Thursday, November 16, 2017

जलसंधारण मंत्री प्रा. शिंदे यांच्या हस्ते लातूर येथे  
"जलयुक्त शिवार अभियान" पुरस्काराचे आज वितरण
            नांदेड दि. 16 :- जलयुक्त शिवार अभियानांतर्गत 2015-16 मध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या गावांचा सन्मान मृद व जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. कै. दणकोजीराव (दादा) देशमुख सभागृह लातुर येथे शुक्रवार 17 नोव्हेंबर 2017 रोजी दुपारी 3 ते 5 यावेळेत विभागस्तरावरील तसेच जिल्हास्तरीय पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.
            विभागस्तरावर कंधार तालुका अव्वल आला असुन या तालुक्यास 10 लाख रुपये, स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देवुन सन्मान केला जाणार आहे. याचबरोबर भोकर तालुक्यातील मौ. बेंबर या गावाने विभागामध्ये प्रथम पुरस्कार पटकावला असुन या गावाला साडेसात लाख रुपये, स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र दिले जाणार आहे. जलयुक्त शिवार अभियानाची उत्कृष्ट प्रचार प्रसिध्दी केल्या बद्दल पत्रकारांसाठी दिला जाणारा विभाग स्तरावरील तृतीय क्रमांकाचा पुरस्कार माधव संताजी अटकोरे यांना दिला जाणार आहे.
            विभागाबरोबरच जिल्हास्तरावरील पुरस्कारपण याठिकाणी दिले जाणार आहेत. नांदेड जिल्हयामध्ये कंधार व लोहा तालुक्याला प्रथम व द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार दिला जाणार आहे. लोहा तालुक्याला रुपये 3 लाख, स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देवून सन्मानीत केले जाणार आहे. नांदेड जिल्हयातील ज्या गावांनी जल व मृद संधारणाचे उत्कृष्ट काम केले आहे अशा 5 गावांनापण जिल्हास्तरीय पुरस्कार दिला जाणार आहे. यामध्ये भोकर तालुक्यातील मौ. बेंबर (प्रथम), कंधार तालुक्यातील मौ. उस्माननगर (द्वितीय, 75 हजार) व मौ. गऊळ (तृतीय, 50 हजार), नायगाव तालुक्यातील मौ. मांजरम (चौथा, 30 हजार) व देगलुर तालुक्यातील मौ. नागराळ (पाचवा, 20 हजार) या गावांची पुरस्कारासाठी निवडी झाली आहे. जिल्हा स्तरावरील उत्कृष्ट अधिकाऱ्याचा पुरस्कार डॉ. तुकाराम मोटे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांना दिला जाणार आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालयाच्यावतीने देण्यात आली आहे.
000000


No comments:

Post a Comment

    वृत्त क्रमांक 107 'युवा उमेद'ने युवकांना रोजगाराची संधी मिळेलः ना. अतुल सावे २२ फेब्रुवारीला अर्धापूरला भव्य रोजगार मेळावा नांदे...