Friday, October 22, 2021

 नांदेड जिल्ह्यात 4 व्यक्ती कोरोना बाधित तर 3 कोरोना बाधित झाले बरे

नांदेड (जिमाका) दि. 22 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 723 अहवालापैकी 4 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 4  तर अँटिजेन तपासणीद्वारे निरंक अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 372 एवढी झाली असून यातील 87 हजार 696 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 24 रुग्ण उपचार घेत असून 2 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 652 एवढी आहे. आजच्या बाधितामध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 2, कंधार 1, पुणे 1 असे एकूण 4  बाधित आढळले. 

आज जिल्ह्यातील 3 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात मनपा अंतर्गत एनआरआय भवन गृह विलगीकरण 3 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 24 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 3, किनवट कोविड रुग्णालय 1, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 20 अशा एकूण 24 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 7 लाख 48 हजार 867

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 6 लाख 45 हजार 292

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 372

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 696

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 652

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.3 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-01

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-01

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-24

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-2

00000

 

 शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) 21 नोव्हेंबरला 

नांदेड, (जिमाका) 22 :- महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी)-2021 चे आयोजन  21 नोव्हेंबर रोजी घेण्यात येत असल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेचे आयुक्त तुकाराम तुपे यांनी पत्रकान्वये कळविले आहे. त्यांनी दिलेल्या सुधारीत वेळापत्रकानुसार कार्यवाहीचे टप्पे पुढीलप्रमाणे आहेत. दि. 26 ऑक्टोंबर ते 21 नोव्हेंबर पर्यंत प्रवेश पत्राची ऑनलाईन प्रिंट काढून घेता येईल. 21 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 1 पर्यंत शिक्षक पात्रता  परीक्षेचा पहिला पेपर असेल. तर दुपारी 2 ते सायं. 4.30 पर्यंत शिक्षक पात्रता परीक्षेचा दुसरा पेपर असेल. 

देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणूक लक्षात घेऊन पूर्वी जाहीर केलेल्या 30 ऑक्टोंबर रोजीच्या तारखेत हा बदल करण्यात आला असून आता ही परीक्षा 21 नोव्हेंबरला होईल.

00000

 किमान आधारभूत किंमत खरेदी

योजनेंतर्गत धान खरेदी केंद्रांना मंजूरी  

नांदेड (जिमाका) दि. 22 :- शासनाच्या आधारभूत किमंत खरेदी योजने अंतर्गत खरीप पणन हंगाम धान खरेदी केद्रांना मंजूरी देण्यात आली आहे.राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ नाशिक यांच्या वतीने प्रादेशिक कार्यालय यवतमाळ यांनी नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात  आधारभूत योजने अंतर्गत खरेदी केंद्राना 2021- 22 अंतर्गत  खरेदी पणन हंगामासाठी दिनांक 1 ऑक्टोबर 2021 ते 31 जानेवारी 2022 पर्यंत मान्यता देण्यात आली आहे. 

कोविड 19 चा प्रादुर्भाव पाहता खरेदी केंद्रावर सुरक्षीत अंतर  निर्जतुकीकरण इत्यादी बाबीचे पालन होणे आवश्यक आहे.खरेदी झालेल्या धान (भात) खरेदी अभिकर्ता संस्थानी स्वत च्या गोदामात किंवा आवश्यकतेनुसार भाड्याच्या गोदामात साठवणूक करून त्याची भरडई करावी. सदर भाड्याची गोदामे शासकीय गोदामापासून नजीकच्या अंतरावर तसेच साठवणूक आणि वाहतूक करण्यास योग्य असतील याची खात्री अभिकर्ता संस्थांनी करावे असे स्पष्ट करण्यात आले आहे. 

केंद्र शासनाने ठरविलेल्‍या परिशिष्‍ट I,IA,II,III,IV,V,VI,VII मधील विनिर्देशानुसार (उता-यानुसार व इतर अटी व शर्तीनुसार) धान भरडाई करुन शासनाच्‍या गोदामात जमा करावे. धान खरेदीपासून साठवणू, वाहतूक, सुरक्षितत, भरडाई व तांदूळ जमा करण्‍यापर्यंतची संपूर्ण जबाबदारी अभिकर्ता संस्‍थांची राहील. 

आदिवासी विकास महामंडळ यांनी आवश्यक त्या ठिकाणी केंद्र उघडणे, प्रशिक्षित कर्मचारऱ्यांची व्यवस्था करणे, केंद्रावर धान्य वाळवणे, स्वच्छ करणे, मूलभूत सुविधा (चाळणी,पंखे,ताडपत्री, पॉलिथिन शिट्स ) आवश्यक ती वजन मापक यंत्रे, बारदाना, सुतळी, व इतर आवश्यक ती साधने खरेदी केंद्रावर उपलब्ध करून देण्याची जबाबदारी खरेदी अभिकर्त्या संस्थेने घ्यावी. 

खरेदी करावयाच्या धान्याच्या दर्जावर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक असलेली यंत्रसामुग्री व पुरेसे प्रशिक्षण ग्रेडर्स नेमण्याची संपूर्ण जबाबदारी मार्केटिंग फेडरेशन आदिवासी विकास महामंडळ यांची राहील. धानाची दर्जात्मक तपासणी शासनाकडून (जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयातील गुणवत्ता नियंत्रण प्रशिक्षित कर्मचारी ) करतील खरेदी किंवा साठवणुकीच्या वेळी काही दोष आढळल्यास याबाबत अभिकर्ता संस्था जबाबदार राहील. 

महाराष्‍ट्र कृषी उत्‍पन्‍न खरेदी (नियम 1963 च्‍या नियम 32(ड) अन्‍वये कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीच्‍या क्षेत्रात केंद्र शासनाच्‍या किमान आधारभुत किंमत योजनेअंतर्गत जाहीर करण्‍यात आलेल्‍या उत्‍पन्‍नाची कमी भावाने खरेदी केली जाणार नाही याबाबत बाजार समितीने दक्षता घ्‍यावी. याबाबत बाजार समितीने आळा घातला नाही तर त्‍यांच्‍या विरुध्‍द उपरोक्‍त नियमांच्‍या नियम 45 अन्‍वये योग्‍य ती कार्यवाही करण्‍यात येईल.असे जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले.

खरेदी केंद्रावर फक्‍त खरेदी किंमतीबद्दल दरफलक न लावता किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत असलेले दर्जा, विनिर्देश,खरेदी केंद्रे इत्‍यादीची माहितीदेखील प्रदर्शित करावी. धान/भरडधान्‍य व सी.एम.आर. साठवणूकीसाठी बारदान्‍याचा वापर करताना काटेकोरपणे केंद्र शासनाचे निकष पाळणे आवश्‍यक आहे.  धान्‍याची खरेदी करीत असताना संबंधित तालुक्‍यातील तहसिलदारानी खरेदीच्‍या कालावधीत दर्जानियंत्रण व दक्षता पथकाची स्‍थापना करावी. दक्षता पथक म्‍हणून तहसिलदार यांनी काम पहावे.शासन निर्णय दिनांक 30 सप्टेंबर 2021 मधील सर्व अटी व शर्ती सूचनांचे काटेकोरपने  पालन  करावे असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले आहे.

0000

 संयुक्त राष्ट्रसंघदिनी संयुक्त राष्ट्रसंघाचा ध्वज राष्ट्रध्वजासमवेत उभारावा  

नांदेड (जिमाका) दि. 22 :- संयुक्त राष्ट्रसंघ दिन 24 ऑक्टोबर रोजी आहे. यादिवशी संयुक्त राष्ट्रसंघाचा ध्वज राष्ट्र ध्वजासमवेत उभारण्याबाबत शासन परिपत्रकानुसार निर्देश दिले आहेत. ज्या शासकीय कार्यालयात दररोज राष्ट्रध्वज उभारण्यात येतो त्या कार्यालयावर 24 ऑक्टोंबर या संयुक्त राष्ट्रसंघदिनी संयुक्त राष्ट्रसंघाचा ध्वज भारतीय ध्वजसंहिता 2002 च्या परिपत्रकानुसार राष्ट्रध्वजाच्या बरोबर उभारण्यात यावा. 

संयुक्त राष्ट्रसंघाचा ध्वज राष्ट्रध्वजाच्या कोणत्याही बाजुला फडकविता येतो. सामान्यत: ध्वज स्तंभाच्यासमोर उभ्या असलेल्या प्रेक्षकांच्यादृष्टीने त्यांच्या अगदी डावीकडे राष्ट्रध्वज असावा असेही उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनी कळविले आहे.

0000 

 देगलूर विधानसभा पोटनिवडणूक मतदानासाठी

30 ऑक्टोंबर रोजी सार्वजनिक सुट्टी

 

नांदेड (जिमाका) 22 :- 90-देगलूर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणुकीचे मतदान शनिवार 30 ऑक्टोंबर 2021 रोजी होणार आहे. या निमित्ताने 30 ऑक्टोंबर या मतदानाच्या दिवशी शासनाने सुट्टी जाहिर केली आहे. ही शासकीय सुट्टी देगलूर मतदारसंघाच्या क्षेत्रातील शासकीयनिमशासकीय कार्यालयेमहामंडळेमंडळे इत्यादी लागू राहील.

 

मतदारसंघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी त्या -त्या मतदारसंघाच्या बाहेर असतील त्यांना देखील ही सुट्टी लागू राहील. तसेच केंद्र शासनाची शासकीय कार्यालयेनिमशासकीय कार्यालयेसार्वजनिक उपक्रमबँका इत्यादीना ही सार्वजनिक सुट्टी लागू राहील, असे उपसचिव ज.जि.वळवी यांनी अधिसूचनेद्वारे कळविले आहे.

0000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...