Thursday, July 5, 2018


          
           ध्येयनिष्ठ होऊन परीक्षेची तयारी करावी
- जयराज कारभारी
नांदेड दि. 5 :- स्पर्धा परीक्षेच्या युगामध्ये विभिन्न प्रकारच्या क्षेत्रामध्ये नोकरीच्या मोठया प्रमाणात संधी उपलब्ध होणार असून यात यश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करुन परीक्षेची तयारी करुन यश संपादन करावे, असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांनी केले.
डॉ. शंकरराव चव्हाण सभागृहामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, सेतू समिती, नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय नांदेड यांचेवतीने ज्ज्व नांदेड मोहिमे अंतर्गत आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरामध्ये बोलत होते. यावेळी व्याख्याते रत्नेश आग्रवाल, जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री. आग्रवाल यांनी इंग्रजी व्याकरण या विषयावर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन करतांना केद्रीय लोकसेवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध परिक्षेमधील इंग्रजी विषयाचे महत्व   इंग्रजी विषयावर येणा-या प्रश्नाचे स्वरुप त्याचे उत्तरे कशी दयावीत याबद्द मार्गदर्शन केले. तसेच डॉ.वि जय पोवार यांनी सामान्य विज्ञान या विषयावर तर डॉ. विलास कांबळे यांनी भूगोल विषयावर सखोल मार्गदर्शन केले.
जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री. ढोक यांनी आपल्या मनोगतात  विद्यार्थ्यांने अधिकाधिक निकाल देऊन उज्ज्वल नांदेड मोहीमेस गती दयावी. यासाठी आपल्याला जास्तीतजास्त चांगले व्याख्याते मागदर्शन करण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात येतील, असे सांगितले.
सुरवातीला श्री. कारभारी श्री. आग्रवाल यांचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांनी ग्रंथ देऊन स्वागत केले तर डॉ. विजय पोवार डॉ. विलास कांबळे यांचेही स्वागत श्रीमती मिना सोलापूरे ग्रंथपाल बाळू पावडे यांनी ग्रंथ देऊन केले.
सूत्रसंचालन ग्रंथपाल आरती कोकुलवार यांनी केले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी प्रताप सुर्यवंशी, श्रीमती मीना सोलापुरे, बाळू पावडे, संजय कर्वे, कोंडिबा गाडेवाड, रघुवीर श्रीरामवार, मधुकर खंडेलोटे, लक्ष्मण शेनेवाड, सोपान यनगुलवाड आदीने सहकार्य केले.
00000

No comments:

Post a Comment

    वृत्त क्र. 1136 जिल्हास्तरीय   युवा महोत्सवाच्या तारखेत बदल युवा महोत्सवाचे आयोजन 1 व 2 डिसेंबर 2024 नांदेड दि.   25   नोव्हेंबर  :-   ज...