Thursday, July 5, 2018


कॅरेज बाय रोड अधिनियमांतर्गत
माल वाहतूक व्यवसायिकांनी
नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे
नांदेड, दि. 5 :- माल वाहतूक व्यवसायातील संबंधितांनी येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाशी संपर्क साधून कॅरेज बॉय रोड अधिनियमांतर्गत नोंदणी प्रमाणपत्र तात्काळ प्राप्त करुन घ्यावे. अन्यथा मोटार वाहन अधिनियम तसेच नियमातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.  
कॅरेज बॉय रोड अधिनियम, 2007 च्या अनुषंगाने केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय नवी दिल्ली यांचे अधिसुचना क्र. जीएसआर-176 (ई) दि 28 फेब्रुवारी 2011 नुसार कॅरेज बाय रोड नियम, 2011 प्रसिद्ध करण्यात आले असून सदर नियम अधिसुचना प्रसिद्ध होण्याच्या दिनांकापासून लागू झाले आहे. हा नियम केंद्र शासनाच्या www.morth.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
या नियमानुसार माल वाहतूक व्यवसायातील वाहतुकदार, ठेकेदार, बुकींग एजंट, दलाल, वाहतुक कंपनी, कागदपत्रे / पाकिटे / मालाची घरपोहच वाहतुक करणारी कुरीअर कंपनी तसेच मालाची साठवणूक करणारे, वितरक, माल जमा करणारे व्यावसायिक यांना कॉमन करिअर म्हणून क्षेत्रीय नोंदणी प्राधिकारी तथा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचेकडे अर्ज करुन नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करणे आवश्यक आहे. असेही प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.  
0000000

No comments:

Post a Comment

    वृत्त क्र. 1136 जिल्हास्तरीय   युवा महोत्सवाच्या तारखेत बदल युवा महोत्सवाचे आयोजन 1 व 2 डिसेंबर 2024 नांदेड दि.   25   नोव्हेंबर  :-   ज...