पंतप्रधान
रोजगार निर्मिती योजनेंतर्गत
सुशिक्षित
बेरोजगारांनी ऑनलाईन अर्ज करावीत
नांदेड, दि. 5
:- पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम
योजनेंतर्गत जिल्ह्यातील नवीन उद्योग व सेवाउद्योग करणाऱ्या सुशिक्षित बेरोजगारानी
www.kvic.org.in या वेबपोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावीत, असे आवाहन
नांदेड जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांनी केले आहे.
पंतप्रधान
रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना भारत सरकारच्या सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग
मंत्रालयामार्फत ऑक्टोंबर 2008 पासून लागू करण्यात आली आहे. ही योजना 1 जुलै 2016
पासून ऑनलाईन करण्यात आली असून शहरी व ग्रामीण भागासाठी जिल्हा उद्योग केंद्र व
ग्रामीण भागासाठी महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ व खादी ग्रामोद्योग आयोग
या तीन यंत्रणामार्फत राबविण्यात येते. सन 2018-19 या आर्थिक वर्षासाठीचे उद्दीष्ट
प्राप्त झाले आहे.
या
योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्याचे प्रमाण व स्वरुप पुढील प्रमाणे आहे. सर्वसाधारण गट
शहरी भागासाठी अनुदान 15 टक्के व स्वत:चे भागभांडवल 10 टक्के. ग्रामीण भागासाठी
(20 हजार लोकसंख्येपेक्षा कमी) अनुदान 25 टक्के व स्वत:चे भागभांडवल 10 टक्के. अनु.
जाती जमाती / इतर मागासवर्गीय / अल्पसंख्याक / महिला / माजी सैनिक / अपंग
इत्यादीसाठी शहरी भागासाठी अनुदान 25 टक्के, स्वत:चे भागभांडवल 5 टक्के. ग्रामीण
भागासाठी (20 हजार लोकसंख्येपेक्षा कमी) अनुदान 35 टक्के व स्वत:चे भागभांडवल 5
टक्के आहे.
या
योजनेसाठी पात्रता- अर्जदाराचे वय 18 वर्षे असावे. अर्जदारास या योजनेंतर्गत
सहाय्यासाठी कौटुंबिक उत्पन्नाची अट नाही. शिक्षण- उद्योगासाठी 10 लाख रुपयावरील
प्रकल्प किंमतीसाठी व सेवा व्यवसायाकरिता 5 लाख रुपयावरील प्रकल्प किंमतीसाठी
किमान 8 वी उत्तीर्ण. अन्यथा शिक्षणाची अट नाही. नवीन प्रकल्पासाठी स्वतंत्र सहायता गट, सहकारी
सोसायट्या, उत्पादीत सह. सोसायटी, चॅरीटेबल ट्रस्ट यांना अर्थसहाय्य करण्यात येते.
वैशिष्ट्ये- सेवा व्यवसायासाठी 10 लाख रुपये कर्ज मर्यादा. उद्योगासाठी 25 लाख
रुपये कर्ज मर्यादा राहील, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
00000
No comments:
Post a Comment