Sunday, November 29, 2020

 

35 कोरोना बाधितांची भर तर एकाचा मृत्यू

54 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी 

नांदेड (जिमाका) दि. 29 :- रविवार 29 नोव्हेंबर 2020 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 35 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 16 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 19 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 54 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. 

आजच्या एकुण 1 हजार 547 अहवालापैकी 1 हजार 493 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 20 हजार 360 एवढी झाली असून यातील 19 हजार 234 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 384 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 14 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. शनिवार 28 नोव्हेंबर 2020 रोजी दत्तनगर नांदेड येथील 51 वर्षाच्या एका महिलेचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 549 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत. 

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 5, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 14, हदगाव कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 2, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 16, नायगाव तालुक्यांतर्गत 2, खाजगी रुग्णालय 15 असे एकूण 54 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.46 टक्के आहे. 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात 6, अर्धापूर तालुक्यात 3, मुखेड 3, लोहा 3, हिंगोली 1 असे एकुण 16 बाधित आढळले. तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 9, कंधार तालुक्यात 2, मुदखेड 2, लातूर 1, किनवट 2, मुखेड 2, परभणी 1 असे एकुण 19 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 384 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 32, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 27, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) येथे 41, मुखेड कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 18, किनवट कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 5, हदगाव कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 8, देगलूर कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 11, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 83, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 124, खाजगी रुग्णालय 35 आहेत. 

रविवार 29 नोव्हेंबर 2020 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 171, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 65 एवढी आहे. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 50 हजार 329

निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 25 हजार 848

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 20 हजार 360

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 19 हजार 234

एकूण मृत्यू संख्या- 549

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.46 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-5

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-5

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-626

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-384

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-14. 

आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

00000

 

पदवीधर निवडणूकीसाठी मतदारांना आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 29  :-  लोहा तालुकाअंतर्गत 8 मतदान केंद्रावर 5-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक-2020 साठी 1 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 8  ते सायंकाळी 5 वाजेपर्यत मतदान घेण्‍यात येणार आहे. या निवडणूकीसाठी मतदार यादीत नोंदणी केलेल्‍या मतदारांनी मतदान करावे, असे आवाहन लोह्याचे तहसिलदार परळीकर व्‍ही.एम. यांनी केले आहे. 

या निवडणूकीसाठी लोहा तालुक्‍यात लोहा शहर, पारडी (लोहा ग्रामीण) सोनखेड, शेवडी बा., कापशी बु., कलंबर बु., सावरगाव नं., माळाकोळी ही एकुण 8 मतदान केंद्र निश्‍चीत करण्‍यात आले आहे. सदर निवडणूकीसाठी मतदार यादीत नाव नोंदणी केलेल्‍या मतदारांनी मतदानाचा हक्‍क बजवावा, असेही आवाहन तहसिलदार लोहा यांनी केले आहे.

****

 

रक्त पिशवीच्या दराबाबत आता

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामार्फत दर निश्चिती 

नांदेड (जिमाका) दि. 29 :- जिल्ह्यातील गरजुंना रक्त पुरवठा वेळेवर व्हावा व कोणत्याही रुग्णाला रक्त पिशवीसाठी तिष्ठत बसावे लागू नये यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे कठोर नियमावली केली आहे. रक्त पिशवीच्या दराबाबत डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्यामार्फत योग्य दर निश्चिती करुन संनियंत्रण करण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सूचना दिल्या. आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली रक्तसाठा व पुरवठा याबाबत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी प्रदिप कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे डॉ. वाय. एच. चव्हाण व डॉ. समीर आणि सर्व खाजगी ब्लड बँकेचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

जिल्ह्यातील उपलब्ध असलेला रक्तसाठा व रुग्णांकडून केली जाणारी मागणी याची एकत्रीत माहिती प्राप्त होण्यासाठी सर्व ब्लड बँकेने दररोज रक्तगट निहाय किती साठा आहे त्याची माहिती देणे बंधनकारक असेल. थालेसिमियाच्या लाभार्थ्यांना नियमित रक्त पुरवठा करणे, जिल्हा शल्यचिकित्सामार्फत सर्व ग्रामीण, उपजिल्हा रुग्णालयात ब्लड स्टोअरेज युनिट तयार करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी दिले. रक्तदानाची चळवळ जिल्ह्यात वाढावी यावर सर्वांचा सहभाग घेत आठवड्यातून किमान दोन वेळा ब्लड कॅम्प अर्थात रक्तदान शिबीर आयोजित करण्याबाबतही या बैठकीत निर्णय झाला. उपलब्ध असलेला रक्तसाठा सर्वांना सहज कळावा यादृष्टिने शासकिय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने सॉफ्टवेअर तयार करुन दररोज रक्त गटनिहाय किती रक्तसाठा आहे याची माहिती गुगलसीटद्वारे तयार करुन ती उपलब्ध करण्याचेही या बैठकीत ठरविण्यात आले. नांदेड जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा निर्माण होणार नाही आणि लाभार्थ्याला अथवा गरजूला लवकरात लवकर रक्त मिळेल याची खबरदारी घ्यावी अशा स्पष्ट सुचना जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी सर्व रक्तपेढ्यांना दिल्या.

0000

 

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2020

मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त

9 कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य असणार   

नांदेड (जिमाका) दि. 29 :- आगामी 1 डिसेंबर 2020 रोजी होणाऱ्या विधानपरिषदेच्या द्विवार्षिक पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीकरिता मतदान करताना मतदान केंद्रांवर मतदारांची ओळख पटविण्यासाठी जे मतदार ओळखपत्र (EPIC) सादर करु शकत नाहीत, अशा मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या (EPIC) व्यतिरिक्त 1) आधार कार्ड 2) वाहन चालक परवाना 3) पॅन कार्ड 4) पारपत्र 5) केंद्र/राज्य शासन / सार्वजनिक उपक्रम/स्थानिक स्वराज संस्था किंवा खाजगी औद्योगिक घराणे यांनी वितरीत केलेले सेवा ओळखपत्र 6) खासदार/आमदार यांचे अधिकृत ओळखपत्र 7) संबंधित पदवीधर/शिक्षक मतदार संघातील शिक्षण संस्थेत कार्यरत असलेल्या पदवीधर/शिक्षक मतदारांना वितरीत केलेले सेवा ओळखपत्र 8) विद्यापीठाद्वारे वितरित पदवी/पदवीका मुळ प्रमाणपत्र 9) सक्षम प्राधिकरणाद्वारे वितरीत केलेले अपंगत्वाचे मुळ प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याबाबत निवडणूक आयोगाने आदेशित केले आहे. 

छायाचित्रासह मतदार ओळखपत्रान्वये मतदाराची ओळख पटत असेल तर मतदार ओळखपत्रातील किरकोळ विसंगती दुर्लक्षित करण्यात याव्यात. तसेच छायाचित्रासह मतदार ओळखपत्रातील विसंगत छायाचित्रामुळे मतदाराची ओळख पटणे/पटविणे शक्य नसल्यास मतदारास उपरोक्त पर्यायी कागदपत्रांपैकी एक ओळख कागदपत्र सादर करणे आवश्यक राहील. मतदार ओळखपत्र व पर्यायी ओळखपत्र याबाबत काही संभ्रम असल्यास भारत निवडणूक आयोगाचे दि.10.11.2020 रोजीचे मुळ आदेश अंतिम राहतील, असे उपआयुक्त (सा.प्र.) तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, 5-औरंगाबाद‍ विभाग पदवधीर मतदारसंघ औरंगाबाद यांनी कळविले आहे.

0000


औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2020

मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त

9 कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य असणार  


औरंगाबाद ,दि.29 (विमाका):-  आगामी 1 डिसेंबर 2020 रोजी होणाऱ्या विधानपरिषदेच्या द्विवार्षिक पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीकरिता मतदान करताना मतदान केंद्रांवर मतदारांची ओळख पटविण्यासाठी जे मतदार ओळखपत्र (EPIC) सादर करु शकत नाहीत, अशा मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या (EPIC) व्यतिरिक्त 1) आधार कार्ड 2) वाहन चालक परवाना 3) पॅन कार्ड 4) पारपत्र 5) केंद्र/राज्य शासन / सार्वजनिक उपक्रम/स्थानिक स्वराज संस्था किंवा खाजगी औद्योगिक घराणे यांनी वितरीत केलेले सेवा ओळखपत्र 6) खासदार/आमदार यांचे अधिकृत ओळखपत्र 7) संबंधित पदवीधर/शिक्षक मतदार संघातील शिक्षण संस्थेत कार्यरत असलेल्या पदवीधर/शिक्षक मतदारांना वितरीत केलेले सेवा ओळखपत्र 8) विद्यापीठाद्वारे वितरित पदवी/पदवीका मुळ प्रमाणपत्र 9) सक्षम प्राधिकरणाद्वारे वितरीत केलेले अपंगत्वाचे मुळ प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याबाबत निवडणूक आयोगाने आदेशित केले आहे.


छायाचित्रासह मतदार ओळखपत्रान्वये मतदाराची ओळख पटत असेल तर मतदार ओळखपत्रातील किरकोळ विसंगती दुर्लक्षित करण्यात याव्यात. तसेच छायाचित्रासह मतदार ओळखपत्रातील विसंगत छायाचित्रामुळे मतदाराची ओळख पटणे/पटविणे शक्य नसल्यास मतदारास उपरोक्त पर्यायी कागदपत्रांपैकी एक ओळख कागदपत्र सादर करणे आवश्यक राहील. मतदार ओळखपत्र व पर्यायी ओळखपत्र याबाबत काही संभ्रम असल्यास भारत निवडणूक आयोगाचे दि.10.11.2020 रोजीचे मुळ आदेश अंतिम राहतील, असे उप आयुक्त (सा.प्र.) तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, 5-औरंगाबाद‍ विभाग पदवधीर मतदारसंघ औरंगाबाद यांनी कळविले आहे.

****

समाज कल्याण कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडावंदन   नांदेड दि. 26 जानेवारी : भारताचा 76 वा प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारी रोजी स...