Wednesday, March 2, 2022

 नांदेड जिल्ह्यात 3 व्यक्ती कोरोना बाधित

तर 5 कोरोना बाधित झाले बरे 

नांदेड (जिमाका) दि.  2 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 775 अहवालापैकी 3 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 3 तर अँटिजेन तपासणीद्वारे निरंक अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 2 हजार 763 एवढी झाली असून यातील 1 लाख 51 हजार रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 22 रुग्ण उपचार घेत असून यात 2 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे.  

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 690 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे माहूर 1, भोकर 1, मुदखेड 1 असे एकुण 3 कोरोना बाधित आढळले आहे.  

आज नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरणातील 2, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 3 असे एकुण 5 कोरोना बाधितांना औषध उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली.  

उपचार घेत असलेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी 4, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गत गृह विलगीकरण 4, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 13, खाजगी रुग्णालय 1 असे एकुण 22 व्यक्ती उपचार घेत आहेत.  

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 8 लाख 77 हजार 962

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 58 हजार 251

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 लाख 2 हजार 763

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 1 लाख 51

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 690

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.36 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-1

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-8

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-22

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-2.  

कोरोना विषाणुची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुन: येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधीनंतर दुसऱ्या लसीचा डोस अवश्य घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

000000

 किमान आधारभूत किंमत खरेदी 

योजनेअंतर्गत चणा खरेदीस प्रारंभ  

   

नांदेड (जिमाका) दि. 28 :- किमान आधारभूत किंमत खरेदी  योजने अंतर्गत जिल्हा पणन कार्यालयामार्फत 2021-22 हंगाम नांदेड जिल्ह्यात नऊ ठिकाणी हमीभावाने चणा खरेदी करण्यासाठी मंगळवार 1 मार्च 2022 पासून खरेदीस सुरूवात झाली आहे. चालु हंगामासाठी चण्याचा हमीभाव प्रती क्विंटल 5 हजार 230 रूपये असून कृषी  विभागामार्फत उत्पादकतेनुसार 11.50 क्विंटल प्रती हेक्टर प्रमाणे हरभरा खरेदी सुरू आहे.

 

चणा खरेदी नांदेड येथे जिल्हा फळे व भाजीपाला सहकारी संस्था केळी  मार्केट इतवारा नांदेड (अर्धापूर), ता.ख.वि.संघ मुखेडता.ख.वि.संघ हदगावकृ.उ.बा.समिती किनवटता.ख.वि.सह संघ बिलोली (कासराळी), पंडित दी.उ.अ.संह संस्था देगलूरता.ख.वि संघ लोहा, कृषी माल प्रक्रिया संह संस्था गणेशपूर ता.किनवटमृष्णेश्वर संह संस्था  जाहुर-बिल्लाळी ता.मुखेड या नऊ ठिकाणी सुरू करण्यात आली आहे.

 

खरेदी केंद्रावर हरभरा आणताना तो चागल्याप्रकारे वाळूनचाळणी  करूनएफ.ए.क्यू प्रतिचा  आणणे आवश्यक आहे. सर्व शेतकरी बांधवांनी चणा खरेदीसाठी संस्थेकडून पाठविलेल्या एसएमएस नुसार चणा खरेदी केंद्रावर आणावा. काही अडचण असल्यास 8108182948,9422994758 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावाअसे आवाहन जिल्हा पणन अधिकारी सुधीर पाटील यांनी  केले आहे.

000000

समाज कल्याण कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडावंदन   नांदेड दि. 26 जानेवारी : भारताचा 76 वा प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारी रोजी स...