Friday, February 9, 2024

 वृत्त क्रमांक 119 

नांदेड रेल्वेस्थानक परिसरात 22 तंबाखू विक्रेत्यांवर कार्यवाही

 

नांदेड, (जिमाका) दि. 9 :- नांदेड शहरातील रेल्वेस्थानक परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची मोठ्या प्रमाणात विक्री तसेच कोटपा 2003 कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण पथकाने फेब्रुवारी रोजी रेल्वे स्थानक परिसरात अचानक धाडी टाकून 22 तंबाखू विक्रेत्यांकडून 10 हजार 500 रुपये दंड आकारण्यात आला. ही कार्यवाही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकरअतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरके व नोडल अधिकारी डॉ. हनमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

 

या पथकात जिल्हा सल्लागार डॉ. उमेश मुंडेमानसशास्त्रज्ञ प्रकाश आहेरसामाजिक कार्यकर्ता बालाजी गायकवाडसमुपदेशक सदाशिव सुवर्णकारसहायक सुनिल तोटेवाड वाहनचालक गौरव येवलेमराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे विभागीय समन्वयक मंगेश गायकवाड तसेच वजिराबाद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पी. बी. कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. प्रदिप खानसोळे व पो.कॉ. प्रदिप कांबळे उपस्थित होते. सार्वजनिक ठिकाणी तसेच शैक्षणिक अथवा शासकीयनिमशासकीय कार्यालयाच्या परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री अथवा सेवन किंवा साठवण होत असल्यास जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षजिल्हा रुग्णालयात तक्रार नोंदवून नांदेड जिल्हा तंबाखू मुक्त करण्याच्या या अभियानास सहकार्य करावेअसे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

0000

 वृत्त क्रमांक 118

 

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेत अर्जाची नोंदणी

महाडिबीटी प्रणालीद्वारे 15 फेब्रुवारी पर्यंत करण्याचे आवाहन

 

नांदेड, (जिमाका) दि. 9 :- अनुसूचित जाती प्रवर्गातील मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजना चालू शैक्षणिक वर्षात सन 2023-24 पासून महाडिबीटी https://Prematric.mahait.org/Login/Login प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. अस्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या मुला-मुलींसाठी मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज शाळेच्या मुख्याध्यापकांनी 15 फेब्रुवारीपर्यंत महाडिबीटी प्रणालीमध्ये नोंदणी करावेतअसे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आउलवार यांनी केले आहे.

 

या योजनेत इयत्ता पहिली ते दहावीपर्यत शिष्यवृत्तीइयत्ता नववी व दहावी शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्तीइयत्ता पाचवी ते सातवी व इयत्ता आठवी ते दहावी मध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थीनींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्तीमाध्यमिक शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती व इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण व परीक्षा फी या योजनांचा समावेश आहे.  

00000

वृत्त क्र. 117

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या

थेट कर्जासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड, (जिमाका) दि. 9 : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत मांगमातंगमिनी-मादीगमादींगदानखणी मांगमांग महाशीमदारीराधेमांगमांग गारुडीमांग गोराडीमादिगा या समाजातील दारिद्र रेषेखालील महिलापुरुष घटकांच्या आर्थिक उन्नतीसाठी तसेच त्यांना स्वंयरोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने महामंडळामार्फत सन 2023-24 या आर्थिक वर्षासाठी एनएसएफडीसी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत कर्ज प्रस्तावासाठी महामंडळामार्फत वेबसाईट प्रणाली विकसित केली आहे. तरी मातंग समाजातील गरजु लाभार्थ्यांनी या https://beta.slasdc.org संकेतस्थळावर अर्ज भरावेतअसे आवाहन महामंडळाचे व्यवस्थापक टि.आर. शिंदे यांनी केले आहे.

या योजनेअंतर्गत सुविधा कर्ज योजना लाख रुपयेलघुऋण वित्त योजना लाख 40 हजार रुपयेमहिला समृध्दी योजना लाख 40 हजार रुपयेशैक्षणिक कर्ज योजना देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी 30 लाख रुपये व परदेशातील अभ्यासक्रमासाठी 40 लाख रुपयापर्यतचे कर्ज प्रस्ताव सादर करता येतील. लाभार्थ्यांनी आपले कर्ज प्रस्ताव महामंडळाच्या संकेतस्थळ (Portal) वर ऑनलाईन पध्दतीने जिल्हा कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावे. महामंडळाचे संकेतस्थळ मार्च 2024 रोजी बंद करण्यात येईल याची नोंद घ्यावीअसे आवाहन जिल्हा व्यवस्थापक टि.आर.शिंदे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनग्यानमाता शाळेसमोर नांदेड येथील कार्यालयात येऊन संपर्क साधावा, असेही महामंडळाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
0000

वृत्त क्रमांक 116

 जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू 

नांदेड (जिमाका) दि. 9 :- नांदेड जिल्ह्यात 22 फेब्रुवारी 2024 च्या मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 

 

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 22 फेब्रुवारी 2024 च्या मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहील. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.

 

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

00000

 डीप क्लिन मोहिम- संपूर्ण स्वच्छतेचा ध्यास

स्वच्छता हा घटक आपल्या निरोगी जीवनासाठी खूप महत्वाचा आहे. गेल्या काही महिन्यात मुंबईतील प्रदुषणाने धुळ, धूर यांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली होती. मुंबईची जगभरात एक वेगळी ओळख आहे. या ठिकाणी देश, विदेश तसेच जगभरातून पर्यटक, विविध देशांचे उच्चपदस्थ येत असतात. म्हणून त्यांना अपेक्षित अशी मुंबई पाहण्यासाठी स्वच्छ मुंबई व सुंदर मुंबई करण्यासाठी ‘डिप क्लिन ड्राईव्ह’ मोहीम सुरू केली आहे. आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2015 मध्ये देशात स्वच्छता मोहीम सुरू केली. आम्हीही त्यांच्या पावलांवर पाऊलं ठेवत या मोहिमेचा शुभारंभ केला. ही चळवळ फक्त शासनाची नाही तर सर्व नागरिकांची झाली आहे.

यावर्षीच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात देशात महाराष्ट्राने उज्वल कामगिरी केली असून स्वच्छता अभियानाचा पुरस्कार देशाच्या राष्ट्रपती महोदय यांच्या हस्ते महाराष्ट्राला नुकताच मिळाला. महाराष्ट्राच्या यशाचा हा आलेख असाच चढता राहण्यासाठी आणि स्वच्छतेच्या गुणवत्ता यादीत राज्यातील जास्तीत जास्त शहरांचा सहभाग वाढावा, यासाठी ही मोहिम एक बुस्टर ठरणार आहे, हे लक्षात घेऊन थेट लोकांमध्ये जाऊन मोहिमेत सहभागी होण्याचा प्रयत्न केला.

मुंबईकरांचा श्वास कोंडला जात असतांना शासन म्हणून सर्वसामान्यांची यातून सुटका करण्यासाठी आम्ही तातडीने पाऊले उचलली. मुंबईतील प्रत्येक रस्ता, नाले यांच्यातील कचरा स्वच्छ व्हावा, सोबतच वातावरणातील धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रत्येक गल्लीतील रस्ता धुवून काढण्याच्या सूचना मुंबई महापालिकेला दिल्या. संपूर्ण मुंबईला स्वच्छ सुंदर करणाऱ्या या मोहिमेला दुहेरी यश मिळाले. यामुळे मुंबईतील प्रदुषणाची पातळी खाली आली. सोबतच मुंबईकरांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती निर्माण होऊन त्यांचा परिसर स्वच्छतेते सहभाग देखील वाढला. मोहिमेच्या यशाबद्दल सांगतांना याचे खरे हिरो स्वच्छता कर्मचारी आहेत, हे देखील नमूद करावे लागेल. त्यांच्या दिवस-रात्र सुरु असलेल्या कामांमुळेच हे अभियान मुंबईत यशस्‍वी होऊ शकले आहे.

संपूर्ण स्वच्छता मोहीमेचे हे यश लक्षात घेऊन टप्प्या टप्प्याने संपूर्ण राज्यात या मोहिमेचा विस्तार करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. गेटवे ऑफ इंडियाच्या प्रांगणात एका भव्‍य दिव्य सोहळ्यात या राज्यस्तरीय मोहिमेचे उद्घाटन देखील पार पडले. या मोहीमेच्या माध्यमातून लवकरच राज्य स्वच्छ, सुंदर व हरित होण्यास मदत होणार आहे. मोहिमेच्या दरम्यान 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्या येथे श्री राममूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न झाला. या मंगल सोहळ्याचे निमित्त साधून देशभरातील मंदिरांमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्याचे आवाहन प्रधानमंत्री महोदयांनी केले होते. या आवाहनाला संपूर्ण स्वच्छता मोहीमेच्या माध्यमातून राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला. राज्यातील अनेक मंदिरांमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.

स्वच्छता मोहिमेअंतर्गत केवळ कचरा उचलणे, रस्ते स्वच्छ करणे एवढाच विचार न करता प्रदूषण कमी करण्यासाठी जिथे जिथे जागा मिळेल तेथे झाडे लावून हरीत पट्टे तयार करणे, जेणेकरुन ऑक्सिजन पार्क तयार होतील, यासाठी पुढाकार घेण्यात येत आहे. तसेच  मियावाकी पद्धतीने वृक्षलागवड करुन शहरात जंगले (Urban forest) तयार करण्यात येत आहेत. विविध ठिकाणी ग्रीन पॅच तयार करुन तो परिसर हिरवागार करणे. चौक, भिंतीचे सुशोभिकरण करणे ही कामे सुद्धा पुढच्या टप्प्यात करण्यात येत आहेत.

संपूर्ण स्वच्छता मोहिमेतून सर्व शहरे स्वच्छ होत आहेत. राज्यातील सर्व धार्मिक स्थळांना लाखोच्या संख्येने भाविक भेट देत असतात. भाविकांचे श्रद्धास्थान असणारे ही ठिकाणे स्वच्छ आणि सुंदर राहिली पाहिजेत. त्यासाठी या धार्मिक स्थळांच्या स्वच्छतेसाठी सुद्धा कायमस्वरुपी योजना राबविण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.

स्वच्छतेसोबतच नागरिकांना चांगले आरोग्य मिळावे याकरिता शासन आपल्या दारी या उपक्रमाप्रमाणे मुंबई मध्ये आरोग्य आपल्या दारी हा उपक्रम आपण राबविणार आहोत. या उपक्रमात  मुंबई महानगरपालिका आरोग्य विभाग प्रत्येक घरा घरात भेट देऊन आरोग्य आपल्या दारी मोहीम राबविणार आहे. या मोहिमेतून नागरिकांची मोफत आरोग्य  तपासणी करण्यात येऊन त्यांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

स्वच्छता हा निरोगी जीवनाचा मूलमंत्र आहे.  स्वच्छतेचा हा मूलमंत्र राज्यातील प्रत्येक गावात, घरा-घरात पोहोचला पाहिजे यासाठी या स्वच्छ्ता मोहिमेत प्रत्येकाने सहभागी होऊन राज्यात स्वच्छतेची गुढी उभारायला हवी. आपल्या या प्रयत्नातूनच स्वच्छता अभियानात देशात अग्रेसर असलेला आपला महाराष्ट्र आपला हा बहूमान टिकवू शकणार आहे. चला तर मग आपण सर्व स्वच्छ, महाराष्ट्र आणि सुंदर महाराष्ट्रासाठीच्या प्रयत्नात सहभागी होऊया !

0000

 मा.मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा लेख

कामाप्रती समर्पित असणारा नेता

हसन मुश्रीफ

(मंत्री, वैद्यकीय शिक्षण आणि विशेष सहाय्य) 

मा.मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे मेहनती, समर्पित आणि निष्ठावान आहेत.  ते अत्यंत शिस्तप्रिय आणि जे काही काम निवडतात त्यात ते प्राविण्य कमवितात. त्यांच्या कामाप्रती समर्पित असतात.  त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रगती आणि समृद्धी मिळविण्यासाठी ते कठोर परिश्रम करतात. यशस्वी होण्यासाठी ते शॉर्टकट मारत नाही.  वरून कितीही कठोर दिसत असले तरी आतून मात्र ते मृदु आणि मधुर आहेत. ते प्रेमळ आणि काळजी घेणारे आहेत. आपल्या कामाच्या आणि महत्त्वाकांक्षेच्या शिखरावर पोहोचण्यासाठी ते अहोरात्र मेहनत घणा-या या नेत्याला वाढदिवसाच्या मनःपूर्वक अनंत शुभेच्छा.. त्यांच्याविषयी दोन शब्द...

मा.मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे हे नगर विकास आणि मी ग्रामविकास मंत्री म्हणून महाविकास आघाडी सरकारमध्ये  काम केले आहे. श्री एकनाथ शिंदे महाराष्ट्र राज्याचे २० वे मुख्यमंत्री आहेत. २०१५ ते २०१९ पर्यंत एकनाथ शिंदे हे सार्वजनिक बांधकाम खात्याचे कॅबिनेट मंत्री होते. ठाण्यातील कोपरी-पांचपाखाडी विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार आहेत. २००४,२००९, २०१४ आणि २०१९ असे सलग चार वेळा ते महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून गेले आहेत.

  श्री.एकनाथ शिंदे यांनी वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी समाजकारण व राजकारणात प्रवेश केला. गोरगरीब जनतेला स्वस्त दरात धान्य उपलब्ध करून देणे, टंचाईच्या काळात पामतेल उपलब्ध करून देणे, नागरी समस्यांविरोधात सरकार व प्रशासनाविरोधात केली जाणारी आंदोलने यातही एकनाथ शिंदे आघाडीवर असायचे. सन १९८६ साली सीमाप्रश्नी झालेल्या आंदोलनात एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील शिवसेनेच्या १०० कार्यकर्त्यांसह भाग घेतला होता. त्यावेळी बेल्लारी येथील तुरुंगात त्यांना ४० दिवस कारावास झाला होता.

सन २००४ ते २०१४ या १० वर्षांच्या काळात विधानसभेत विरोधी पक्षाचे आमदार या नात्याने त्यांनी अनेक समस्यांवर, राज्यापुढील महत्त्वाच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवला. ठाण्यातील महत्त्वाची क्लस्टर डेव्हलपमेंट योजना, ठाण्यासाठी मेट्रो, ठाणे आणि मुलुंडच्या दरम्यान नवे विस्तारित ठाणे स्थानक, पाणीटंचाई या ठाण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या विषयांबरोबरच सागरी सुरक्षा, पोलीस दलाचे आधुनिकीकरण, वाढती महागाई, राज्याच्या डोक्यावर वाढते कर्ज अशा अनेक विषयांवरील त्यांची अभ्यासपूर्ण भाषणे गाजली.

सन २०१४ च्या डिसेंबर महिन्यात शिवसेनेने राज्यातील भाजपप्रणीत सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री या पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. या मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) ते पदसिद्ध अध्यक्ष झाले आणि एमएसआरडीसीचे पुनरुज्जीवन करण्याचे काम त्यांनी केले.

श्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एमएसआरडीसी, एमएमआरडीए, सिडको आदी प्राधिकरणांच्या माध्यमातून सुरू असलेले महत्त्वपूर्ण प्रकल्प यामध्ये नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग क्षमता विस्तार, वांद्रे-वर्सोवा सी लिंक,ठाणे खाडीवरील वाशी येथे तिसरा पुल, ठाणे-बोरिवली भुयारी मार्ग, शीळ-कल्याण रुंदीकरण, ठाणे-घोडबंदर उन्नत रस्ता अशी महत्त्वाची कामे झाली आहेत. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील अपघात कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करण्याचा प्रयत्न त्यानी केला.

आरोग्यमंत्री म्हणून त्यांना जेमतेम सात ते आठ महिन्यांचा कालावधी मिळाला. परंतु, एवढ्या अल्प कालावधीतही त्यांनी धडाकेबाज निर्णय घेत अनेक प्रलंबित विषय मार्गी लावले आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बळकट करण्याचा प्रयत्न केला.

खेडेगावापासून आजच्या विकसित शहरापर्यंत ठाण्याची वाटचाल झाली आहे. नैसर्गिक पद्धतीने वाढलेलं हे शहर स्वाभाविकपणे नवी मुंबई किंवा चंडिगढ प्रमाणे मुद्दामहून वसवलेल्या विकसित शहरांप्रमाणे नाही. ही बाब लक्षात घेऊन जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे नगरविकासमंत्री या नात्याने श्री.शिंदे यांनी ठाण्याला २१ व्या शतकातील आधुनिक आणि उत्तमरित्या नियोजनबद्ध असे विकसित शहर करण्यासाठी अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची योजना आखली आहे.

मी आरोग्याला प्राधान्य देणारा असल्याने मला वैद्यकीय शिक्षण आणि ग्रामीण भागाशी नाळ जुळलेली असल्याने वैद्यकीय शिक्षण विभागाची जबाबदारी त्यांनी सोपवली आहे. आभ्यासू नेतृत्व असल्याने त्यांनी माझ्याकडे असलेले कौशल्य गुणानुसार खाते दिली आहेत.मुख्यमंत्री मा.शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विविध निर्णय घेण्यात आले.त्यातील काही महत्वाचे निर्णय पुढील प्रमाणे..

*प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचे धोरण. त्यानुसार या शैक्षणिक वर्षापासून रत्नागिरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू. परभणी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाच्या मान्यतेसाठी सादर. नाशिक येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात येत आहे. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नसलेल्या 9 जिल्ह्यांत (पालघर, गडचिरोली, अमरावती, वाशिम, जालना, बुलडाणा, अंबरनाथ, भंडारा, आणि वर्धा) शासकीय वैद्यकीय महाविद्यालये लवकरच सुरू करण्यात येणार.

* राज्यातील शासकीय महाविद्यालयांचे श्रेणीवर्धन करणे व नव्याने प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालये उभारण्याकरिता आशियाई विकास बँक संस्थेकडून सुमारे 4,000 कोटी व जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी या संस्थेकडून सुमारे 5,500 कोटी रुपयांचे कर्ज घेणार.

* शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमार्फत रक्तदान मोहीम, स्थूलपणा जनजागृती व उपचार अभियान, स्तन कर्करोग जनजागृती व उपचार अभियान, स्वच्छ मुख अभियान, थायरॉईड जनजागृती व उपचार अभियान आणि अवयव दान जनजागृती अभियाने सुरू करण्यात आली असून सातत्याने सुरू ठेवण्यात येणार आहेत.

* शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच रूग्णालयातील परिचर्या, तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील एकूण 5,182 पदे भरण्याबाबतची जाहिरात 10 मे 2023 रोजी प्रसिद्ध. ही भरती प्रक्रिया टी.सी.एस. या नामांकित कंपनीकडून ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे.

* वैद्यकीय महाविद्यालयास जोडून वाढीव 157 नर्सिंग महाविद्यालयांना मान्यता देण्याबाबत सन 2023-2024 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात घोषणा. त्याच धर्तीवर राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना जोडून बीएससी नर्सिंग अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे.

* जळगाव येथे मेडिकल हब निर्माण करण्यात आले असून त्यानुसार शासकीय वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, होमिओपॅथी व भौतिकोपचार महाविद्यालये उभारण्यात येणार आहेत. त्यानुसार तेथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय सुरू झाले आहे, तर राज्यातील पहिले शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय जळगाव येथे सन 2022-23 या शैक्षणिक वर्षापासून सुरू.

* भारतीय वैद्यकीय आयोगाच्या मानकांनुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आवश्यक निवासी वैद्यकीय अधिकारी यांची 1,432 पदे निर्माण करण्यात आली.

* विविध संवर्गातील एकूण 5182 पदांसाठी  भरती प्रक्रिया यशस्वीपणे राबविण्यात आली.

 

पुन्हा एकदा वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

शब्दांकन: राजू धोत्रे, विभागीय संपर्क अधिकारी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय

०००००००

विशेष लेख

 शुभसंदेश

 सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री

 श्री.संजय राठोड

मृद व जलसंधारण मंत्री, महाराष्ट्र राज्य

राजकारणात सामान्य लोकांना आपला वाटेल, असा राजकारणी सापडणे दुरापास्त. या पार्श्वभूमीवर सामान्यातील सामान्य माणूस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संवाद साधू शकतो. त्या संवाद साधणाऱ्या प्रत्येकाला हा माणूस आपलाच आहे, असं वाटतं, हे खरं मुख्यमंत्र्यांचं मोठेपण आहे. मुख्यमंत्री म्हणून दीड वर्षातच त्यांनी आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवला आहे. महिला, उपेक्षित, गरीब, सामान्यांच्या हिताचे अनेक निर्णय त्यांनी मोठ्या धाडसाने घेतले. त्यामुळे सामान्यांचे मुख्यमंत्री म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.

महाबळेश्‍वर तालुक्यातील दुर्गम दरे तर्फे तांब येथून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा खडतर प्रवास सुरू झाला. ठाण्यात रिक्षाचालक ते राज्याचा मुख्यमंत्री हा त्यांचा प्रवास थक्क करायला लावणारा आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी दीडवर्षात अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले आहेत. विशेषतः सामान्य जनता व गोरगरिबांना दिलासा मिळेल, अशा योजना त्यांनी आपल्या अनुभवाच्या जोरावर राबविल्या आहेत. सर्वसामान्यांची कामे स्थानिक पातळीवर व्हावीत, त्यांना विविध योजनांचे लाभ मिळावेत, यासाठी शासन थेट जनतेच्या दारात जात आहे. मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान राबविण्यात येत असून, राज्यभरातून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गरिबांसाठी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत एसटीचा प्रवास, महिलांसाठी एसटी बस प्रवासात ५० टक्के सवलत अशा निर्णयामुळे मुख्यमंत्र्यांना सर्वसामान्यांचे आशीर्वाद मिळाले आहेत.  राज्यातील एकही सर्वसामान्य- गोरगरीब गरजू रुग्ण पैशाअभावी उपचाराविना राहणार नाही, याची काळजी मुख्यमंत्री जातीने घेत आहेत. मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्षाने रुग्णसेवेत उत्कृष्ट कामगिरी करून हजारो रुग्णांच्या जीवनात निरामय आरोग्याचा प्रकाश आणला आहे. 

    सामान्य शेतकरी कुटुंबातून पुढे आलेल्या मुख्यमंत्री शिंदे यांचे शेती व शेतकऱ्यांवर विशेष लक्ष आहे. शेतकरी हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. "जगाचा पोशिंदा शेतकरी सुखी, तर जग सुखी " या उक्तीप्रमाणे महाराष्ट्रातील शेतकरी सुखी कसा राहील , यावर महाराष्ट्र शासनाचा भर राहिला आहे .यानुसार राज्य शासनाची पावले पडत आहेत. याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली  सरकारने गेल्या  दीड वर्षात शेतकऱ्यांना तब्बल ४४ हजार २७८ कोटी रुपयांची विक्रमी मदत केली आहे.दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, पूर, गारपीट अशा प्रत्येक नैसर्गिक आपत्तीत  सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहिले आहे.

  शेतीच्या शाश्वत प्रगतीसाठी काही महत्वाच्या योजनांना वेग दिला आहे. त्यामध्ये नदीजोड प्रकल्प आणि जलयुक्त शिवारचा दुसरा टप्पा राबवून महाराष्ट्राला  दुष्काळमुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. जलयुक्त शिवार योजनेचा दुसरा टप्पा  पाच हजार गावांत सुरू केला आहे.

आमच्या यवतमाळ जिल्ह्यांसाठी ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी नुकतेच ८८१कोटी रुपये निधीच्या विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन केले आहे.औद्योगिक विकासाच्या दृष्टीने यवतमाळ शहर समृद्धी महामार्गाला जोडण्यात येणार आहे.यवतमाळ जिल्ह्यात शासन आपल्या दारी अभियान कालावधीत १६ लाख नागरिकांना ६०१ कोटी रुपयांच्या निधीतून विविध योजनांचे लाभ वितरण करण्यात आले आहेत.यवतमाळ जिल्ह्याच्या विविध विकास कामांना पाहिजे तेवढा निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिली आहे.

संवेदनशील मुख्यमंत्री

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुरक्षा आणि शिष्टाचार न बाळगता सर्वसामान्यांना भेटतात. त्यांच्याशी संवाद साधतात. आपण जनसामान्यांचे मुख्यमंत्री आहोत, ही भावना बाळगून ते सर्वांना भेटत असतात. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून आल्यामुळे त्यांना परिस्थितीची पुरेपूर जाणीव आहे. विशेषतः सामान्य लोकांबद्दल आणि त्यांच्या कामाबद्दल ते स्वतः लक्ष घालून सगळी कामे करून घेतात. जनतेला भावलेले एक संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून आज त्यांच्याकडे पाहिले जाते. वैद्यकीय मदत मागायला त्यांच्याकडे दररोज अक्षरशः रीघ लागते. प्रत्येकाला आपापल्या परीने ते नेहमीच मदत करतात. एखाद्याची समस्या जाणून घेऊन सभोवतालच्या माणसांशी चर्चा करून तत्काळ निर्णय घेण्याची, इतकेच नव्हे तर त्याची कार्यवाही झाली, की नाही, याचा पाठपुरावा करण्याची पद्धत मुख्यमंत्री शिंदे यांनी निर्माण केली. मुख्यमंत्री सामान्य नागरिक ते वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत प्रत्येकाशी ते सौम्य भाषेत संवाद साधताना दिसतात.

    श्री. शिंदे साहेबांचे संघर्षमय जीवन सर्व शिवसैनिकांना मार्गदर्शक आहे.मागील दीड वर्षांत मुख्यमंत्री म्हणून राज्यासाठी केले काम हे कायम लक्षात राहील असे आहे.अशा या आमच्या मार्गदर्शक एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त 'पुन्हा एकदा मन:पूर्वक अभिनंदन आणि   मन:पूर्वक शुभेच्छा...!

 

शब्दांकन: दत्तात्रय कोकरे, विभागीय संपर्क अधिकारी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय

 मा.मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा लेख

संजय बनसोडे

राज्यासाठी झोकून काम करणारा नेता

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एमएसआरडीसी, एमएमआरडीए, सिडको आदी प्राधिकरणांच्या माध्यमातून सुरू असलेले महत्त्वपूर्ण प्रकल्प यामध्ये नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग क्षमता विस्तार, वांद्रे-वर्सोवा सी लिंक, ठाणे खाडीवरील वाशी येथे तिसरा पूल, ठाणे-बोरिवली भुयारी मार्ग, शीळ-कल्याण रुंदीकरण, ठाणे-घोडबंदर उन्नत रस्ता अशी महत्त्वाची कामे झाली आहेत. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील अपघात कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करण्याचा प्रयत्न त्यानी केला.

आरोग्यमंत्री म्हणून त्यांना जेमतेम सात ते आठ महिन्यांचा कालावधी मिळाला. परंतु, एवढ्या अल्प कालावधीतही त्यांनी धडाकेबाज निर्णय घेत अनेक प्रलंबित विषय मार्गी लावले आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बळकट करण्याचा प्रयत्न केला.

खेडेगावापासून आजच्या विकसित शहरापर्यंत ठाण्याची वाटचाल झाली आहे. नैसर्गिक पद्धतीने वाढलेलं हे शहर स्वाभाविकपणे नवी मुंबई किंवा चंडिगढ प्रमाणे मुद्दामहून वसवलेल्या विकसित शहरांप्रमाणे नाही. ही बाब लक्षात घेऊन जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे नगरविकासमंत्री या नात्याने श्री.शिंदे यांनी ठाण्याला २१ व्या शतकातील आधुनिक आणि उत्तमरित्या नियोजनबद्ध असे विकसित शहर करण्यासाठी अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची योजना आखली आहे.

माझी ग्रामीण भागाशी नाळ जुळलेली आहे.युवक आणि त्यांची उर्जा देशासाठी फार महत्त्वाची आहे.युवकांसाठी सातत्याने काम करीत आहे. यामुळेच मला क्रीडा  विभागाची जबाबदारी त्यांनी सोपवली असावी तसेच क्षमता पाहून बंदरे विकास विभागही मला दिले आहे. आभ्यासू नेतृत्व असल्याने त्यांनी माझ्याकडे असलेले कौशल्य गुणानुसार खाते दिली आहेत.मुख्यमंत्री मा.शिंदे यांच्या नेतृत्वाखाली क्रीडा व युवक कल्याण आणि बंदरे विकास विभागात विविध निर्णय घेण्यात आले.त्यातील काही महत्वाचे निर्णय पुढील प्रमाणे..

• प्रो गोविंदा

> प्रो कबड्डीच्या धर्तीवर प्रो गोविंदा दहीहंडी स्पर्धेचे यशस्वी आयोजन आणि सहासी खेळाचा दर्जा, खेळाडूंना विमाकवच

• शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार

> सन २०१९-२०, २०२०-२१, २०२१-२२ अशा तीन वर्षापासून प्रलंबित शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराचे वितरण व शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार पारितोषिक रक्कमेमध्ये वाढ.

> जीवनगौरव पुरस्कार रु. ३.०० लक्ष वरुन रु. ५.०० लक्ष व खेळाडूसाठी रु. १.०० लक्ष वरुन ३.०० लक्ष अशी वाढ

• आशियाई क्रीडा स्पर्धा

> पात्र खेळाडूंना पुर्वतयारीसाठी प्रत्येक रु ५. लक्ष व दिव्यांग खेळाडूंना रु. २.०० लक्ष खेळाडूच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले. पदक विजेत्या खेळाडूंच्या पारितोषिक रक्कमेमध्ये १० पट वाढ वैयक्तीक सुवर्ण पदक रु. १० लक्ष वरुन रु. १.०० कोटी, रौप्य पदक- रु. ७.५० लक्ष वरुन रु. ७५.०० लक्ष, कांस्य पदक रु. ५.०० लक्ष वरुन रु. ५०.०० लक्ष तसेच सांघिक सुवर्ण पदक रु. ७५.०० लक्ष, रौप्य पदक- रु. ५०.०० लक्ष, कांस्य पदक रु. २५.०० लक्ष तसेच मार्गदर्शकांना खेळाडूच्या पारितोषिक रक्कमेच्या १०% बक्षीस.

> सर्व सहभागी खेडाळूना रु.१०.०० लक्ष पारितोषिक जाहिर करण्यात आले.

• मिशन लक्षवेध

> महाराष्ट्र राज्यातून ऑलिंपिक व जागतिक स्तरावर पदक प्राप्त खेळाडू तयार करण्यासाठी जिल्हा केंद्र मानून निवडक खेळातील खेळाडूंना अद्यावत असे प्रशिक्षणाची योजना, महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यात १३८ केंद्र ८ विभागीय

मुख्यालय ठिकाणी ३७ प्रशिक्षण केंद्र १२ क्रीडा प्रकरांची High Performance Center अद्यावत Sports Science Laboratory निर्माण करणार.

> खाजगी High Performance Training Center / अँकॅडमी ना अ, , क असा दर्जा देऊन मुल्यांकन करण्यात येणार.

• छ. संभाजीनगर येथे स्वतंत्र क्रीडा विद्यापीठ

> मराठवाडा मुक्ती संग्राम निमित्त छत्रपती संभाजीनगर येथे स्वतंत्र क्रीडा विद्यापीठ - रु. ६५०.०० कोटीचा निधी मंजूर, समितीचे गठन करण्यात आले.

• नमो क्रीडा संकुल योजना

> मा. प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त राज्यात राबविण्यात येत असलेल्या नमो ११ कलमी कार्यक्रमांतर्गत क्रीडा विभागामार्फत राज्यातील ७३ ठिकाणी क्रीडांगण/क्रीडा सुविधा विकसित करणेतंर्गत नमो क्रीडा संकुल अभियान राबविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे.

• क्रीडा विभागातील पद भरती

> क्रीडा विभागातील विविध रिक्त पदाची पुर्तता करणे क्रीडा अधिकारी/क्रीडा मार्गदर्शक यांच्या १०९ पदासाठी भरती प्रक्रीया व लघुलेखक- १, शिपाई- १, तसेच एमपीएससी मार्फत ३१ तालुका क्रीडा अधिकारी व २७ लिपिक यांची भरती प्रक्रीया सुरु केली आहे.

ऑलिंपिक भवन

> शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे-बालेवाडी येथे महाराष्ट्र ऑलिंपिक असोशिएशनकरीता भव्य असे ऑलिंपिक भवन निर्मिती करणार, ऑलिंपिक म्युझीयमची स्थापना करणार व लवकरच भुमीपुजन

• आंतराराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ

> पुणे येथे आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ तात्पुरत्या स्वरुपात कुलगुरुचीं नेमणूक

• पॅरीस ऑलिंपिक २०२४

> पॅरीस ऑलंपिक २०२४ करीता कोटा प्राप्त केलेल्या महाराष्ट्रातील खेळाडूंना सरावाकरीता आर्थिक सहाय्य देण्यात येणार.

• क्रीडा संकुल निर्मिती

> तालुका क्रीडा संकुल बांधकामाकरीता रु. ५.०० कोटी वरुन रु. १०.०० कोटी, जिल्हा क्रीडा संकुला करीता रु. २५.०० कोटी वरुन रु. ५०.०० कोटी, विभागीय क्रीडा संकुल करीता रु. ५०.०० कोटी वरुन रु. ७५.०० कोटी वाढ करण्यात आली.

• व्यायामशाळा विकास योजना

> व्यायामशाळा विकास योजनेअंतर्गत व्यायामशाळा बांधकामासाठी रक्कम रु. ७.०० लक्ष वरुन रक्कम रु. १४.०० लक्ष वाढ करण्यात आली.

• खेलो इंडिया पॅरा गेम्स दिल्ली

> प्रथमच होणा-या खेलो इंडिया पॅरा गेम्स दिल्ली करीता एकूण सात खेळामध्ये महाराष्ट्रातील ७७ खेळाडूंचा सहभाग व सर्व प्रकारे खेळाडूना मदत

• स्पोर्टस सायन्स सेंटर

> बालेवाडी, पुणे येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे अद्यावत असे स्पोर्टस सायन्स सेंटर उभारण्यात येईल.

• युवा महोत्सव

> सन २०२३-२४ पासून जिल्हा, विभाग व राज्यस्तरावरील युवा महोत्सवाचे कृषि विभागाच्या सहकार्याने भव्य आयोजन करण्यात येत आहे.

• राज्य क्रीडा दिन

> भारतासाठी वैयक्तीक क्रीडा प्रकारात ऑलिंपिक पदक मिळवणारे ऑलिंपिक वीर कै. खाशाबा जाधव यांचा जन्मदिन १५ जानेवारी हा राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा केला जाणार.

• गोवा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा

> राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा गोवा येथे महाराष्ट्र राज्याने एकूण २२८ पदके मिळवून विक्रम प्रस्थापित केला व सर्वसाधारण विजेतेपद प्राप्त केले.

• एन.सी.सी नौसैनिक कॅम्प

> २० वर्षानंतर महाराष्ट्र नौसैनिक कॅम्प मध्ये सर्वसाधारण विजेता

> कोल्हापूर येथे वायूसेना एन.सी.सी नोड स्थापनेसाठी कार्य प्रगतीपथावर

> छत्रपती संभाजीनगर येथे विशेष एन.सी.सी प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार

बंदरे विभाग

बंदरे विकास

येत्या काळात ’प्रधानमंत्री गतिशक्ती नॅशनल मास्टर प्लॅन’ कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यातील बंदरांचा विकास अधिक वेगाने.

बंदरे विकास धोरण २०१६ व २०१९ यामध्ये सुधारणा करुन महाराष्ट्र सागरी विकास मंडळ धोरण- २०२३ आणले

नवीन धोरणामुळे वॉटरफ्रंट रॉयल्टीचा दर प्रत्येक ५ वर्षानंतर केवळ ३ टक्के इतका राहणार आहे.

जलमार्गासंबंधित व्यापार आणि उद्योगांसाठी  विविध सुविधा निर्माण करण्यात येत आहेत.

शेवटी पुन्हा एकदा मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिष्टचिंतन

00000000

विशेष लेख

धाडसी तितकेच विकासाभिमुख नेतृत्व...!

कृषी मंत्री धनंजय मुंडे

श्री. एकनाथराव शिंदे साहेब हे स्वतः एक शेतीनिष्ठ शेतकरी आहेत. राज्याचे मुख्यमंत्री असताना देखील त्यांना शेतात काम करताना, भात शेती करताना अनेकांनी पाहिले असेल. त्यामुळे शेती क्षेत्राला आधुनिकतेची जोड देणे आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उकल करणे, याबाबत ते कायम आग्रही असतात. धनंजय आपण हे केले पाहिजे, धनंजय अमुक बाबीकडे तुम्ही स्वतः लक्ष द्या, असे त्यांचे नेहमी मार्गदर्शन असते.

आदरणीय मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार ही त्रिमूर्ती राज्याच्या विकासाची यशस्वी घोडदौड करत आहे. मराठवाड्याच्या विकासाच्या दृष्टीने आम्ही त्यांना एकदा शब्द टाकला की मराठवाडा मुक्तीच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने मंत्रिमंडळाची एक बैठक मराठवाड्यात घ्यावी, त्याला त्यांनी तात्काळ मान्यता दिली, एवढेच नाही तर त्या बैठकीत अनेक विकासाच्या मुद्यांना व प्रकल्पांना चालना देण्यासाठी 54 हजार कोटींचे पॅकेज मंजूर केले. विकासाचे हे व्हिजन आदरणीय शिंदे साहेबांना आणि या महायुती सरकारला विशेष ठरवते!

आमच्या बीड जिल्ह्याला देखील त्यांनी या बैठकीत खूप काही दिले. अनेक रखडलेले प्रकल्प, काही नवीन शासकीय संस्था असे दीड हजार कोटींच्या पुढचे प्रकल्प या बैठकीत मंजूर होऊन निकाली निघाले.

मी आयुर्वेदिक गार्डन उभारण्याचा शब्द टाकला, एका दिवसात मंजूर. मी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांना एकत्र करून बीड जिल्ह्याचा 'शासन आपल्या दारी' कार्यक्रम परळीत घेण्याचे ठरवले. तिघांच्या एकत्र तारखा जुळायला थोडा वेळ गेला व जुळले. माझ्या परळीच्या एसटी बसस्थानकाचा 28 कोटींचा सुधारित आराखडा याच काळात मंजूर झाला होता. मी शब्द टाकला की शासकीय कार्यक्रमाच्या दिवशीच याचेही भूमिपूजन व्हावे आणि प्रशासकीय मान्यता ते निविदा प्रक्रिया वेगाने पूर्ण करून तेही भूमिपूजन संपन्न झाले.

परळीच्या 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमाचे, तिथल्या नियोजनाचे मुख्यमंत्री महोदयांनी कौतुक तर केलेच पण आमचा बीड जिल्हा मागासलेपणाच्या सावटातून बाहेर काढण्याच्या दृष्टीने जिल्ह्याला तब्बल दीड हजार कोटींचा निधी त्या दिवशी दिला!

मी सामाजिक न्याय खात्याचा मंत्री असताना स्व.गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या कार्यास गती दिली होती. तसेच मी नेहमी म्हणायचो की या विभागाची उत्तम कामगिरी करून या विभागाची प्रतिष्ठा इतकी वाढविन की स्वतः मुख्यमंत्री हे खाते स्वतःकडे ठेवतील! आणि माझा तो शब्द देखील मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी खरा केला, याचा आनंद वाटतो.

याच काळात मी स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांचे एक स्वप्न म्हणून ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजना सुरू करून 10 तालुक्यात 20 वसतिगृहे सुरू केली होती. तर आणखी 31 तालुक्यात 61 वसतिगृहे सुरू करण्याची घोषणा केली होती. माझी ती घोषणा 10 जानेवारी 2024 रोजी स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी पूर्ण करत उर्वरित 62 वसतिगृहे सुरू करण्याचा शासन निर्णय काढला! ही माझ्यासाठी केवळ आनंदाची बाब नव्हती तर ती स्व.मुंडे साहेबांच्या स्वप्नपूर्तीची कथा होती, त्यासाठी मी आदरणीय शिंदे साहेबांचा कायम ऋणी राहील.

मी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांचे मनापासून अभिनंदन करतो तसेच त्यांचे जन्मदिनाच्या निमित्ताने अभिष्टचिंतन करतो. आदरणीय शिंदे साहेबांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो, ही प्रभू वैद्यनाथास प्रार्थना करतो.

शब्दांकन दत्तात्रय कोकरे, विभागीय संपर्क अधिकारी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय

विशेष लेख

विकासाचा ध्यास घेतलेले नेतृत्व

श्री.गिरीश महाजन,मंत्री, ग्रामविकास आणि पंचायतराज व पर्यटन

राज्याच्या विकासाचा ध्यास घेतलेले, जनतेला आपलेसे वाटणारे आणि धडाडीचे निर्णय घेणारे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रूपाने महाराष्ट्राला बहुआयामी नेतृत्व लाभले असून त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज मला शुभेच्छा देताना खूप आनंद होत आहे.

कोणतेही काम पार पाडण्यासाठी एका खंबीर नेतृत्वाची गरज असते.असे नेतृत्व सर्वांना बरोबर घेवून जाणारे सर्वांना आपलेसे वाटणारे नेतृत्व असले की ते जनमानसात लोकप्रिय होते.असे नेतृत्व आणि कर्तृत्वाचा उत्तम संगम असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या नेतृत्वाखाली काम करताना अनेक गोष्टी शिकण्यास मिळत आहेत.

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि  धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारावर  मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी नेहमीच मार्गक्रमण केले.पदापेक्षा तळागाळातील जनतेसाठी काम करताना त्यांनी नेहमी संवेदनशीलता जपली आहे.अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून पुढे येऊन एक सामान्य कार्यकर्ता ते राज्याच्या मुख्यमंत्री पदापर्यंत त्यांच्या कारकिर्दीचा आलेख उंचावत गेला आहे आणि त्यांचा हा प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.

श्री.एकनाथ शिंदे साहेब यांची आपल्या मतदारसंघात असलेली मजबूत पकड  त्यांच्या लोकप्रियतेची पोचपावती आहे. ठाणे  महापालिकेत नगरसेवक ते विधानसभेचे सदस्य या राजकीय कारकीर्दीत त्यांनी मतदारसंघात  तसेच राज्यभरात अनेक जनहिताची कामे केली.  कोपरी - पाचपाखाडी मतदारसंघातून 2004 मध्ये विधानसभा सदस्य म्हणून निवडून आले. जनतेने सातत्याने दाखवलेल्या विश्वासानंतर आणि आपल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे आजपर्यंत त्यानी मागे वळून पाहिले नाही.

पक्षीय राजकारणापेक्षा वैयक्तिक मंत्री म्हणून त्यांनी केलेले काम महाराष्ट्राची जनता कधीच विसरू शकत नाही.२०१९ मध्ये कोल्हापूर,सातारा आणि सांगली महापुरामध्ये अस्मानी संकट आले असताना. त्या कालावधीत आरोग्यमंत्री म्हणून त्यांनी केलेले काम सर्वांच्या लक्षात राहील, असे आहे. महापुराच्या कालावधीत आरोग्य यंत्रणे सोबत प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन सर्व काम स्वतः पाहिले. 

नगर विकास आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून त्यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी घेतलेल्या निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी देखील केली आहे. राज्याचा विकास व्हायचा असेल तर सर्वांना परवडणारी दळणवळण व्यवस्था, दर्जेदार सुविधा देखील असाव्यात यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून त्यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी  महामार्गाचे लोकार्पण करण्यात आले.नागपूर ते शिर्डी (कोकेमठाण) या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यामुळे पूर्वी हे अंतर पार करण्यासाठी तेरा तास लागत होते आता पाच तासात हे अंतर पार करणे शक्य होणार आहे.

सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून कमी कालावधीत केलेले भूसंपादन, शेतकऱ्यांना त्वरित दिले ला भूसंपादनाचा मोबदला, सर्व शासकीय यंत्रणांना सोबत घेऊन या रस्त्याचे विक्रमी वेळेत पूर्ण केलेले काम या महाराष्ट्राच्या जनतेने पाहिलेले आहे. एकूणच या कामामुळे प्रकल्पाची  घोषणा करून  त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यावर भर देणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कार्यशैली  आहे.

रायगड जिल्ह्यातील  ईरशाळवाडी येथे १९ जुलै २०२३ रोजी रात्रीच्या सुमारास भूस्खलन होवून दरड कोसळली होती.  या दुर्घटनेत ८४ व्यक्ती बेपत्ता होत्या.या कालावधीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः जाऊन या घटनेवर ती पूर्णपणे सनियंत्रण करून मदत व बचाव कार्यात केलेले काम हे वाखनण्याजोगे होते.

बदलापूर आणि वांगणीदरम्यान अडकून पडलेल्या महालक्ष्मी एक्सप्रेसमधल्या सगळ्या 1050 प्रवाशांची केलेली सुखरूप सुटका,राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि स्थानिक आपत्ती व्यवस्थापन यांच्याकडून प्रवाशांच्या सुखरूप सुटकेसाठी त्यांनी केलेले काम मी स्वतः पहिले असून  या सर्व घटनांचा मी साक्षीदार आहे.

माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ३० जून २०२२ रोजी पदभार घेतल्यापासून राज्याच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. या निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करताना एक अत्यंत चांगला अनुभव मिळत आहे. कोरोना सारखे संकट, महापूर, अतिवृष्टी या कालावधीत जनतेला दिलासा देणारे निर्णय, परवडणाऱ्या घरांना चालना, लोकाभिमुख प्रशासन, पायाभूत प्रकल्पांना वेग, दुर्बल घटकांना दिलासा,शासन आपल्या दारी उपक्रम असे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. शिक्षण,आरोग्य,शेती-सिंचन, परिवहन,माहिती तंत्रज्ञान,ऊर्जा,पर्यटन या सर्व क्षेत्रात यापुढेही अनेक नवीन योजना राबवण्याचा मानस आहे.राज्याची शाश्वत विकासाकडे वाटचाल करण्यासाठी, प्रगती कडे नेण्यासाठी अनेक विकास आराखडे त्याचे नियोजन केले जात आहे.

महाराष्ट्र राज्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी आपण करत असलेल्या सर्व प्रयत्नांना यश मिळो,आपली सर्व स्वप्ने साकार होवो, तुम्हाला वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो ...

 

शब्दांकन : संध्या गरवारे, विभागीय संपर्क अधिकारी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय

विशेष लेख

 मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष लेख

सर्व सामान्यांच्या उत्कर्षाचा ध्यास घेतलेले नेतृत्व

- रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे 

            राज्यातील सर्व सामान्य जनतेच्या समृद्धीचा ध्यास घेऊन दिवसातील 16 - 16 तास मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे काम करत आहेत. राज्यातील आर्थिक दुर्बल घटकांना न्याय देता यावा यासाठी अनेक महत्वाचे निर्णय घेऊन त्यांच्या अंमलबजावणीसाठी स्वतः मुख्यमंत्री आग्रही असल्याचे दिसते. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून राज्यातील आर्थिक दुर्बल घटकांना सक्षम बनवून त्यांचे जीवन समृद्ध करण्यासाठी झटणारे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.

            गेल्या दीड वर्षापासून राज्याला एक सक्षम नेतृत्व मिळाले आहे. या सक्षम नेतृत्वामुळे राज्यात विकास कामांचा धडाका सुरू आहे. विकासकामांसोबत सर्वसामान्य जनतेच्या आयुष्यात समृद्धी अणणारे अनेक महत्वाचे निर्णय शासनस्तरावर घेण्यात येत आहेत. जनतेशी बांधिलकी असलेले मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे यांच्या या धडाक्यामुळेच जनतेच्या हिताचे निर्णय घेतले जात आहेत. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या दूरदृष्टी आणि कल्पक बुद्धिमतेमुळे रोजगार हमीच्या क्षेत्रात अनेक कल्याणकारी निर्णय घेतले गेले आहेत.

            राज्यातील शेतकऱ्यांना शाश्वत विकासाचे दालन खुले व्हावे, त्यांचे जीवनमान उंचवावे आणि हे करत असतानाच पर्यावरणाचेही संरक्षण व्हावे अशा तिहेरी उद्देशाने मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या संकल्पनेतून राज्यात मिशन बांबू लागवड राबवण्यात येत आहे. या मिशनमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून प्रती हेक्टरी सुमारे 7 लाख रुपयांचे अनुदान देण्यात येत आहे. बांबू ही भविष्याची गरज असल्याचे ओळखून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी हे मिशन सुरू केले आहे. बांबूच्या माध्ममातून शेतकऱ्यांना आर्थिक स्थिरता तर मिळणार आहेच. त्याशिवाय देशाची आर्थव्यवस्था मजबूत होण्यास मदत होणार आहे. पर्यावरणाचे संरक्षण हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे. पर्यावरण रक्षणामध्ये बांबू लागवडीला अनन्यसाधारण महत्व आहे. बांबू लागवडीमुळे वातावरणातील कार्बनचे प्रमाण कमी करणे आणि ऑक्सिजनचे प्रमाण वाढवण्यास मदत होते. शेतकऱ्यांना पडिक जमिनीवर, शेताच्या बांधावरही बांबू लावगड करता येणार आहे आणि त्यासाठी मनरेगा अंतर्गत अनुदान देण्यात येणार आहे. असा क्रांतिकारी निर्णय घेऊन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी राज्याची अर्थव्यवस्था बळकट करण्यासोबतच पर्यावरण रक्षणाचे उद्देश साध्य करण्याच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल उचलले आहे.

            यासोबतच ग्रामीण भागाच्या विकासासाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचा पुरेपूर वापर करण्याचे अनेक महत्वाचे आणि लाभदायी निर्णय मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या पाठिंब्याने रोजगार हमी आणि फलोत्पादन विभागाने घेतले आहेत. त्यामध्ये महत्वाचे म्हणजे ग्राम रोजगार सेवकांच्या मानधनामध्ये सुधारणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता ग्राम रोजगार सेवकांना कामासोबतच चांगल्या मानधनाची हमी मिळाली आहे. ग्राम रोजगार सेवक जितके जास्त काम करतील तितके जास्त मानधन त्यांना मिळेल अशी व्यवस्था या सुधारणा दरांमध्ये करण्यात आली आहे. पूर्वी 750 मनुष्य दिवस निर्मिती  करणाऱ्या ग्राम रोजगार सेवकांना दरमहा किमान 2 हजार रुपये म्हणजेच वार्षिक 24 हजार रुपये मानधन मिळत होते. त्यामध्ये सुधारणा करून हे मानधन किमान 2 हजार 500 म्हणजेच वार्षिक 30 हजार रुपये करण्यात आले. तसेच 10 हजार मनुष्य दिवसांपर्यंत काम करून त्यांना किमान 84 हजार व कमाल 1 लाख रुपयांपेक्षाही जास्त वार्षिक उत्पन्नाची हमी देण्याची व्यवस्था या सुधारणांमध्ये करण्यात आली आहे.

            राज्यातील प्रत्येक कुटुंब सुविधा संपन्न बनवण्याचे उद्दिष्ट समोर ठेऊन महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून सुविधा संपन्न कुटुंब मिशन राबवण्यात येत आहे. या मिशनमध्ये पाच वर्षांसाठी 10 लक्ष सिंचन विहिरी, 7 लक्ष शेततळे तयार करणे आणि 10 लक्ष हेक्टर क्षेत्रात फळबाग, बांधावर वृक्ष लागवड, रेशीम उद्योग उभारणी व बांबू लागवड करणे असे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे. या माध्यमातून शेतीसाठी शाश्वत सिंचनाची सोय निर्माण करणे आणि मजुरांच्या हाताला काम देणे असे दुहेरी उद्दीष्ट साध्य होत आहे. तसेच यामध्ये गोठे, शेळीपालन, कुक्कुटपालन शेड, पाणंद रस्ते, शाळांना संरक्षण भिंत बांधणे, गोडाऊन बांधकाम, नाला खोलीकरण, सरळीकरण, रुंदीकरण, तलावातील गाळ काढणे अशी ग्रामीण विकासाची कामे हाती घेण्यात येत आहेत.

            प्रत्येक कुटुंबाला आर्थिक वर्षात किमान कालावधीसाठी रोजगार हमी म्हणून मागणीनुसार ग्रामीण भागातील अकुशल हाताला काम देणे. गुणवत्तापूर्ण टिकाऊ उत्पादक मालमत्ता तयार करणे, गरिबांच्या उपजीविकेच्या साधनांचा आधार मजबूत करणे, समाजिक समावेश निश्चित करणे आणि पंचायत राज संस्थांचे बळकटीकरण करणे या उद्देशाने सुविधा संपन्न कुटुंब मिशन राबवण्यात येत आहे.

            तसेच ग्रामपंचायत क्षमता बांधणी, कामांमधील व मानधन वितरणातील विलंब टाळणे, कामे लवकर प्राप्त करून घेणे यासाठी ग्रामपंचायत स्तरावर ई-मस्टर राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात रेशीम उद्योग विकास योजना मनरेगा अंतर्गत राबवण्यात येत आहे. सिंचन सुविधा वाढवण्याच्या दृष्टीने व प्रत्येक कुटुंब लखपती करण्याच्या उद्देशाने सिंचन विहरींच्या कामांना गती देण्यात आली आहे.

            आर्थिक दुर्बल घटकांना न्याय देण्यासाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यातील ग्रामीण भागाचा कायपालट होत असून शेतकरी व ग्राम रोजगार सेवकांच्या जीवनात आमुलाग्र बदल झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. जनतेच्या हितासाठी राबणारे असे हे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे यांना त्यांच्या वाढ दिवसानिमित्त पुन्हा एकदा लाख लाख शुभेच्छा...!

                                                                                      

शब्दांकन:

हेमंतकुमार चव्हाण,

विभागीय संपर्क अधिकारी, माहिती व त्यांना संपर्क

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...