जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू
नांदेड (जिमाका) दि. 2 :- नांदेड जिल्ह्यात मंगळवार 2 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 16 ऑगस्ट 2022 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात मंगळवार 2 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 16 ऑगस्ट 2022 च्या मध्यरात्री पर्यंत मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केले आहेत. यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा,
00000
No comments:
Post a Comment