Saturday, June 15, 2019

शिवछत्रपती क्रीडापीठांतर्गत क्रीडा प्रबोधिनीत सरळ प्रवेशासाठी आवाहन



नांदेड दि. 15 :- आयुक्त, क्रीडा व युवक सेवा पुणे यांच्यावतीने सन 2019-20 या वर्षाकरीता राज्यातील एकुण 11 क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रवेशाकरीता सरळ प्रवेश प्रक्रिया व खेळनिहाय कौशल्य चाचणी अंतर्गत प्रवेश देण्यासाठी मान्यता प्रदान झाली आहे. या चाचणीसाठी नांदेड जिल्हयातील जास्तीतजास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार यांनी केले आहे.
त्यानूसार सदर चाचण्यांचा कार्यक्रम पुढील प्रमाणे निश्चित करण्यात आला आहे. सरळ प्रवेश प्रक्रिया- क्रीडा प्रबोधिनीतील असलेल्या संबंधीत खेळात राज्यस्तरावर पदक प्राप्त केलेले खेळाडू किंवा राष्ट्रीय स्तरावर राज्याचे प्रतिनिधीत्व केलेले खेळाडू ज्यांचे वय 19 वर्षे आतील आहे. अशा खेळाडूंना संबंधित खेळबाबतची चाचणी तज्ज्ञ समिती समक्ष देऊन प्रवेश निश्चित केला जातो.
खेळाडू सोमवार 24 जुन 2019  रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत चाचणी स्थळी उपस्थित राहणे आवश्यक आहे. चाचणी कालावधी 24 ते 25 जुन 2019 - खेळप्रकार (कंसात चाचणी स्थळ) - आर्चरी (क्रीडा प्रबोधिनी अमरावती), हॅण्डबॉल (क्रीडा प्रबोधिनी नागपूर), बॉक्सिंग (क्रीडा प्रबोधिनी अकोला),  ॲथलेटिक्स, जलतरण, सायकलींग, शुटींग, ज्युदो, फुटबॉल, हॉकी, बॅडमिंटन, टेबल टेनिस, कुस्ती, वेटलिफटींग (शिवछत्रपती क्रीडापीठ बालेवाडी-म्हाळुंगे पुणे).
खेळनिहाय कौशल्य चाचणी - क्रीडा प्रबोधिनीतील असलेल्या सबंधित खेळात राज्यस्तरावर सहभागी खेळाडूंना ज्यांचे वय 19 वर्षाआतील आहे अशा खेळाडूंना संबंधित खेळाच्या  खेळनिहाय कौशल्य चाचणीचे आयोजन करुन गुणनुक्रमे प्रवेश निश्चित केला जातो.
खेळनिहाय कौशल्य चाचणी प्रवेश राबविण्याचा प्रस्तावित कार्यक्रम - खेळाडू मंगळवार 25 जुन 2019 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत चाचणी स्थळी उपस्थित राहणे आवश्यक आहे. चाचणी कालावधी 24 ते 25 जुन 2019 - चाचणी कालावधी 25 ते 26 जुन 2019 - खेळप्रकार (कंसात चाचणी स्थळ) - आर्चरी (क्रीडा प्रबोधिनी अमरावती), हॅण्डबॉल (क्रीडा प्रबोधिनी नागपूर), बॉक्सिंग (क्रीडा प्रबोधिनी अकोला),  ॲथलेटिक्स, जलतरण, सायकलींग, शुटींग, ज्युदो, फुटबॉल, हॉकी, बॅडमिंटन, टेबल टेनिस, कुस्ती, वेटलिफटींग (शिवछत्रपती क्रीडापीठ बालेवाडी-म्हाळुंगे पुणे).
याप्रमाणे नमूद केल्यानुसार सरळ प्रवेश व खेळनिहाय कौशल्य चाचण्यासाठी येणा-या खेळाडूंची निवास व भोजन व्यवस्था स्वत: करावी लागेल. या चाचणीकरीता उपस्थित राहण्याअगोदर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड येथे अनिल बंदेल  राज्य क्रीडा मार्गदर्शक यांच्याकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे. चाचणीस जाताना खेंळाडूनी प्रवेश व संबधित स्पर्धेचे प्राविण्य / सहभाग प्रमाणपत्र  चाचणी स्थळी उपस्थितीच्या दिनांकास सादर करावे. क्रीडा गणवेश, आंथरुण, पांघरण, इत्यादी साहित्य सोबत असणे आवश्यक आहे.
000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...