नांदेड जिल्ह्यात 2 व्यक्ती कोरोना बाधित
नांदेड (जिमाका) दि. 3 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 109 अहवालापैकी आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 1, बिलोली तालुक्याअंतर्गत 1 असे एकुण 2 अहवाल कोरोना बाधित आढळले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 3 हजार 424 एवढी झाली असून यातील 1 लाख 723 रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्याने रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 692 एवढी आहे. नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरणातील 2, नांदेड जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृह विलगीकरणातील एका रुग्णाला उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. नांदेड जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृह विलगीकरणात 5, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरणातील 4 असे एकुण 9 व्यक्ती उपचार घेत आहेत.
जिल्ह्याची कोरोना
संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.
एकुण घेतलेले स्वॅब- 9 लाख 17 हजार 282
एकुण
निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 96 हजार 438
एकुण
पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 लाख 3 हजार 424
एकूण
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 1 लाख 723
एकुण
मृत्यू संख्या-2 हजार 692
उपचारानंतर
बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.38 टक्के
आज स्वॅब
तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक
आज स्वॅब
नाकारण्यात आलेली संख्या- निरंक
आज
प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक
रुग्णालयात
उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-9
आज रोजी
अतिगंभीर प्रकृती असलेले- निरंक
00000