Thursday, July 5, 2018


          
           ध्येयनिष्ठ होऊन परीक्षेची तयारी करावी
- जयराज कारभारी
नांदेड दि. 5 :- स्पर्धा परीक्षेच्या युगामध्ये विभिन्न प्रकारच्या क्षेत्रामध्ये नोकरीच्या मोठया प्रमाणात संधी उपलब्ध होणार असून यात यश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करुन परीक्षेची तयारी करुन यश संपादन करावे, असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांनी केले.
डॉ. शंकरराव चव्हाण सभागृहामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, सेतू समिती, नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय नांदेड यांचेवतीने ज्ज्व नांदेड मोहिमे अंतर्गत आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरामध्ये बोलत होते. यावेळी व्याख्याते रत्नेश आग्रवाल, जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री. आग्रवाल यांनी इंग्रजी व्याकरण या विषयावर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन करतांना केद्रीय लोकसेवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध परिक्षेमधील इंग्रजी विषयाचे महत्व   इंग्रजी विषयावर येणा-या प्रश्नाचे स्वरुप त्याचे उत्तरे कशी दयावीत याबद्द मार्गदर्शन केले. तसेच डॉ.वि जय पोवार यांनी सामान्य विज्ञान या विषयावर तर डॉ. विलास कांबळे यांनी भूगोल विषयावर सखोल मार्गदर्शन केले.
जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री. ढोक यांनी आपल्या मनोगतात  विद्यार्थ्यांने अधिकाधिक निकाल देऊन उज्ज्वल नांदेड मोहीमेस गती दयावी. यासाठी आपल्याला जास्तीतजास्त चांगले व्याख्याते मागदर्शन करण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात येतील, असे सांगितले.
सुरवातीला श्री. कारभारी श्री. आग्रवाल यांचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांनी ग्रंथ देऊन स्वागत केले तर डॉ. विजय पोवार डॉ. विलास कांबळे यांचेही स्वागत श्रीमती मिना सोलापूरे ग्रंथपाल बाळू पावडे यांनी ग्रंथ देऊन केले.
सूत्रसंचालन ग्रंथपाल आरती कोकुलवार यांनी केले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी प्रताप सुर्यवंशी, श्रीमती मीना सोलापुरे, बाळू पावडे, संजय कर्वे, कोंडिबा गाडेवाड, रघुवीर श्रीरामवार, मधुकर खंडेलोटे, लक्ष्मण शेनेवाड, सोपान यनगुलवाड आदीने सहकार्य केले.
00000

महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे
सदस्य (विधी) न्या. सी. एल. थूल यांचा सुधारीत दौरा
नांदेड दि. 5 :- महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती / जमाती आयोगाचे सदस्य (विधी) न्यायमूर्ती सी. एल. थूल हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा सुधारीत दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
शनिवार 7 जुलै 2018 रोजी दुपारी 2 वा. बीड येथून परभणी मार्गे नांदेडकडे प्रयाण व शासकीय विश्रामगृह नांदेड येथे मुक्काम.
रविवार 8 जुलै 2018 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत शासकीय विश्रामगृह नांदेड येथे राखीव. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक तसेच सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांनी आयोजित केलेल्या ॲट्रोसिटी ॲक्ट या कार्यक्रमास उपस्थितांना मार्गदर्शन व चर्चा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे मुक्काम. सोमवार 9 जुलै 2018 रोजी सोयीनुसार मुंबईकडे प्रयाण.
0000000


कॅरेज बाय रोड अधिनियमांतर्गत
माल वाहतूक व्यवसायिकांनी
नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे
नांदेड, दि. 5 :- माल वाहतूक व्यवसायातील संबंधितांनी येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाशी संपर्क साधून कॅरेज बॉय रोड अधिनियमांतर्गत नोंदणी प्रमाणपत्र तात्काळ प्राप्त करुन घ्यावे. अन्यथा मोटार वाहन अधिनियम तसेच नियमातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.  
कॅरेज बॉय रोड अधिनियम, 2007 च्या अनुषंगाने केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय नवी दिल्ली यांचे अधिसुचना क्र. जीएसआर-176 (ई) दि 28 फेब्रुवारी 2011 नुसार कॅरेज बाय रोड नियम, 2011 प्रसिद्ध करण्यात आले असून सदर नियम अधिसुचना प्रसिद्ध होण्याच्या दिनांकापासून लागू झाले आहे. हा नियम केंद्र शासनाच्या www.morth.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
या नियमानुसार माल वाहतूक व्यवसायातील वाहतुकदार, ठेकेदार, बुकींग एजंट, दलाल, वाहतुक कंपनी, कागदपत्रे / पाकिटे / मालाची घरपोहच वाहतुक करणारी कुरीअर कंपनी तसेच मालाची साठवणूक करणारे, वितरक, माल जमा करणारे व्यावसायिक यांना कॉमन करिअर म्हणून क्षेत्रीय नोंदणी प्राधिकारी तथा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचेकडे अर्ज करुन नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करणे आवश्यक आहे. असेही प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.  
0000000


पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेंतर्गत
सुशिक्षित बेरोजगारांनी ऑनलाईन अर्ज करावीत
नांदेड, दि. 5 :- पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेंतर्गत जिल्ह्यातील नवीन उद्योग व सेवाउद्योग करणाऱ्या सुशिक्षित बेरोजगारानी www.kvic.org.in या वेबपोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावीत, असे आवाहन नांदेड जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांनी केले आहे.
पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना भारत सरकारच्या सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयामार्फत ऑक्टोंबर 2008 पासून लागू करण्यात आली आहे. ही योजना 1 जुलै 2016 पासून ऑनलाईन करण्यात आली असून शहरी व ग्रामीण भागासाठी जिल्हा उद्योग केंद्र व ग्रामीण भागासाठी महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ व खादी ग्रामोद्योग आयोग या तीन यंत्रणामार्फत राबविण्यात येते. सन 2018-19 या आर्थिक वर्षासाठीचे उद्दीष्ट प्राप्त झाले आहे.
या योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्याचे प्रमाण व स्वरुप पुढील प्रमाणे आहे. सर्वसाधारण गट शहरी भागासाठी अनुदान 15 टक्के व स्वत:चे भागभांडवल 10 टक्के. ग्रामीण भागासाठी (20 हजार लोकसंख्येपेक्षा कमी) अनुदान 25 टक्के व स्वत:चे भागभांडवल 10 टक्के. अनु. जाती जमाती / इतर मागासवर्गीय / अल्पसंख्याक / महिला / माजी सैनिक / अपंग इत्यादीसाठी शहरी भागासाठी अनुदान 25 टक्के, स्वत:चे भागभांडवल 5 टक्के. ग्रामीण भागासाठी (20 हजार लोकसंख्येपेक्षा कमी) अनुदान 35 टक्के व स्वत:चे भागभांडवल 5 टक्के आहे.
या योजनेसाठी पात्रता- अर्जदाराचे वय 18 वर्षे असावे. अर्जदारास या योजनेंतर्गत सहाय्यासाठी कौटुंबिक उत्पन्नाची अट नाही. शिक्षण- उद्योगासाठी 10 लाख रुपयावरील प्रकल्प किंमतीसाठी व सेवा व्यवसायाकरिता 5 लाख रुपयावरील प्रकल्प किंमतीसाठी किमान 8 वी उत्तीर्ण. अन्यथा शिक्षणाची अट नाही.  नवीन प्रकल्पासाठी स्वतंत्र सहायता गट, सहकारी सोसायट्या, उत्पादीत सह. सोसायटी, चॅरीटेबल ट्रस्ट यांना अर्थसहाय्य करण्यात येते. वैशिष्ट्ये- सेवा व्यवसायासाठी 10 लाख रुपये कर्ज मर्यादा. उद्योगासाठी 25 लाख रुपये कर्ज मर्यादा राहील, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.  
00000


लेखा लिपिक प्रशिक्षण सत्राचे आयोजन 

नांदेड, दि. 5 :- लेखा लिपिक प्रशिक्षण सत्रासाठी लेखा सेवाविषय निगडीत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या नावाची शिफारस आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी सोमवार 9 जुलै 2018 पुर्वी करावी, असे आवाहन सहसंचालक लेखा व कोषागारे, औरंगाबाद यांनी केले आहे. 
दैनंदिन शासकीय कामकाज विशेषत: प्रशासकीय व लेखा विषयक कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यास शासकीय नियम व पद्धतीची किमान माहिती असणे आवश्यक आहे. यादृष्टीने लेखा लिपिक व पर्यवेक्षीय समाज मोडयूलचे एकत्रिकरण करुन सेवा नियमासंबंधी 60 दिवसाच्या कालावधीचे नियमित महाराष्ट्र लेखा लिपिक प्रशिक्षण सत्र क्र. 209 व पर्यवेक्षीय प्रशिक्षण सत्राचे एकत्रित आयोजन 10 जुलै 2018 ते 29 सप्टेंबर 2018 या कालावधीत करण्यात येणार आहे. या प्रशिक्षण सत्रासाठी महाराष्ट्र लेखा लिपीक परिक्षेस बसू इच्छिणारा प्रशिक्षणार्थी असावा, असे बंधन नाही. या प्रशिक्षणासाठी कोणताही इच्छूक अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रवेश देण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. प्रशिक्षण घेत असलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या औरंगाबाद मुख्यालयी वास्तव्यात स्व:खर्चाने राहण्याची व्यवस्था करावी लागेल. वास्तव्यासाठी शासनाने वेळोवेळी जाहीर केलेल्या दैनिक भत्त्याच्या दरानुसार मुक्काम भत्ता व अनुज्ञेय प्रवास भत्ता लागू राहील. अधिक माहितीसाठी सहसंचालक लेखा व कोषागारे, औरंगाबाद किंवा कोषागार अधिकारी नांदेड यांचेशी संपर्क साधावा, असेही आवाहन केले आहे.  
00000

शेतमालाच्या किमान आधारभूत किंमतीतील वाढीचा केंद्राचा ऐतिहासिक निर्णय

- मुख्यमंत्री

नागपूर, दि. 4 :शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्यासाठी केंद्र शासनाने आज विविध शेतमालांच्या किमान आधारभूत किंमतीत (MSP) वाढ जाहीर केली आहे. केंद्र शासनाचा आजचा हा निर्णय ऐतिहासिक आणि क्रांतिकारी आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या निर्णयाबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्र शासनाचे आभार मानले आहेत.

विधानभवन येथे प्रसिद्धी माध्यमांना प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री म्हणाले की, शेतक-यांची ही बऱ्यांच वर्षांपासुनची मागणी होती. केंद्र शासनाने अर्थसंकल्पात तशी घोषणाही केली होती. त्या आश्वासनाची आज पुर्तता झाली आहे. या निर्णयामुळे केंद्र सरकारवर मोठा आर्थिक बोजा पडणार आहे. पण तरीही केंद्र शासनाने शेतकऱ्यांचे हीत लक्षात घेता तशी तयारी दर्शविली आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेत आहे. सिंचन, सुक्ष्मसिंचन, फूडपार्क्सची योजना, युरियासंदर्भातील निर्णय, किसान संपदा योजना अशा अनेक निर्णयांचा शेतकऱ्यांना लाभ होत आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दीष्ट निश्चित करण्यात आले असून त्यादृष्टीने अनेक निर्णय घेण्यात येत आहेत. स्वातंत्र्योत्तर काळातील शेतकरी हिताचे सर्वाधिक निर्णय घेणारे हे सरकार आहे, असे ते म्हणाले.

शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याच्या दृष्टीने आज विविध शेतमालांसाठी जाहीर झालेल्या किमान आधारभूत किंमतीच्या (MSP)  निर्णयाबद्दल महाराष्ट्रातील जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या वतीने केंद्र शासनाचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे त्यांनी आभार मानले.
0000


  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...