी कोनेरवाडी ता. पालम येथुन दुपारी 12 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. सायं. 6 वा. नांदेड येथून देवगिरी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण करतील.
000000


जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांना
अंमलबजावणी अधिकारी म्हणून अधिकार प्रदान
नांदेड, दि. 7 :- आगामी काळात शनिवार 14 एप्रिल 2018 रोजी बौद्ध बांधवाच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 127 वी जयंती साजरी करण्यात येणार आहे. तसेच सोमवार 30 एप्रिल 2018 रोजी बौद्ध पोर्णिमा आहे. त्याअर्थी वरील सर्व कार्यक्रम, मिरवणुका शांततेत पार पडावेत व त्यात कसल्याही प्रकारची बाधा येवू नये व जिल्हयात शांतता टिकुन राहावी म्हणुन पोलीस अधीक्षक चंद्र किशोर मीणा यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा अधिनियम 1951 प्रमाणे प्रदान झालेल्या अधिकारान्वे पुढील आदेश काढले आहेत.
गुरुवार 12 एप्रिल 2018 ते सोमवार 30 एप्रिल 2018 च्या मध्यरात्री पर्यंत नांदेड जिल्हयात सर्व पो.स्टे. स्वाधिन अधिकारी असलेले अमलदार किंवा वरीष्ठ अधिकाऱ्यांना महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 36 मधील पोट कलम "अ" ते "ई" प्रमाणे पुढील लेखी किंवा तोंडी आदेश आपआपले हद्दीत देण्याचा अधिकार प्रदान करण्यात आला आहे.
रस्त्यावरील व रस्त्यावरुन जाणाऱ्या मिरवणुकीतील किंवा जमावातील लोकांनी कोणत्या रितीने चालावे कोणत्या रितीने वागावे ते फर्माविण्यासाठी. अशा कोणत्याही मिरवणुकांना कोणत्या मार्गाने आणि कोणत्या वेळी जावे किंवा जाऊ नये हे ठरविण्याबद्दल. सर्व मिरवणुकी व जमावाच्या प्रसंगी व पुजे अर्चेच्या प्रार्थनास्थळांच्या सर्व जागेच्या आसपास पुजे-अर्चेच्या वेळी कोणताही रस्ता किंवा सार्वजनिक जागा येथे गर्दी होणार असेल किंवा अडथळे होण्याचा संभव असेल अशा सर्व बाबतीत अडथळा होण्याचा संबध असेल अशा सर्व बाबतीत अडथळा होऊ न देण्याबाबत. सर्व रस्त्यावर किंवा रस्त्यामध्ये सर्व धक्यावर व धक्यामध्ये आणि सार्वजनिक स्नांनाच्या कपडे धुण्याच्या व उतरण्याच्या जागेमध्ये व इतर कर्कश वाद्य वाजविणे वगैरेचे नियमन करण्याबद्दल आणि त्यावर नियत्रंण ठेवण्याबाबत. महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 33, 35 ते 40,42,43,45 या अन्वये नमुद केलेल्या कोणत्याही हुकूमापेक्षा कमी दर्जाचे व त्या पुष्टी देणारे दुय्यम अधिका-यांना जबाबदारीवर हुकूम करण्याचा मार्गदर्शन पर आदेश देण्याबाबत. तसेच सार्वजनिक ठिकाणी अथवा सार्वजनिक करमणुकीचे ठिकाणी ध्वनीक्षेपण आवाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी सुचना देण्यासंबधी.
हा आदेश लागू असेपर्यंत नांदेड जिल्हयात जाहिर सभा, मोर्चे, निदर्शने, पदयात्रा इत्यादी कार्यक्रम संबधीत पोलीस फौजदार किंवा त्यांच्या वरिष्ठांकडून तारीख व वेळ, सभेची जागा मिरवणुकीचा, मोर्चाचा मार्ग व त्यात दिल्या जाणाऱ्या घोषणा पुर्व परवानगी शिवाय आयोजित करु नयेत तसेच संबंधीत पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेले आदेशाचे पालन करावे.  जाहिर सभा, मिरवणुक पदयात्रा, समायोचीत घोषणा सोडून किंवा ज्या घोषणांनी शांतता व सुव्यवस्थेला बांधा येवु शकतो अशा घोषणा देऊ नयेत.
हा आदेश लग्नांच्या वरातीस, प्रेत यात्रेस लागु नाही. या आदेशाचे उल्लंघन केल्यास तो महाराष्ट्र पोलीस कलम 134 प्रमाणे अपराधास पात्र ठरेल. हा आदेश गुरुवार 12 एप्रिल 2017 ते सोमवार 30 एप्रिल 2018 रोजी मध्यरात्री पर्यंत लागू राहील, असे पोलीस अधीक्षक चंद्र किशोर मीणा यांनी आदेशात नमूद केले आहे.
00000000



महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती
साजरी करण्याचे आवाहन  
नांदेड, दि. 7 :- महात्मा ज्योतीबा फुले यांची जयंती संबंधित विभागाने उत्साहात साजरी करुन विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी नांदेड यांनी दिले आहेत.
थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म दिवस 11 एप्रिल 1827 असा आहे. त्यांची जयंती बुधवार 11 एप्रिल 2018 रोजी विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग कल्याण विभागातर्फे उत्साहात साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात विशेष मागासवर्ग प्रवर्ग कल्याण विभागाचे परिपत्रक 10 एप्रिल 2017 अन्वये दिलेल्या सुचनेनुसार योग्य कार्यवाही करुन त्याचा अहवाल शासनास व जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा. असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, आयुक्त मनपा नांदेड, समाज कल्याण अधिकारी जि. प., आयुक्त समाज कल्याण कार्यालय नांदेड यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार यांना दिले आहेत.   
000000


शेतकऱ्यांनी शेतात गाळ
टाकून जमीन सुपीक करावी
- उपजिल्हाधिकारी डॉ. खल्लाळ
नांदेड, दि. 7 :- धर्माबाद तालुक्यातील मालगुजारी तलावातील अनेक वर्षापासुन साचलेला सुपिक गाळ काढणे व पाणीटंचाईमुक्त गाव करण्याबाबत जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या प्रेरणेने गाळमुक्त तलाव व गाळयुक्त शिवार  अभियानांतर्गत जारिकोट मालगुजारी तलावातील गाळ  काढणे शुभारंभ धर्माबादचे उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नांदेडचे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पी. आर. फडणीस यांनी मार्गदर्शन केले.
जारिकोट येथील शेतकऱ्यांनी गाळ शेतात टाकण्यास सुरुवात करुन जमीन सुपिक व पाणी टंचाईमुक्त  करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. महसूल व कृषी उत्पन्न बाजार समिती धर्माबाद यांच्या संयुक्त विद्यमाने जारिकोट व चिकना येथे गाळ काढण्यात येत आहे. यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने दोन जेसीपी डिझेलसह दिले आहेत. जारिकोट व चिकना येथील जवळपासच्या शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरची व्यवस्था करुन मालगुजारी तलावातील काळी माती व  सुपिक गाळ शेतात टाकुन जमीन सुपीक करावी, असे आवाहन डॉ. खल्लाळ यांनी केले.
          कार्यक्रमास तहसिलदार धर्माबाद ज्योती चौहान, नायब तहसिलदार सुनिल माचेवाड, जलसंपदाचे उपविभागीय अभियंता प्रशांत कदम, धर्माबाद कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव सी. डी. पाटील, उपसचिव वैभव कुलकर्णी, सरपंच नागनाथ इंगळे, उपसरपंच संजय धुप्पे, आनुलोमचे रमेश कुंभारे, गजानन रामोड, चिकना येथील प्रगतशिल शेतकरी दत्ताहारी आवरे आदि उपस्थित होते.
000000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...