Wednesday, March 23, 2022

 नांदेड जिल्ह्यात 2 व्यक्ती कोरोना बाधित

तर 1 कोरोना बाधित झाला बरा 

नांदेड (जिमाका) दि. 23 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 520 अहवालापैकी 2 अहवाल कोरोना बाधित आले आहे. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 2 तर अँटिजेन तपासणीद्वारे निरंक अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 2 हजार 797 एवढी झाली असून यातील 1 लाख 97 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 8 रुग्ण उपचार घेत आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 692 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 2 असे एकुण 2 कोरोना बाधित आढळले आहे. 

आज नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 1 असे एकुण 1 कोरोना बाधितांना औषध उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. 

उपचार घेत असलेल्या बाधितांमध्ये नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गत गृह विलगीकरण 3, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 5 असे एकुण 8 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 8 लाख 92 हजार 235

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 72 हजार 316

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 लाख 2 हजार 797

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 1 लाख 97

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 692

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.37 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-00

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-05

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-8

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-निरंक 

कोरोना विषाणुची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुन: येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधीनंतर दुसऱ्या लसीचा डोस अवश्य घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

000000

 शुक्रवारी जीएसटीवर कार्यशाळेचे आयोजन

आयुक्त मनोजकुमार रजक करणार मार्गदर्शन 

नांदेड (जिमाका) दि. 23 :- केंद्रीय वस्तु व सेवाकर तथा उत्पादन शुल्क कार्यालय नांदेड मंडळातर्फे नांदेड, हिंगोली आणि लातूर या तीन जिल्ह्यातील जीएसटी कर ते कर सल्लागार यांच्यासाठी कार्यशाळा घेण्यात येत आहे.  ही कार्यशाळा शुक्रवार 25 मार्च 2022 रोजी सायं 4 वा. होटल सिटी प्राइड, एमजीएम कॉलेज रोड, नांदेड येथे आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व जीएसटी करदाता व कर सल्लागार यांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन वस्तु व सेवाकर कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त एल.वी. कुमार यांनी केले आहे.  

या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय वस्तु व सेवाकर तथा उत्पादन शुल्क औरंगाबादचे आयुक्त मनोज कुमार रजक हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यशाळेत करदात्यांना जीएसटी कार्यप्रणाली मध्ये राहून कार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. जीएसटी कार्यप्रणालीमध्ये अपडेटस यावर मार्गदर्शन कार्यशाळा सीजीएसटी तर्फे घेण्यात येत आहे.

या कार्यशाळेत सीजीएसटी औरंगाबाद अधिक्षक दिपक गुप्ता हे जीएसटी मध्ये 1 जानेवारी 2022 पासून अंमलात येणारे बदलावर व तसेच केंद्रीय बजेट 2022 च्या जीएसटीमध्ये येणाऱ्या काळात होणारे अपेक्षित बदला-बदल सखोल पॉवर पॉइंट प्रोजेक्टवर मार्गदर्शन करतील. कार्यक्रमाच्या शेवटी उद्योजक, करदाते व कर सल्लागार यांच्या शंकेचे निरासरन करण्यात येईल. या कार्यक्रमात नांदेड, हिंगोली, आणि लातूर जिल्ह्यातील जीएसटी करदाता आणि कर सल्लागार यांची मोठी उपस्थिती असेल असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.  

0000

 औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्यावतीने

भरती मेळाव्याचे शुक्रवारी आयोजन 

नांदेड (जिमाका) दि. 23 :- औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्यावतीने शुक्रवार 25 मार्च रोजी रोजगार / शिकाऊ उमेदवारांसाठी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. आयटीआय उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शुक्रवार 25 मार्च रोजी सकाळी 11 वा. उपस्थित रहावे, असे आवाहन अंशकालीन प्राचार्य एम. एस. बिरादार यांनी केले आहे. 

या मेळाव्यासाठी आवश्यक अर्हता, पात्रता आणि शिकाऊ उमेदवारांसाठी मानधन, आवश्यक व्यवसायाचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे. उमेदवार आयटीआय उत्तीर्ण (तात्पुरते आणि शिकाऊसाठी) फक्त मुलांसाठी वय मर्यादा 18 ते 28 वर्ष ( पेंटर जनरल ट्रेडसाठी 30 वर्षे ) असेल तर वेतन 9 हजार रुपये राहील. व्यवसाय- वेल्डर, पेन्टर, फिटर, मासन, मेकॉनिस्ट, टर्नर आणि टीडीएम या पदासाठी आहे. या मेळाव्यात स्थानिक नांदेड येथील तुलसी केमिकल्स ॲण्ड पेन्टस प्रा. ली.  हे सहभागी होत आहेत.

00000

 कोविडमुळे पालक गमावलेल्या बालकांना मिळणार 10 हजार रूपये

पात्र लाभार्थ्यांनी विहित नमुन्यात अर्ज करण्याचे आवाहन 

नांदेड, (जिमाका) दि. 23 : कोविड-19 आजाराने एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना शैक्षणिक खर्चासाठी प्रत्येकी 10 हजार रुपये देण्यात येत आहेत. पात्र लाभार्थ्यांनी विहित नमुन्यात अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा महिला बालविकास विभागाने केले आहे. 

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये महिला व बाल विकास विभागाला बाल न्याय निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.  तालुका स्तरावर गरजु लाभार्थ्यांनी एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी  कार्यालय तर नांदेड मनपा क्षेत्रातील पात्र लाभार्थ्यांनी संरक्षण अधिकारी  कार्यालय किंवा जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालय शास्त्रीनगर नांदेड येथून अर्जाचा नमुना घेवून आवश्यक कागदपत्रांसह मुळ अर्जासह प्रस्ताव सादर करावा असे स्पष्ट करण्यात आले आहे. 

अर्थ सहाय्यासाठी आवश्यक कागदपत्रे पुढील प्रमाणे

मुळ अर्ज, बालकाचे शाळेचे बोनाफाईड, आई-वडील कोविड -19 ने मुत्यृ झाल्याचा दाखला व झेरॉक्स प्रत, बालकाचे अथवा बालकांच्या पालकांचे संयुक्त राष्ट्रीयकृत बँकेत खाते आधार संलग्न असल्याबाबत  पासबुक झेरॉक्स प्रत, बालकाचे आधार कार्ड, शासनाच्या किंवा इतर योजनाचा लाभ घेत नसल्याचे हमीपत्र असे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय,  शास्त्रीनगर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी डॉ. अब्दुल रशीद शेख यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे कळविले आहे. 

0000

 जिल्ह्यातील पर्यटनस्थळांना चालना देण्यासह

स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन देण्याचा होट्टल महोत्सवाचा हेतू

- जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर   


·         28 मार्च पर्यंत स्थानिक कलाकारांना अर्ज करण्याची संधी 

नांदेड, (जिमाका) दि. 23  :- जो समृद्ध वारसा नांदेड जिल्ह्याला मिळाला आहे त्याच्या जपणुकीसाठी, पिढ्यानपिढ्या ज्या कला येथे विकसीत होत आल्या आहेत त्याला व्यासपीठ मिळावे, स्थानिक प्रतिभावान कलाकारांना संधी उपलब्ध व्हावी, त्यांच्या कलेला चालना मिळावी यादृष्टिने जिल्हा प्रशासन होट्टल महोत्सवाकडे पाहते आहे. बहुप्रतिक्षेत असलेल्या होट्टल सांस्कृतिक महोत्सवाचा मूळ हेतूच जिल्ह्यातील सांस्कृतीक वैभवाला अधोरेखीत करण्याचा असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले. 

जिल्हा प्रशासन  व महाराष्ट्र पर्यटन संचालनालय औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने होट्टल सांस्कृतिक महोत्सव 2022 चे आयोजन केले जात आहे. दिनांक 9 ते 11 एप्रिल या तीन दिवसीय कालावधीत देगलूर जवळील होट्टल येथील मंदिर परिसरात हे आयोजन होणार आहे. स्थानिक कलाकारांना अधिकाधिक संधी मिळावी व महोत्सवाची पुढील रुपरेषा ठरावी याबाबत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी संबंधितांना निर्देश दिले. याचबरोबर महोत्सव काळात स्थानिक कलाकारांच्या सादरीकरणासाठी राखीव वेळही ठेवण्यात आली आहे.   

ज्या स्थानिक कलाकारांना, कलाकारवृंद यांना त्यांच्याकडील अनुभव, वैशिष्ट्य व सादर करावयाच्या कार्यक्रमांच्या रूपरेषेसह दिनांक 28 मार्च 2022 पर्यंत लेखी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. हे अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दंडाधिकारी शाखेत कार्यालयीन वेळेत स्विकारले जातील. या अर्जावर होट्टल सांस्कृतिक महोत्सव 2022 अंतर्गत अर्ज असे स्पष्ट नमूद केलेले व विहित कालावधीत अलेले अर्जच स्विकारले जातील, असेही जिल्हा प्रशासनाच्यावतीने स्पष्ट केले आहे.

00000 

 स्वामित्व योजनेच्या पूर्तीसाठी गावातील नमुना 8 अद्ययावत आवश्यक

- जिल्हाधिकारी डॉ.‍ विपीन इटनकर      

नांदेड, (जिमाका) दि. 23  :- जिल्ह्यातील सर्व गावांचे गावठाण भुमापन व गावठाणातील मालमत्तांचे जीआयएस आधारित रेखांकन व मूल्यांकन करून गावठाणातील प्रत्येक घरांचा, खुल्या जागेचा, रस्त्याचा परिपूर्ण नकाशा तयार व्हावा या उद्देशाने स्वामित्व योजना शासनाने हाती घेतली आहे.याचबरोबर असंख्य कुटुंबाजवळ जी मिळकत आहे त्याची महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम1966 तरतुदीनुसार मिळकत पत्रिका अर्थात आपल्या जागेची कायदेशीर प्रतिपूर्ती करणारीसनद नागरिकांना उपलब्ध होत आहे. ड्रोन द्वारे सर्व्हे ऑफ इंडियामार्फत गावठाणातील मिळकतीचेहे सर्वेक्षण असल्याने याला अधिक महत्त्व आहे. याचबरोबर सदर इमेज जीओ संदर्भ असल्याने ती पडताळून गावठाणातील मिळकतीचा डिजिटल नकाशा असल्याने या सनदीला कायदेशीर आधार आहे.ग्रामीण भागातील नागरिकांनी सनदी साठी पुढाकार घेऊन जिल्ह्यातील स्वामित्व योजनाप्रभावीपणे राबविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले.  

आज 23 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात स्वामित्व योजनेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक  भूमि अभिलेख श्रीमती सुरेखा सेठिया, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.  

स्वामित्व योजनेसाठी गावठाणातील जागांचे ड्रोनद्वारे चित्रीकरण करून जागेबाबत परिपूर्ण अशी माहिती संकलितकेली जात आहे. ती भूमी अभिलेख कार्यालयामार्फत प्रत्यक्ष जागेवर पडताळूनही पाहिल्या जाते. या सर्व प्रक्रिया झाल्यानंतर प्रत्येक गावठाण / ग्रामपंचायत निहाय नमूना 8 नुसारपडताळणी केली जाते. असंख्य गावात अद्यापही नमूना 8 अपडेट नसून त्याबाबत योग्‍य तीदक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिल्या. 

सदर सनद साठी शासनाने नाममात्र शूल्क दिले असून लोकांनी यासाठी पुढाकार घ्यावा, असेही त्यांनीस्पष्ट केले. भूमिअभिलेख कार्यालयाच्या अधिक्षक श्रीमती सेठिया यांनी या बैठकीत सविस्तर विवेचन केले.

00000

 

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...