Tuesday, August 2, 2022

 एमएच-सीईटी परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश 

नांदेड (जिमाका) दि. 2 :- एमएच-सीईटी परीक्षा-2022  ही 5 ते 20 ऑगस्ट 2022 (दि. 9,15,16 व 19 ऑगस्ट वगळून) या कालावधीत दोन सत्रात जिल्ह्यात 5 परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे.  परीक्षा केंद्राच्या परिसरात बाहेरील व्यक्तींचा उपद्रव होऊ नये व परीक्षा स्वच्छ सुसंगत पार पाडण्याच्यादृष्टिने या परीक्षा केंद्र परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी काढले आहेत. 

 

या परीक्षा केंद्रापासून 100 मीटर परिसरात 5  ते 20 ऑगस्ट 2022  (दि. 9,15,16 व 19 ऑगस्ट वगळून) या कालावधीत सकाळी 7 ते सायं 7 वाजेपर्यंत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीला प्रवेश करता  येणार नाही. परीक्षा कालावधीत या परीसरात 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स, एसटीडी, आयएसडी, भ्रमणध्वी, फॅक्स, झेरॉक्स आणि ध्वनीक्षेपक चालू ठेवण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे.  

00000

 जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू 

नांदेड (जिमाका) दि. 2 :- नांदेड जिल्ह्यात मंगळवार 2 ऑगस्ट  रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 16 ऑगस्ट  2022 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 

 

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात मंगळवार 2 ऑगस्ट  रोजी सकाळी 6 वाजेपासून ते  16 ऑगस्ट  2022 च्या मध्यरात्री पर्यंत मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केले आहेत. यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी,  शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही. अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

00000

 मतदार यादीशी-आधार क्रमांकाची जोडणी करावी  

-        जिल्‍हाधिकारी डॉ. विपीन इटनकर  

 

·  सर्व मान्‍यता प्राप्‍त राजकीय पक्षाची बैठक संपन्न  

 

नांदेड (जिमाका) दि. 2 :- जिल्‍हयातील सर्व पात्र मतदारांनी मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांकाचे जोडणी करून घ्यावी. या नोंदणीसाठी पुढाकार घेऊन National Voters Service Portal (nvsp.in)   या संकेतस्‍थळास भेट द्यावी. तसेच मतदार यादीच्‍या नोंदीशी आधार क्रमांकाची जोडणी करण्‍यासाठी आपल्‍या घरी येणाऱ्या बीएलओ ( मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी ) यांना सर्व मतदारांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्‍हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

सर्व मान्‍यताप्राप्‍त राजकीय पक्षाचे जिल्‍हा अ‍ध्‍यक्ष / सचिव प्रतिनिधी यांच्या समवेत जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्‍यक्षतेखाली जिल्‍हाधिकारी नांदेड यांच्या बैठक कक्षात आज बैठक घेण्‍यात आली. या बैठकीस जिल्‍हयातील मान्‍यताप्राप्‍त राजकीय पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

 

निवडणूक कायदा अधिनियम, 2021 अन्‍वये लोकप्रतिनिधीत्‍व अधिनियम 1950 मध्‍ये सुधारणा केल्‍या आहेत. त्‍यानुसार मतदार यादीतील तपशिलाशी जोडणे आणि प्रमाणीकरणासाठी मतदारांकडुन ऐच्छिकपणे आधारची माहिती संग्रहित करण्‍याबाबतच्‍या सुधारणा अंतर्भूत आहेत. आधार क्रमांक मिळवण्‍याचा उद्देश मतदार यादीतील त्‍यांच्‍या नोंदीचे प्रमाणीकरण करणे आणि भविष्‍यात त्‍यांना अधिक चांगली निवडणूक सेवा प्रदान करणे असल्‍याचे जिल्‍हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी यावेळी सांगितले.

 

18 वर्ष पूर्ण झालेल्‍या नवमतदाराचे मतदार यादीत नाव नोंदविण्‍यासाठी आता 1 जानेवारीला 18 वर्ष पूर्ण होणाऱ्या नागरिकास नाव नोंदविता येत होते. परंतु आता निवडणूक आयोगाने यात सुधारणा केली आहे.  या सुधारणानुसार दिनांक 1 जानेवारी या अर्हता दिनांकावर आधारीत विशेष पुनरिक्षण कार्यक्रमाव्‍यतिरिक्‍त त्‍याच वर्षातील 1 एप्रील1 जुलै व 1 ऑक्‍टोबर या दिनांकावर पात्र होणाऱ्या मतदारांना मतदार यादीत नाव नोंदविता येईल. मतदार यादीत यापूर्वीच नाव नोंदविलेल्‍या मतदारांसाठी त्‍यांच्या नावाला आधार क्रमांक जोडण्‍याबाबत पुढील प्रमाणे सविस्‍तर माहिती देण्‍यात आली.

 

· दिनांक 1 ऑगस्‍ट 2022 पासून नांदेड जिल्‍हयात सदर कार्यक्रम सुरू करण्‍यात आला आहे.

· दिनांक 1 एप्रील 2023 पर्यंत मतदार यादीत नाव असलेल्‍या प्रत्‍येक व्‍यक्‍तीनी  त्‍याचा आधार क्रमांक मतदार यादीशी जोडून घ्‍यावा.

· मतदारांना ऑनलाईन पध्‍दतीने त्‍यांचा आधार क्रमांक  National Voters Service Portal (nvsp.in)  या संकेतस्‍थळावर, Voter Help App  (VHA) या माध्‍यमावर तसेच बीएलओ यांच्‍या कडे  Garuda App व्‍दारे जोडता येईल.

· मतदार यादीतील नावाशी आधार जोडणी करण्‍याच्‍या अनुषंगाने जिल्‍हयात दिनांक 04 सप्‍टेबर 2022 रोजी विशेष शिबिराचे आयोजन करण्‍यात येणार आहे.

 

यावेळी मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांकाची जोडणी कशी करावी याबाबतचे प्रात्‍याक्षिक यावेळी उपस्थित असलेल्‍या राजकीय पक्षाचे प्रतिनिधी यांना करून दाखवण्‍यात आले. यावेळी उपजिल्‍हा निवडणूक अधिकारी श्रीमती दीपाली मोतीयेळेनायब तहसिलदार डी. एन. पोटेमहसूल सहा. शरद बोरामने व संगणक चालक विनोद मनवर उपस्थित होते. 

000000

असंघटित क्षेत्रातील कामगारांनी

ई-श्रम कार्डसाठी नोंदणी करावी

 

नांदेड (जिमाका) दि. 2 :- ई-श्रम कार्डच्या नोंदणीसाठी राज्यात 3 व 4 ऑगस्ट रोजी विशेष नोंदणी अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. नांदेड जिल्ह्यातील असंघटित क्षेत्रातील कामगारांनी ई श्रम पोर्टलवर जास्तीत-जास्त प्रमाणात नोंदणी करून शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त मोहसीन अ.सय्यद यांनी केले आहे.

 

नांदेड जिल्ह्यातील असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व कामगारांनी आपल्या जवळच्या कॉमन सर्विस सेंटर (सीएससी) वर जाऊन नोंदणी करावी. नोंदणीस कोणतेही शुल्क आकारले जाणार नसून नोंदणी विनामूल्य आहे. नांदेड जिल्ह्यासाठी 13 लाख 27 हजार 855 एवढे उद्दीष्ट दिलेले आहे. त्यापैकी 3 लाख 10 हजार 167 असंघटित कामगारांनी नोंदणी केलेली आहे. उर्वरित असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांनी मोठ्या प्रमाणात नोंदणी करून शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा.

 

नोंदणी कोण करु शकतो

घरकाम करणाऱ्या महिला, रस्त्यावरिल विक्रते, दुग्‍ध व्यवसाय करणारे शेतकरी, ऑटो चालक, मेकॅनिक, शिलाइ मशीन कामगार, न्हावी कामगार, आशा वर्कर/अंगणवाडी सेविका, सुतारकाम करणार व्यक्ती, पेंटर, प्लंबर कामगार, इलेक्ट्रीशयन, ब्युटी पार्लर, वृत्तपत्र विक्रेते, हॉटेल चालक,प्रिंटींग काम करणारी व्यक्ती, भाजी विक्रेते,‍बिडी कामगार, सेंट्रींग कामगार, बांधकाम कामगार, पशुपालन करणारे, लहान व सिमांत शेतकरी, मच्छीमार, सॉ-मिल कामगार, मीठ कामगार,विणकर, बचत गठ, फळ विक्रेते, लेबर कामगार, सुरक्षा कर्मी, लोहार, हातगाडा कामगार  इत्यादी क्षेत्रातील कामगार ई-श्रम पोर्टल वर नोंदणी करु शकतात. या नोंदणीसाठी आधार कार्ड, बँक पासबुक, सक्रिय मोबाईल क्रमांक (आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक) ही आवश्यक कागदपत्रे लागतात. नांदेड जिल्ह्यातील  सर्व असंघटित कामगारांनी विशेष नोंदणी अभियानाअंतर्गत ई श्रम कार्डसाठी जवळच्या कॉमन सर्विस सेंटर (सीएससी) वर जाऊन  ई श्रम पोर्टलवर नोंदणी करून लाभ घ्यावा, असेही आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त मोहसीन अ. सययद यांनी केले आहे.

000000

 बालसंगोपन योजनेचा लाभ

विनामूल्य व मध्यस्थाविना मंजूर


नांदेड (जिमाका) दि. 2 :- महिला व बाल विकास विभागाअंतर्गत जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालयाकडून शुन्य ते 18 वयोगटातील अनाथ, निराधार, निराश्रीत बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभ देण्यात येतो. या योजनेचा लाभ निकषाप्रमाणे विनामूल्य व कोणत्याही मध्यस्थाविना मंजूर करण्यात येतो. या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी कोणत्याही मध्यस्थाने आर्थिक रकमेची मागणी केल्यास जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शास्त्रीनगर नांदेड येथे संपर्क साधावाअसे आवाहन जिल्हा महिला बाल विकास अधिकारी एम. एस. वाघमारे यांनी केले आहे.

 

शून्य ते 18 वयोगटातील अनाथ  किंवा ज्याच्या पालकाचा पत्ता लागत नाही. जी दत्तक देणे शक्य होत नाही अशी बालकेएक पालक असलेली व कौटूंबिक संकटात असलेली बालकेमृत्यूघटस्फोटविभक्तीकरणपरित्यागअविवाहित मातृत्वगंभीर आजारपालक रुग्णालयात असणे आदी कारणांमुळे विघटीत झालेल्या एक पालक असलेल्या कुटूंबातील बालकेकुष्ठरुग्ण व जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची बालकेएच.आय.व्ही ग्रस्त/बाधित बालकेतीव्र मतिमंद/एकाधिक अपंगत्व बालकेदोन्ही पालक अपंग आहेत अशी बालकेपालकांमधील तीव्र वैवाहिक बेबनावअती हेटाळणी व दुर्लक्षन्यायालयीन किंवा पोलीस तक्रार प्रकरणात अशी अपवादात्मक परिस्थितीतील संकटातील परिस्थिती मधील बालकेशाळेत न जाणारे बाल कामगार (कामगार विभागाने सुटका व प्रमाणित केलेले) बालके यांना बाल कल्याण समितीच्या मंजुरीने बाल संगोपन योजनेचा लाभ देण्यात येतो, असे जिल्हा महिला बाल विकास अधिकारी नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकात स्पष्ट केले आहे.

00000

जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी  0.10 मि.मी. पाऊस

नांदेड (जिमाका) दि. 2 :- जिल्ह्यात मंगळवार 2 ऑगस्ट रोजी सकाळी 8.20 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 0.10 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात एकुण 753 मिलीमीटर पाऊस झाला आहे.

जिल्ह्यात मंगळवार 2 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणेकंसात एकूण पाऊस : नांदेड- 0.10 (712.80), बिलोली-00 (728), मुखेड- 0.40 (683.30), कंधार-00 (693.50), लोहा-00 (682.30), हदगाव-00 (709.30), भोकर-00 (881.10), देगलूर-0.90 (641.40), किनवट-0.10 (859.90), मुदखेड- 00 (894.20), हिमायतनगर-00 (1029.30), माहूर- 00 (680.30), धर्माबाद- 00 (877.40), उमरी- 00(918.90), अर्धापूर- 00 (679.90), नायगाव-00 (683.80मिलीमीटर आहे.

0000

 बारावी पुरवणी परीक्षेच्या

वेळापत्रकात अंशत: बदल

 

नांदेड (जिमाका) दि. 2 :-  राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत जुलै-ऑगस्ट 2022 मध्ये घेण्यात येणारी इयत्ता बारावीची पुरवणी परीक्षा 21 जुलै ते 12 ऑगस्ट 2022 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. या वेळापत्रकातील अंशत: बदलाची सर्व संबंधित उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक, प्राचार्य, विद्यार्थी, पालक व सर्व संबंधितानी याची नोंद घ्यावी. या तारखेबाबतचे सुधारित वेळापत्रक शिक्षण मंडळाच्या www.mahahsscboard.in  संकेतस्थळावर 1 ऑगस्ट पासून उपलब्ध करुन देण्यात आले आहे, असे आवाहन पुणे शिक्षण मंडळाच्या सचिव श्रीमती अनुराधा ओक यांनी केले आहे.

 

या वेळापत्रकानुसार उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी पुरवणी परीक्षेतील व्यावसायिक द्विलक्षी अभ्यासक्रम पेपर-1 व 2 या विषयांच्या अनुक्रमे 6 ऑगस्ट, 10 ऑगस्ट व 12 ऑगस्ट रोजी सकाळ व दुपार सत्रात आयोजित करण्यात आली. यातील विषयाच्या परीक्षेस श्रेणी सुधार योजनेअंतर्गत प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा एमएचटीसीईटी यांच्या मार्फत आयोजित करण्यात आलेल्या सामाजिक प्रवेश परिक्षेस प्रविष्ठ होत असल्याने 6 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट व 12 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या विषयांच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आला आहे. त्यानुसार सुधारित वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे.

 

शनिवार 6 ऑगस्ट 2022 रोजी सकाळ सत्र 10.30 ते 1 या कालावधीत होणाऱ्या व्यावसायिक द्विलक्षी  अभ्यासक्रम पेपर-1 या विषयाचा सांकेताक A-1, A-2, A-3 ची परीक्षा सुधारित वेळापत्रकानुसार सोमवार 22 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10.30 ते 1 यावेळेत होईल. शनिवार 6 ऑगस्ट 2022 रोजी सकाळ सत्र 10.30 ते 1.30 या वेळेत व्यावसायिक द्विलक्षी अभ्यासक्रम पेपर-1 मधील A-4,A-5,A-7,A-8,A-9,B-9,C-1,C-2,D-9  या विषय व सांकेताकांची परीक्षा सुधारित वेळापत्रकानुसार सोमवार 22 ऑगस्ट 2022 रोजी सकाळ सत्र 10.30 ते 1.30 या कालावधीत  होणार आहे. शनिवार 6 ऑगस्ट रोजी सकाळी 10.30 ते 12.30 या कालावधीत व्यावसायिक द्विलक्षी अभ्यासक्रम पेपर-1 मधील B-2, B-4, B-5  या विषय व सांकेताकाची परीक्षा सोमवार 22 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 12.30 यावेळेत होणार आहे. शनिवार 6 ऑगस्ट 2022 रोजी दुपारी 3 ते 6 यावेळेत शिक्षणशास्त्र (78) E-3,E-6,F-6,F-8,G-1,G-2,G-3,G-4,G-5,G-6,G-8,G-9 या विषयाची परीक्षा सोमवार 22 ऑगस्ट रोजी दुपार सत्र 3 ते 6 या वेळेत होणार आहे. बुधवार 10 ऑगस्ट रोजी सकाळी 10.30 ते 1 या दरम्यान होणारी व्यावसायिक द्विलक्षी अभ्यासक्रम पेपर-2 मधील A-1,A-2,A-3 या विषयाची परीक्षा मंगळवार 23 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10.30 ते 1 या कालावधीत होणार आहे. बुधवार 10 ऑगस्ट 2022 रोजी सकाळ सत्र 10.30 ते 1.30 या कालावधीत  होणारी व्यावसायिक द्विलक्षी अभ्यासक्रम पेपर-2 मधील A-4,A-5,A-7,A-8,A-9,B-9,C-1,C-2,D-9 या अभ्यासक्रमाची परीक्षा मंगळवार 23 ऑगस्ट 2022 रोजी सकाळ सत्र 10.30 ते 1.30 या कालावधीत होणार आहे. बुधवार 10 ऑगस्ट रोजी सकाळ सत्र 10.30 ते 12.30 या कालावधीत व्यावसायिक द्विलक्षी अभ्यासक्रम पेपर—2 मधील B-2,B-4,B-5 या विषयाची मंगळवार 23 ऑगस्ट रोजी सकाळ सत्र 10.30 ते 12.30 या कालावधीत होईल. बुधवार 10 ऑगस्ट 2022 रोजी दुपार सत्र 3 ते 5 या कालावधीत व्यावसायभिमूख ग्रंथालय आणि माहितीशास्त्र (85) या विषयाची परीक्षा मंगळवार 23 ऑगस्ट 2022 रोजी दुपार सत्र 3 ते 5 या कालावधीत होईल. शुक्रवार 12 ऑगस्ट 2022 रोजी सकाळ सत्र 10.30 ते 1.30 या वेळेत बालविकास (43) संरक्षणशास्त्र (77) या विषयाची बुधवार 24 ऑगस्ट 2022 रोजी सकाळ सत्र 10.30 ते 1.30 या सुधारित वेळेत होईल. शुक्रवार 12 ऑगस्ट 2022 दुपार सत्र 3 ते 6 या कालावधीत कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान (75) पशुविज्ञान आणि तंत्रज्ञान (76) या विषयाची परीक्षा बुधवार 24 ऑगस्ट 2022 रोजी दुपार सत्र 3 ते 6 या कालावधीत होईल असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...