Saturday, June 15, 2019

आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त आयोजित शिबिरात सर्वांनी कुटुंबासह सहभागी व्हावे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांचे आवाहन


नांदेड दि. 15 :- योगऋषि स्वामी रामदेवजी महाराज व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवार 21 जून 2019 रोजी सकाळी 5 ते 7.30 यावेळेत मामा चौक असर्जन कौठा नांदेड येथे आंतरराष्ट्रीय योगदिन समारोहात उपस्थित राहून गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये नाव नोंदवून विश्वपटलावर नांदेडचा व देशाचा सन्मान वाढणार आहे.
भारतासहित संपूर्ण जगात शंभर कोटीपेक्षा जास्त लोकांपर्यंत व जवळजवळ दोनशे देशांमध्ये योगाचा संदेश पोहचविणारे योगगुरु स्वामी रामदेवजी यांच्या सानिध्यात व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आयोजित शिबिरात आरोग्याबरोबरच कौटुंबिक व सामाजिक मार्गदर्शन प्राप्त करुन घेऊन योगाचा प्रचार व प्रसार करुन योगाचा इतिहास घडवू या. तेंव्हा जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांनी आपल्या अधिनस्त कर्मचारी व कुटंबासहीत उपस्थित रहावे.
योग शिबिरात पतंजली योगपीठ हरिद्वार या संस्थेच्या प्रशिक्षित वैद्यकीय पथकाकडून नि:शुल्क चिकित्सा व मार्गदर्शन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. राज्य शासन व पतंजली योगपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित शिबिरात आपण सर्वजन कुटूंबासह सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे.
000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...