Thursday, July 5, 2018


लेखा लिपिक प्रशिक्षण सत्राचे आयोजन 

नांदेड, दि. 5 :- लेखा लिपिक प्रशिक्षण सत्रासाठी लेखा सेवाविषय निगडीत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या नावाची शिफारस आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी सोमवार 9 जुलै 2018 पुर्वी करावी, असे आवाहन सहसंचालक लेखा व कोषागारे, औरंगाबाद यांनी केले आहे. 
दैनंदिन शासकीय कामकाज विशेषत: प्रशासकीय व लेखा विषयक कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यास शासकीय नियम व पद्धतीची किमान माहिती असणे आवश्यक आहे. यादृष्टीने लेखा लिपिक व पर्यवेक्षीय समाज मोडयूलचे एकत्रिकरण करुन सेवा नियमासंबंधी 60 दिवसाच्या कालावधीचे नियमित महाराष्ट्र लेखा लिपिक प्रशिक्षण सत्र क्र. 209 व पर्यवेक्षीय प्रशिक्षण सत्राचे एकत्रित आयोजन 10 जुलै 2018 ते 29 सप्टेंबर 2018 या कालावधीत करण्यात येणार आहे. या प्रशिक्षण सत्रासाठी महाराष्ट्र लेखा लिपीक परिक्षेस बसू इच्छिणारा प्रशिक्षणार्थी असावा, असे बंधन नाही. या प्रशिक्षणासाठी कोणताही इच्छूक अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रवेश देण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. प्रशिक्षण घेत असलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या औरंगाबाद मुख्यालयी वास्तव्यात स्व:खर्चाने राहण्याची व्यवस्था करावी लागेल. वास्तव्यासाठी शासनाने वेळोवेळी जाहीर केलेल्या दैनिक भत्त्याच्या दरानुसार मुक्काम भत्ता व अनुज्ञेय प्रवास भत्ता लागू राहील. अधिक माहितीसाठी सहसंचालक लेखा व कोषागारे, औरंगाबाद किंवा कोषागार अधिकारी नांदेड यांचेशी संपर्क साधावा, असेही आवाहन केले आहे.  
00000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...