Wednesday, March 2, 2022

 किमान आधारभूत किंमत खरेदी 

योजनेअंतर्गत चणा खरेदीस प्रारंभ  

   

नांदेड (जिमाका) दि. 28 :- किमान आधारभूत किंमत खरेदी  योजने अंतर्गत जिल्हा पणन कार्यालयामार्फत 2021-22 हंगाम नांदेड जिल्ह्यात नऊ ठिकाणी हमीभावाने चणा खरेदी करण्यासाठी मंगळवार 1 मार्च 2022 पासून खरेदीस सुरूवात झाली आहे. चालु हंगामासाठी चण्याचा हमीभाव प्रती क्विंटल 5 हजार 230 रूपये असून कृषी  विभागामार्फत उत्पादकतेनुसार 11.50 क्विंटल प्रती हेक्टर प्रमाणे हरभरा खरेदी सुरू आहे.

 

चणा खरेदी नांदेड येथे जिल्हा फळे व भाजीपाला सहकारी संस्था केळी  मार्केट इतवारा नांदेड (अर्धापूर), ता.ख.वि.संघ मुखेडता.ख.वि.संघ हदगावकृ.उ.बा.समिती किनवटता.ख.वि.सह संघ बिलोली (कासराळी), पंडित दी.उ.अ.संह संस्था देगलूरता.ख.वि संघ लोहा, कृषी माल प्रक्रिया संह संस्था गणेशपूर ता.किनवटमृष्णेश्वर संह संस्था  जाहुर-बिल्लाळी ता.मुखेड या नऊ ठिकाणी सुरू करण्यात आली आहे.

 

खरेदी केंद्रावर हरभरा आणताना तो चागल्याप्रकारे वाळूनचाळणी  करूनएफ.ए.क्यू प्रतिचा  आणणे आवश्यक आहे. सर्व शेतकरी बांधवांनी चणा खरेदीसाठी संस्थेकडून पाठविलेल्या एसएमएस नुसार चणा खरेदी केंद्रावर आणावा. काही अडचण असल्यास 8108182948,9422994758 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावाअसे आवाहन जिल्हा पणन अधिकारी सुधीर पाटील यांनी  केले आहे.

000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...