Friday, February 9, 2024

विशेष लेख

 

शासन आपल्या दारी

जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असलेल्या आपल्या भारत देशाने   लोककल्याणकारी शासन व्यवस्था स्विकारली आहे. लोकशाही मूल्यांचा आदर करुन आणि नागरिकांना केंद्रबिंदू मानून शासनाचे काम सुरु आहे. याच भूमिकेतून जनतेचे शासन थेट जनतेपर्यंत नेण्यात ‘शासन आपल्या दारी­’ हा उपक्रम यशस्वी झाला आहे.

शासन अनेक विकासाभिमुख आणि नागरिकांसाठी वैयक्तिक लाभाच्या योजना राबवित आहे. या सर्व योजनांचा लाभ नागरिकांना एकाच छताखाली मिळावा, त्यांच्या शासकीय कार्यालयातील कमी करणे व त्यांना सहज योजनेचा लाभ मिळावा तसेच योजनांचा लाभ सुलभपणे जनतेपर्यत पोहोचविण्यासाठी शासन आपल्या दारी हा लोकाभिमूख उपक्रम महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.

सातारा जिल्ह्यातील पाटण येथे १४ मे २०२३ रोजी शुभारंभ झालेल्या या अभियानामुळे आजपर्यंत राज्यातील सुमारे २ कोटी २० लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांना विविध लाभ मिळाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेलेशासन आपल्या दारीअभियान आता गतिमान शासनाचा महत्त्वाचा भाग बनले आहे. लाभार्थ्यांनी शासनाकडे येण्याच्याऐवजी आता शासनच जनतेच्या दारात पोहोचले आहे, पाटणनंतर सुरु झालेल्या या लोकहक्क प्रदानाच्या सोहळ्याने पाहता पाहता महाराष्ट्र व्यापला आहे. जिथे जिथे हे कार्यक्रम झाले तिथे जनतेचा लाभलेला उत्स्फुर्त प्रतिसाद आणि गरजू, सर्वसामान्य लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान अभियानाच्या यशस्वीतेची प्रचिती देते

लोककल्याणाचे ध्येय ठेवून शेवटच्या गरजू लाभार्थ्यांपर्यंत शासकीय योजना सहज, सुलभपणे (Ease of Access to Government Schemes) पोहोचविण्याचा निर्धार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. या निर्धाराला निमित्त लाभले स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे….त्यातून प्रत्येक जिल्ह्यात 75 हजार लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ देण्याचा  महासंकल्पसरकारने केला आणि राज्यातशासन आपल्या दारीअभियानाची मुहुर्तमेढ रोवली गेली. सुरुवातीलाशासकीय योजनांची जत्रा : योजना कल्याणकारी, सर्वसामान्यांच्या दारीअशी संकल्पना असलेले हे अभियानशासन आपल्या दारीमध्ये रुपांतरित झाले आणि विकासाच्या योजनांच्या लाभाचा, वेगवान अंमलबजावणीचा एक नवा अध्याय महाराष्ट्रात सुरु झाला.

शासनाच्या सर्व विभागाचे अधिकारी-कर्मचारी एकाच छताखाली, एकाच ठिकाणी पूर्णवेळ उपस्थित राहून लाभार्थ्यांना फक्त शासकीय योजनांचा लाभ मिळवून देत आहेत, आवश्यक कागदपत्रे प्रमाणित करुन देण्यासह गरजूला त्याच्या गरजांशी निगडीत योजनांची माहिती देऊन त्या योजनांचा लाभ मिळण्यासाठीची प्रक्रिया केली जात आहे.

 शासन आपल्या दारीअभियानातून विविध शासकीय विभागातील योजना, रोजगार मेळावे, आरोग्य शिबिरे, रक्तदान व अवयवदान शिबिरे, चष्मे, दिव्यांगांना साहित्य वाटप, शिक्षण हक्क कायद्यानुसार २५ टक्के विद्यार्थ्यांना शाळा प्रवेश, कृषि प्रदर्शन, महिलांना सखी कीटचे वाटप, स्वयंरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन, शेतकरी ते ग्राहक थेट बाजार आणि बचतगटांचे स्टॉल्स, विविध सरकारी विभाग आणि महामंडळांच्या योजनांचे माहिती देणारे स्टॉल्स, सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) अंतर्गत गरजूंना वैयक्तिक लाभ, नव मतदार नोंदणी आदी कार्यक्रमांचा समावेश आहे.

शासन आपल्या दारीअभियानाच्या प्रभावी अंमलबजावणी तसेच समन्वयासाठी राज्यस्तरावर मुख्यमंत्री सचिवालयात खासगी सचिव डॉ. अमोल शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जनकल्याण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. त्याशिवाय जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा जनकल्याण कक्ष आणि प्रत्येक विभागप्रमुखांच्या नेतृत्वाखाली विशेष जनकल्याण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

 शासन आपल्या दारीअभियानाचा फायदा अधिकाधिक लोकांना व्हावा म्हणून आता माहिती तंत्रज्ञानाची मदत घेण्यात येत आहे. ‘महालाभार्थीया पोर्टलवर नोंदणी करून आपण योजनांचा लाभ घेऊ शकता.

जिल्ह्या-जिल्ह्यांमध्ये शासन जनतेच्या दारी पोहोचलं आहे. सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना आवश्यक ते सर्व सहाय्य, मार्गदर्शन शासनस्तरावरुन मिळत आहे. शेतकरी, महिला, विद्यार्थी, कष्टकरी, कामगार, दिव्यांग यांच्यासह विविध घटकांना मिळणाऱ्या लाभामुळे त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाची लकेर उमटली आहे, यातून शासन आणि जनता यांच्यातील अंतर दूर झालं आहे..

 

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...