Saturday, June 15, 2019

आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त आयोजित शिबिरात सर्वांनी कुटुंबासह सहभागी व्हावे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांचे आवाहन


नांदेड दि. 15 :- योगऋषि स्वामी रामदेवजी महाराज व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवार 21 जून 2019 रोजी सकाळी 5 ते 7.30 यावेळेत मामा चौक असर्जन कौठा नांदेड येथे आंतरराष्ट्रीय योगदिन समारोहात उपस्थित राहून गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये नाव नोंदवून विश्वपटलावर नांदेडचा व देशाचा सन्मान वाढणार आहे.
भारतासहित संपूर्ण जगात शंभर कोटीपेक्षा जास्त लोकांपर्यंत व जवळजवळ दोनशे देशांमध्ये योगाचा संदेश पोहचविणारे योगगुरु स्वामी रामदेवजी यांच्या सानिध्यात व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आयोजित शिबिरात आरोग्याबरोबरच कौटुंबिक व सामाजिक मार्गदर्शन प्राप्त करुन घेऊन योगाचा प्रचार व प्रसार करुन योगाचा इतिहास घडवू या. तेंव्हा जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांनी आपल्या अधिनस्त कर्मचारी व कुटंबासहीत उपस्थित रहावे.
योग शिबिरात पतंजली योगपीठ हरिद्वार या संस्थेच्या प्रशिक्षित वैद्यकीय पथकाकडून नि:शुल्क चिकित्सा व मार्गदर्शन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. राज्य शासन व पतंजली योगपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित शिबिरात आपण सर्वजन कुटूंबासह सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे.
000000

अपहरीत मुलीचा शोध



नांदेड, दि. 15 :- कंधार तालुक्यातील बहादरपुरा गायकवाड गल्लीत राहणारी शितल नागोराव गायकवाड (वय 14) ही मुलगी  26 ऑक्टोंबर 2018 रोजी त्या गल्लीतील राहणारा पप्पु रामराव जोगले याने अज्ञात कारणासाठी पळवून नेले आहे, अशी फिर्यादी नागोराव गायकवाड यांनी पोलीस स्टेशन कंधार येथे दिली आहे.
अपहरीत शितल गायकवाड या मुलीचा रंग सावळा असून उंची 148 सेमी आहे. शिक्षण- चौथी, पोषाख- पोपटी कलरचा पंजाबी ड्रेस, बांधा- सडपातळ, चेहरा- गोल, केस- काळे व लांब, भाषा मराठी स्पष्ट बोलता येते. या वर्णनाची सदर मुलगी मिळाल्यास कंधार पोलीस स्टेशनचा दूरध्वनी क्र. 02466-223433, पो. स्टे. प्रभारी- 7770034777, अंमलदार 9922010933 या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन कंधार पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक टी. वाय. चिट्टेवार यांनी केले आहे.
0000

महिला लोकशाही दिनी अर्ज करण्याचे आवाहन



नांदेड, दि. 15 :- समस्याग्रस्त व पिडीत महिलांनी सोमवार 17 जून 2019 रोजी महिला लोकशाही दिनी आपले अर्ज विहित नमुन्यात सादर करावे, असे आवाहन जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी नांदेड व सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन घेण्यात येतो. सोमवार 17 जून 2019 रोजी सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय परिसर नांदेड येथे महिला लोकशाही दिन होणार आहे. संबंधीत समितीचे सदस्य व शासन निर्णयात नमुद संबंधीत विभागाचे अधिकारी यांनी उपस्थित रहावे, असेही आवाहन सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे. 
0000

शिवछत्रपती क्रीडापीठांतर्गत क्रीडा प्रबोधिनीत सरळ प्रवेशासाठी आवाहन



नांदेड दि. 15 :- आयुक्त, क्रीडा व युवक सेवा पुणे यांच्यावतीने सन 2019-20 या वर्षाकरीता राज्यातील एकुण 11 क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रवेशाकरीता सरळ प्रवेश प्रक्रिया व खेळनिहाय कौशल्य चाचणी अंतर्गत प्रवेश देण्यासाठी मान्यता प्रदान झाली आहे. या चाचणीसाठी नांदेड जिल्हयातील जास्तीतजास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार यांनी केले आहे.
त्यानूसार सदर चाचण्यांचा कार्यक्रम पुढील प्रमाणे निश्चित करण्यात आला आहे. सरळ प्रवेश प्रक्रिया- क्रीडा प्रबोधिनीतील असलेल्या संबंधीत खेळात राज्यस्तरावर पदक प्राप्त केलेले खेळाडू किंवा राष्ट्रीय स्तरावर राज्याचे प्रतिनिधीत्व केलेले खेळाडू ज्यांचे वय 19 वर्षे आतील आहे. अशा खेळाडूंना संबंधित खेळबाबतची चाचणी तज्ज्ञ समिती समक्ष देऊन प्रवेश निश्चित केला जातो.
खेळाडू सोमवार 24 जुन 2019  रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत चाचणी स्थळी उपस्थित राहणे आवश्यक आहे. चाचणी कालावधी 24 ते 25 जुन 2019 - खेळप्रकार (कंसात चाचणी स्थळ) - आर्चरी (क्रीडा प्रबोधिनी अमरावती), हॅण्डबॉल (क्रीडा प्रबोधिनी नागपूर), बॉक्सिंग (क्रीडा प्रबोधिनी अकोला),  ॲथलेटिक्स, जलतरण, सायकलींग, शुटींग, ज्युदो, फुटबॉल, हॉकी, बॅडमिंटन, टेबल टेनिस, कुस्ती, वेटलिफटींग (शिवछत्रपती क्रीडापीठ बालेवाडी-म्हाळुंगे पुणे).
खेळनिहाय कौशल्य चाचणी - क्रीडा प्रबोधिनीतील असलेल्या सबंधित खेळात राज्यस्तरावर सहभागी खेळाडूंना ज्यांचे वय 19 वर्षाआतील आहे अशा खेळाडूंना संबंधित खेळाच्या  खेळनिहाय कौशल्य चाचणीचे आयोजन करुन गुणनुक्रमे प्रवेश निश्चित केला जातो.
खेळनिहाय कौशल्य चाचणी प्रवेश राबविण्याचा प्रस्तावित कार्यक्रम - खेळाडू मंगळवार 25 जुन 2019 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत चाचणी स्थळी उपस्थित राहणे आवश्यक आहे. चाचणी कालावधी 24 ते 25 जुन 2019 - चाचणी कालावधी 25 ते 26 जुन 2019 - खेळप्रकार (कंसात चाचणी स्थळ) - आर्चरी (क्रीडा प्रबोधिनी अमरावती), हॅण्डबॉल (क्रीडा प्रबोधिनी नागपूर), बॉक्सिंग (क्रीडा प्रबोधिनी अकोला),  ॲथलेटिक्स, जलतरण, सायकलींग, शुटींग, ज्युदो, फुटबॉल, हॉकी, बॅडमिंटन, टेबल टेनिस, कुस्ती, वेटलिफटींग (शिवछत्रपती क्रीडापीठ बालेवाडी-म्हाळुंगे पुणे).
याप्रमाणे नमूद केल्यानुसार सरळ प्रवेश व खेळनिहाय कौशल्य चाचण्यासाठी येणा-या खेळाडूंची निवास व भोजन व्यवस्था स्वत: करावी लागेल. या चाचणीकरीता उपस्थित राहण्याअगोदर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड येथे अनिल बंदेल  राज्य क्रीडा मार्गदर्शक यांच्याकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे. चाचणीस जाताना खेंळाडूनी प्रवेश व संबधित स्पर्धेचे प्राविण्य / सहभाग प्रमाणपत्र  चाचणी स्थळी उपस्थितीच्या दिनांकास सादर करावे. क्रीडा गणवेश, आंथरुण, पांघरण, इत्यादी साहित्य सोबत असणे आवश्यक आहे.
000000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...