Wednesday, July 22, 2020

वृत्त क्र. 675


 नांदेड जिल्ह्यात गत 24 तासात
सरासरी 17.02 मि.मी. पाऊस
नांदेड (जिमाका) दि. 23 :- जिल्ह्यात गुरुवार 23 जुलै 2020 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 17.02 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून दिवसभरात एकूण 272.32 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 360.96 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत 40.50 टक्के एवढा पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात 23 जुलै रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे कंसात एकूण पाऊस : नांदेड- 8.38 (420.71), मुदखेड- 21.33 (276.33), अर्धापूर- 4.67 (353.00), भोकर- 29.25 (388.23), उमरी- 16.00 (254.63), कंधार- 3.83 (272.50), लोहा- 2.50 (343.66), किनवट- 50.29 (412.96), माहूर- 46.25 (363.00), हदगाव- 29.43 (355.72), हिमायतनगर- 43.67 (572.66), देगलूर- 00.50 (347.27), बिलोली- निरंक (324.40), धर्माबाद- 10.33 (373.65), नायगाव- 5.60 (326.40), मुखेड- 0.29 (390.27). आज अखेर पावसाची सरासरी 360.96 (चालू वर्षाचा एकूण पाऊस 5775.39) मिलीमीटर आहे.
000000




कोरोना बाधितांचा संख्या कमी करण्यासाठी
सर्वेक्षण व तपासण्या काटेकोर होणे अत्यावश्यक
- जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर
नांदेड (जिमाका) दि. 22 :- जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या व मृत्यूदर कमी करण्यासाठी गावनिहाय सर्वेक्षण व तपासण्या वाढविण्यात आल्या असून जनतेने तपासणीसाठी पुढे येऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले. गावपातळीवर कोरोना सर्वेक्षण करण्यासाठी ज्यांना जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आहेत त्यांनी काटेकोरपणे आपली जबाबदारी पार पाडावी, असे निर्देशही डॉ. विपीन यांनी दिले. होमक्वांरटाईन असल्याने त्यांनी आरोग्य सुविधाबाबत झूम मिटिंगवर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांशी संवाद साधून सविस्तर आढावा घेतला.
यावेळी मनपा आयुक्त सुनिल लहाने, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, अप्पर जिल्हाधिकारी आर. के. परदेशी, उपजिल्हाधिकारी डॉ. प्रशांत शेळके, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, मुख्याधिकारी नगर परिषद नगरपंचायत, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय तसेच सध्या होम क्वारंटाईन असलेल्या अधिकाऱ्यांनी या  झुमॲपद्वारे सहभाग घेतला होता.
जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर म्हणाले, सर्व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी ग्रामीण भागातील आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, शिक्षकांचा समावेश करुन पथके तयार करण्यात यावीत. या पथकांमार्फत गावनिहाय सर्वे करावा. या सर्वेक्षणात 50 वर्षे वयाच्या वरील व्यक्तींना ताप, सर्दी किंवा कोरोना आजाराचे सुक्ष्म लक्षणे असलेल्यांचे स्वॅब तपासणीसाठी घ्यावीत. कोरोना बाधित आढळल्यास त्यांना तात्काळ उपचारासाठी दाखल करावे. जिल्ह्यात जास्तीतजास्त तपासण्या वाढविण्याचा प्रयत्न असून त्याबाबतचा अहवाल दररोज देण्यात यावा, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
 तालुकास्तरावरील खाजगी प्रॅक्टीस करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे नावे रितसर जिल्हाधिकारी कार्यालयास पाठविल्यानंतर त्यांच्या सेवा उपलब्ध करुन घेता येतील. आरोग्य तपासणीतून जास्तीतजास्त लोकांचे प्राण वाचविण्यास मदत होणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यात आशा वर्कर यांना थर्मल गन व पल्स मिटर उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांच्याकडून तालुकानिहाय आढावा घेतला. जिल्ह्यातील कोविड केअर सेंटर मधील सुविधांबाबत संबधित अधिकाऱ्यांनी वेळोवेळी आवश्यक त्या उपाय योजना करुन कोविड  केअर सेंटरला भेटी देवून तेथील व्यवस्थेबाबत लक्ष ठेवावे. कोरोना काळात केलेल्या चुकांची गय केली जाणार नसून वेळेप्रसंगी संबंधितांवर गुन्हाही दाखल केला जाईल, असेही निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी यावेळी दिले.
00000


वृत्त क्र. 673   
पंडीत दीनदयाल उपाध्याय
रोजगार मेळाव्याचे ऑनलाईन आयोजन
नांदेड (जिमाका) दि. 22 :- कोरोनाच्या वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता जिल्हयातील बेरोजगार उमेदवारांना तसेच स्थलांतरित परराज्य व जिल्हयातून परत आलेल्या मजुर कामगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने येत्या 27 28 जुलै रोजी दोन दिवसांचे पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले आहे. बेरोजगारांनी www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करुन या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त प्रशांत खंदारे यांनी केले आहे.
नामांकित कंपनीच्यावतीने बेरोजगार उमेदवारांना या मेळाव्यात रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी ऑनलाईन मुलाखती घेण्यात येणार आहेत. किमान शैक्षणिक पात्रता दहावी, बारावी व कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या रोजगार मेळाव्यास जास्तीतजास्त ऑनलाईन अर्ज करावेत. कंपनीचे प्रतिनिधी आपल्याशी ऑनलाईन (स्काईप, व्हॉटसॲप ईव्दारे) संपर्क साधून आपली ऑनलाईन मुलाखत घेतील. अधिक माहितीसाठी रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचा दुरध्वनी क्रमांक (02462)-251674 वर सपंर्क साधवा.
कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या http://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर रोजगार इच्छूक उमेदवारांना जॉब सिकर ऑप्शनमध्ये नाव नोंदणीची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. जॉब सिकर ऑप्शन या लिंकवर क्लिक करुन आपल्या युजरनेम व पासवर्डचा वापर करुन लॉगीन करावे. प्रोफाईल मधील पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा या लिंकवर क्लिक करावे. रोजगार मेळाव्याचा नांदेड जिल्हा निवडून फिल्टर या बटणावर क्लिक करावे. नांदेड जिल्हा पंडित दीनदयाल ऑनलाईन जॉब Fair 1 मेळावा असे दिसेल. त्यातील Action या पर्यायाखालील दोन बटणांपैकी पहिल्या बटणावर क्लिक केल्यास मेळाव्याची माहिती दिसेल. तर दुसऱ्या बटणावर क्लिक केल्यास मेळाव्यात उपलब्ध रिक्त पदे दिसतील व क्लिक केल्यानंतर एक संदेश येईल. हा संदेश काळजीपूर्वक वाचून I Agree बटणावर क्लिक करावे. रोजगार मेळाव्यात उपलब्ध असलेली पदे (पदाचे नाव, शैक्षणिक अहर्ता, आवश्यक कौशल्य, अनुभव, वयोमर्यादा, आरक्षण) दिसेल. शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव, कौशल्य यानुसार पदाची निवड करावी व अर्जाच्या बटणावर क्लिक करावे. त्यानंतर एक संदेश दिसेल हा संदेश काळजी पूर्वक वाचून ओके बटणावर क्लिक करावे. रोजगार मेळाव्यामध्ये आपला ऑनलाईन सहभाग नोंदविला जाईल अशा प्रकारचा संदेश दिसेल, असेही रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त प्रशांत खंदारे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे आवाहन केले आहे.
00000

वृत्त क्र. 672


नांदेड जिल्ह्यात 56 बाधितांची भर  
कोरोनातून आज 19 व्यक्ती बरे तर चोघांचा मृत्यू 
नांदेड (जिमाका) दि. 22 :-  जिल्ह्यात आज 22  जुलै रोजी सायं. 6 वाजेपर्यंतच्या अहवालानुसार 56 व्यक्तींचे अहवाल बाधित आले. आज 19 व्यक्ती बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आजच्या एकूण 249 अहवालापैकी 190 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 1 हजार 74 एवढी झाली असून यातील 574 एवढे बाधित बरे झाल्याने त्यांना  सुट्टी देण्यात आली आहे. 443 बाधितांवर औषधोपचार सुरु असून त्यातील 36 बाधितांची संख्या गंभीर स्वरुपाची आहे. यात 13 महिला व 23 पुरुषांचा समावेश आहे.
सोमवार 21 जुलै रोजी हडको नांदेड येथील 62 वर्षाचा एका पुरुषाचा, लोहा तालुक्यातील माळाकोळी येथील 63 वर्षीय एका महिलेचा, मुखेड तालुक्यातील अंबुलगा येथील 80 वर्षाचा एका पुरुषाचा तसेच लोहा येथील 80 वर्षाच्या एका पुरुषाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. या बाधितांवर शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे उपचार सुरु होते. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे बाधित मृत्त व्यक्तींची संख्या 48 एवढी झाली आहे.  
आज बरे झालेल्या 19 बाधितांमध्ये मुखेड कोविड केअर सेंटर येथील 4, डॉ. शंकरराव चव्हाण शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी येथील 6, देगलूर कोविड केअर सेंटर येथील 1, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील 3, खाजगी रुग्णालयातील 2 बाधित तसेच औरंगाबाद येथील संदर्भीत झालेले 3 बाधितांचा  यात समावेश आहे. आतापर्यंत एकुण 574 बाधित व्यक्तींना बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली आहे.  
आरटीपीसीआर तपसणी प्रक्रियेद्वारे नवीन बाधितांमध्ये राजनगर पावडेवाडी नाका येथील 1, पाठक गल्ली येथील 1, दत्तनगर नांदेड येथील 1, भावसार चौक नांदेड येथील 1, दिलीपसिंघ कॉलनी नांदेड येथील 1, देगलूर नाका नांदेड येथील 1, गितानगर नांदेड येथील 1, आनंदनगर नांदेड येथील 3, राजक कॉलनी नांदेड येथील 1, विष्णुपुरी नांदेड येथील 1, हडको नांदेड येथील 1, अर्धापूर तालुक्यातील उमरी येथील 1, मंजुळानगर ता. भोकर येथील 1, हिमायतनगर तालुक्यातील पोटा येथील 1, लोहा तालुक्यातील माळाकोळी येथील 1, कंधार तालुक्यातील मारोती मंदिरजवळ येथील 1, कंधार विजयगड येथील 4, देगलूर मोची गल्ली येथील 1, देगलूर मोंढा येथील 1, देगलूर उपजिल्हा‍ रुग्णालयातील 1, लाईन गल्ली देगलूर येथील 4, देगलूर तालुक्यातील भुतनप्परगा येथील 1, देगलूर येथील 1, देगलूर शांतीनगर येथील 1, मुखेड तालुक्यातील अंबुलगा येथील 1, मुखेड नवीपेठगल्ली येथील 1, मुखेड तालुक्यातील पाखांदेवाडी येथील 4, मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथील 2, मुखेड आहिल्याबाई होळकर नगर येथील 1, मुखेड मेन मार्कट येथील 3, मुखेड फुलेनगर येथील 1, मुखेड मेनरोड येथील 1, नायगाव तालुक्यातील कोलंबी येथील 3, नायगाव फुले कॉलनी येथील 1, नायगाव ग्रारु येथील 1, नायगाव येथील 1, नायगाव तालुक्यातील नरसी येथील 1, हिंगोली जिल्ह्यातील शेलगाव येथील 1, वसमत येथील येथील 1, पुसद मोतीनगर येथील 1 व्यक्तींचा यात समावेश आहे.
जिल्ह्यात 443 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. त्यांना डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 87, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 144, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 19, जिल्हा रुग्णालय येथे 31, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 10, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 49, देगलूर कोविड केअर सेंटर येथे 33, माहूर कोविड केअर सेंटर 1, गोकुंदा कोविड केअर सेंटर येथे 3, लोहा कोविड केअर सेंटर येथे 12, कंधार कोविड केअर सेंटर येथे 7, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथे 3, भोकर कोविड केअर सेंटर येथे 1, खाजगी रुग्णालयात 38 बाधित व्यक्ती उपचार घेत असून 3 बाधित औरंगाबाद येथे, निजामाबाद येथे 1 बाधित तर मुंबई येथे 1 बाधित संदर्भित झाले आहेत. 
जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती
सर्वेक्षण- 1 लाख 48 हजार 356,
घेतलेले स्वॅब- 10 हजार 936,
निगेटिव्ह स्वॅब- 8 हजार 786,
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 56
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 हजार 74,
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- 3,
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- निरंक,
मृत्यू संख्या- 48,
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 574,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 443,
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 328. 
प्रलंबित स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आलेले अहवाल उद्या सायंकाळ पर्यंत प्राप्त होतील. कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.   
00000

    वृत्त क्रमांक 107 'युवा उमेद'ने युवकांना रोजगाराची संधी मिळेलः ना. अतुल सावे २२ फेब्रुवारीला अर्धापूरला भव्य रोजगार मेळावा नांदे...