Wednesday, May 5, 2021

जिल्ह्यात 18 ते 44 वयोगटाच्या लसीकरणासाठी अकरा ठिकाणी लसीकरण केंद्र - जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे

                                                      जिल्ह्यात 18 ते 44 वयोगटाच्या लसीकरणासाठी

अकरा ठिकाणी लसीकरण केंद्र

-          जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे  

 

नांदेड (जिमाका) दि. 5 :-  18 ते 44 वयोगटातील व्यक्तींच्या कोरोना लसीकरणासाठी लसीचा पुरवठा आवश्यक असून सद्या नांदेड जिल्ह्यात पाच ठिकाणी लसीकरण केंद्रे सुरु करण्यात आले आहेत. जिल्हा रुग्णालय नांदेडशहरी आरोग्य केंद्र हैदरबाग नांदेडग्रामीण रुग्णालय धर्माबाद ता. धर्माबादप्राथमिक आरोग्य केंद्र तुप्पा, प्राथमिक आरोग्य केंद्र अर्धापूर येथे 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींना लसीकरण केले जात असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी        डॉ. बालाजी शिंदे यांनी दिली. लसीची उपलब्धता ज्या प्रमाणात वाढेल त्या प्रमाणात 18 ते 44 वयोगटातील व्यक्तीच्या लसीकरणाची केंद्रे वाढविण्यात येतील असे त्यांनी स्पष्ट केले.

1 मे2021 पासून 18 ते 44 वयोगटाच्या व्यक्तींना लसीकरणाची सुरुवात झाली असून जिल्हा रुग्णालय नांदेड येथे 860 लाभार्थ्यांनी शहरी आरोग्य केंद्र हैदरबाग येथे 901 ग्रामीण रुग्णालय धर्माबाद येथे 855 प्राथमिक आरोग्य केंद्र तुप्पा 947 प्राथमिक आरोग्य केंद्र अर्धापूर 877  येथे असे एकूण 4 हजार 440 लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. दिनांक 6 मे पासून यात शहरातील सहा नवीन आरोग्य केंद्रावर लसीकरणाची सुविधा उपलब्ध होत आहे. यात शहरी आरोग्य केंद्र कौठा, जंगमवाडी, शिवाजीनगर, शासकीय गुरु गोविंदसिंगजी मेडीकल कॉलेज विष्णुपुरी, शासकीय आयुर्वेदिक कॉलेज , स्त्री रुग्णालय, शामनगर या केंद्राचा समावेश आहे.

ग्रामीण भागात कोविड -19 प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक गावात ग्रामदक्षता समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. आपल्या गावात कोरोनाचा शिरकाव होणार नाही यासाठी ग्रामपंचायत व गावकऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. जनजागृतीसाठी ग्रामीण भागात महाआरोग्य संवाद अभियानाद्वारे प्रचार व प्रसिध्दीसाठी चित्ररथ व विविध माध्यमांचा वापर केला जात आहे. याद्वारे ' माझे कुटूंब माझी जबाबदारी ' व ' मी जबाबदार ' ही मोहिम राबविली जात असल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले.

तापकोरडा खोकला‍ किंवा श्वास घेण्यास त्रास अशी कांही लक्षणे असल्यास आरटीपीसीआर किंवा अँन्टिजेन तपासणी करुन घेण्याचे आवाहन गावोगावी केले जात आहे. वारंवार हात पाणी व साबण वापरुन स्वच्छ धुणेसुरक्षित अंतर राखणेस्वत: आणि इतरामध्ये कमीत - कमी एक मिटर ( 3 फुट) अंतर ठेवा. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळाडोळेनाक आणि तोंडाला स्पर्श करणे टाळामास्क वापरणेश्वसनासंबंधी शिष्टाचार पाळाजेंव्हा आपल्याला खोकलाशिंक येत तेंव्हा आपल्या तोंडावर व नाकावर रुमाल वापरणे. आपले हात धुणे आवश्यक आहे.  

0000

 

 

1 हजार 256 कोरोना बाधित झाले बरे नांदेड जिल्ह्यात 422 व्यक्ती कोरोना बाधित 12 जणांचा मागील तीन दिवसांत मृत्यू

                                  1 हजार 256 कोरोना बाधित झाले बरे

नांदेड जिल्ह्यात 422 व्यक्ती कोरोना बाधित

 12 जणांचा मागील तीन दिवसांत मृत्यू

कोरोनाबाबत जनजागृतीसाठी जागरुक नागरिकांना योगदान देण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 5 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 2 हजार 268 अहवालापैकी 422 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 312  तर अँटिजेन तपासणीद्वारे 110 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 82  हजार 298 एवढी झाली असून यातील 73 हजार  565  रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला  7  हजार  412  रुग्ण उपचार घेत असून 203 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

दिनांक 3 ते 5 मे या तीन दिवसांच्या कालावधीत 12  रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या 1 हजार 651 एवढी झाली आहे. दिनांक 3 मे रोजी देगलूर कोविड रुग्णालय येथे किनी तालुका देगलूर येथील 78 वर्षाची महिला, नारायणा कोविड रुग्णालय येथे लोंडेसांगवी तालुका लोहा येथील 78 वर्षाचा पुरुष 4 मे रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथील भावसार चौक येथील 63 वर्षाचा पुरुष, कंधार येथील 85 वर्षाची महिला, लोहा येथील 70 वर्षाची महिला, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे अंबाडी तालुका किनवट येथील 70 वर्षाचा पुरुष, देगलूर कोविड रुग्णालय येथे येरगी तालुका देगलूर येथील 60 वर्षाचा पुरुष, श्री गणेशा कोविड रुग्णालय येथे रुई तालुका हदगाव येथील 65 वर्षाची महिला दि. 5 मे रोजी जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथील बंदरी तालुका भोकर येथील 55 वर्षाचा पुरुष, धर्माबाद येथील 38 वर्षाचा पुरुष, हदगाव येथील 48 वर्षाचा पुरुष, नायगाव येथील 50 वर्षाचा पुरुष यांचा समावेश आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 88.74 टक्के आहे.

 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 104, बिलोली 12, लोहा 12, नायगाव 18, बिदर 1, नांदेड ग्रामीण 17, हदगाव 24, माहूर 1, उमरी 18, वाशिम 1, अर्धापूर 10, हिमायतनगर 19, मुदखेड 8, परभणी 8, यवतमाळ 2, भोकर 13, कंधार 16, मुखेड 19, हिंगोली 8, झारखंड 1 असे एकूण 312 बाधित आढळले.

 

आजच्या बाधितांमध्ये ॲन्टिजेन तपासणीद्वारे मनपा क्षेत्रात 17, बिलोली 4, हिमायतनगर 6,  माहूर 7, उमरी 2 , नांदेड ग्रामीण 6, देगलूर 5, कंधार 4, मुखेड 2, हिंगोली 2, अर्धापूर 3, धर्माबाद 21, किनवट 10, नायगाव 2, परभणी 1, भोकर 4, हदगाव 4, लोहा 3, मुदखेड 7  व्यक्ती असे एकूण अँन्टिजेन तपासणीद्वारे 110 बाधित आढळले.

 

आज जिल्ह्यातील 1 हजार 256 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 16, मनपाअंतर्गत एनआरआय भवन व गृहविलगीकरण 753, धमार्बाद तालुक्यातंर्गत 20, देगलूर कोविड रुग्णालय 12, अर्धापूर तालुक्यातंर्गत 20, उमरी तालुक्यातंर्गत 35, माहूर तालुक्यातर्गंत 9, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 21, मुखेड कोविड रुग्णालय 36, मुदखेड कोविड केअर सेंटर 15, किनवट कोविड रुग्णालय 34, हिमायतनगर तालुक्यातर्गंत 35, बिलोली तालुक्यातंर्गत 9, खाजगी रुग्णालय 160, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 13, हदगाव कोविड रुगणालय 6, कंधार तालुक्यातर्गत 28, मांडवी कोविड केअर सेंटर 8, लोहा तालुक्यातर्गंत 25, बारड कोविड केअर सेटर 1 असे एकूण 1 हजार 256 बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली .   

 

आज 7 हजार 412 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचारानंतर सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय 125जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 83जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल ( नवी इमारत) 156शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 33, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 64, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 69, देगलूर कोविड रुग्णालय 19, जैनब कोविड हॉस्पिटल व कोविड केअर देगलूर 13, बिलोली कोविड केअर सेंटर 87, नायगाव कोविड केअर सेंटर 9उमरी कोविड केअर सेंटर 34माहूर कोविड केअर सेंटर 29भोकर कोविड केअर सेंटर 5हदगाव कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 31, लोहा कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 35, कंधार कोविड केअर सेंटर 17, धर्माबाद कोविड केअर सेंटर 37 , मुदखेड कोविड केअर सेंटर 8, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 3, अर्धापूर कोविड केअर सेंटर 14, बारड कोविड केअर सेंटर 28, मांडवी कोविड केअर सेंटर 6, मालेगाव टिसीयु कोविड रुग्णालय 7, भक्ती जंम्बो कोविड केअर सेंटर 33एनआरआय कोविड केअर सेंटर 46पंजाब भवन कोविड केअर सेंटर 14 ,  नांदेड मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 2 हजार 544, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातंर्गत गृहविलगीकरण 2 हजार 298, खाजगी रुग्णालय 1 हजार 565 असे एकूण 7 हजार 412 उपचार घेत आहेत. 

 

आज रोजी सांयकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 40, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 20, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे 58 भक्ती जम्बो कोविड केअर सेंटर 25  खाटा उपलब्ध आहेत.

 

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 4 लाख 73 हजार 60

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 3 लाख 80हजार 338

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 82 हजार 898

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 73  हजार 565

एकुण मृत्यू संख्या-1 हजार 651

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 88.74 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-12

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-20

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-376

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 7 हजार 412

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-203

00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...