Wednesday, May 5, 2021

जिल्ह्यात 18 ते 44 वयोगटाच्या लसीकरणासाठी अकरा ठिकाणी लसीकरण केंद्र - जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे

                                                      जिल्ह्यात 18 ते 44 वयोगटाच्या लसीकरणासाठी

अकरा ठिकाणी लसीकरण केंद्र

-          जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे  

 

नांदेड (जिमाका) दि. 5 :-  18 ते 44 वयोगटातील व्यक्तींच्या कोरोना लसीकरणासाठी लसीचा पुरवठा आवश्यक असून सद्या नांदेड जिल्ह्यात पाच ठिकाणी लसीकरण केंद्रे सुरु करण्यात आले आहेत. जिल्हा रुग्णालय नांदेडशहरी आरोग्य केंद्र हैदरबाग नांदेडग्रामीण रुग्णालय धर्माबाद ता. धर्माबादप्राथमिक आरोग्य केंद्र तुप्पा, प्राथमिक आरोग्य केंद्र अर्धापूर येथे 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींना लसीकरण केले जात असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी        डॉ. बालाजी शिंदे यांनी दिली. लसीची उपलब्धता ज्या प्रमाणात वाढेल त्या प्रमाणात 18 ते 44 वयोगटातील व्यक्तीच्या लसीकरणाची केंद्रे वाढविण्यात येतील असे त्यांनी स्पष्ट केले.

1 मे2021 पासून 18 ते 44 वयोगटाच्या व्यक्तींना लसीकरणाची सुरुवात झाली असून जिल्हा रुग्णालय नांदेड येथे 860 लाभार्थ्यांनी शहरी आरोग्य केंद्र हैदरबाग येथे 901 ग्रामीण रुग्णालय धर्माबाद येथे 855 प्राथमिक आरोग्य केंद्र तुप्पा 947 प्राथमिक आरोग्य केंद्र अर्धापूर 877  येथे असे एकूण 4 हजार 440 लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. दिनांक 6 मे पासून यात शहरातील सहा नवीन आरोग्य केंद्रावर लसीकरणाची सुविधा उपलब्ध होत आहे. यात शहरी आरोग्य केंद्र कौठा, जंगमवाडी, शिवाजीनगर, शासकीय गुरु गोविंदसिंगजी मेडीकल कॉलेज विष्णुपुरी, शासकीय आयुर्वेदिक कॉलेज , स्त्री रुग्णालय, शामनगर या केंद्राचा समावेश आहे.

ग्रामीण भागात कोविड -19 प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक गावात ग्रामदक्षता समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. आपल्या गावात कोरोनाचा शिरकाव होणार नाही यासाठी ग्रामपंचायत व गावकऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. जनजागृतीसाठी ग्रामीण भागात महाआरोग्य संवाद अभियानाद्वारे प्रचार व प्रसिध्दीसाठी चित्ररथ व विविध माध्यमांचा वापर केला जात आहे. याद्वारे ' माझे कुटूंब माझी जबाबदारी ' व ' मी जबाबदार ' ही मोहिम राबविली जात असल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले.

तापकोरडा खोकला‍ किंवा श्वास घेण्यास त्रास अशी कांही लक्षणे असल्यास आरटीपीसीआर किंवा अँन्टिजेन तपासणी करुन घेण्याचे आवाहन गावोगावी केले जात आहे. वारंवार हात पाणी व साबण वापरुन स्वच्छ धुणेसुरक्षित अंतर राखणेस्वत: आणि इतरामध्ये कमीत - कमी एक मिटर ( 3 फुट) अंतर ठेवा. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळाडोळेनाक आणि तोंडाला स्पर्श करणे टाळामास्क वापरणेश्वसनासंबंधी शिष्टाचार पाळाजेंव्हा आपल्याला खोकलाशिंक येत तेंव्हा आपल्या तोंडावर व नाकावर रुमाल वापरणे. आपले हात धुणे आवश्यक आहे.  

0000

 

 

No comments:

Post a Comment

 भोकर विधानसभा क्षेत्रातून भाजपाच्या उमेदवार श्रीजया अशोकराव चव्हाण या विजयी झाल्यात. निवडणूक निर्णय अधिकारी श्री. प्रवीण मेगशेट्टी यांनी त्...