जिल्हास्तरीय महसुल क्रीडा स्पर्धेचे
जिल्हाधिकारी डोंगरे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न
नांदेड दि. 16 :- विभागीय
महसुल क्रीडा व सांस्कृतीक स्पर्धा या 30 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या कालावधीत
जालना येथे होणार आहेत. त्याअनुषंगाने जिल्हास्तरीय क्रीडास्पर्धेचे 16 व 17
नोव्हेंबर रोजी यशवंत महाविद्यालय येथील क्रीडांगणावर आयोजन करण्यात आले आहे. या
स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते आज करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी
अधिकारी अशोक शिनगारे, मनपा आयुक्त गणेश देशमुख, यशवंत महाविद्यालयाचे प्राचार्य
डॉ. ए. एन. जाधव, पिपल्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रावसाहेब जाधव, निवासी
उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, उपजिल्हाधिकारी बी. एम. कांबळे, महेश वडदकर,
श्रीमती अनुराधा ढालकरी, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर, उपविभागीय अधिकारी
सचीन खल्लाळ, श्रीमती दिपाली मोतियेळे, निवृत्ती गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती
होती.
ही स्पर्धा शंभर मीटर धावणे या खेळाने सुरुवात
करण्यात आली. क्रीकेट, हॉलीबॉल, बॅडमिंटन, थ्रो बॉल तसेच खो-खो आदी सामने आयोजित
करण्यात आले. विभागीय स्तरावरील स्पर्धेची तयारी करण्यासाठी 18 ते 29 नोव्हेंबर या
दरम्यान सराव शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी श्री.
कारभारी यांचे नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी परिश्रम घेत
आहेत.
000000