Friday, February 23, 2024

वृत्त क्र. 728

 

नमो महारोजगार मेळाव्यातून 2 लाखापेक्षा अधिक उमेदवारांना स्वयंरोजगार देण्याचे उद्दिष्ट

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

• लातूर येथे विभागीय नमो महारोजगार मेळावा व करिअर मार्गदर्शन शिबिराचे उद्घाटन

 

            लातूरदि. 23 : नमो महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून राज्यातील 2 लाखापेक्षा अधिक उमेदवारांना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावाहे आपले उद्दिष्ट आहे. लातूर येथे आयोजित विभागीय नमो महारोजगार मेळाव्याप्रमाणेच राज्यातील इतर विभागातही अशा मेळाव्यांचे आयोजन होणार असल्याने सर्व संबंधित प्रशासकीय विभागांनी एक टीम म्हणून हे मेळावे यशस्वी करण्याचे प्रयत्न करावेतअशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या.

            लातूर येथे आयोजित छत्रपती संभाजीनगर विभागीय नमो महारोजगार मेळाव्याचे आज मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा या कार्यक्रमाला दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते. तसेच क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडेखासदार सुधाकर शृंगारेआमदार रमेश कराडआमदार संभाजी पाटील निलंगेकरआमदार अभिमन्यू पवारजिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगेजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागरप्रशिक्षणार्थी सहायक जिल्हाधिकारी नमन गोयल आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संदेश दाखविण्यात आला.

            तरूणांसाठी रोजगार हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असून त्यात त्याच्या कुटुंबाचे समाधान आणि समृद्धता दडलेली आहेअसे सांगून मुख्यमंत्री म्हणाले कीशासकीय योजनांचे लाभ घेण्यासाठी पूर्वी लोकांना हेलपाटे मारावे लागत आणि केवळ त्यामुळे सर्वसामान्य नागरिक योजनांचे लाभ घेत नव्हते. अशा सर्व योजनांचे लाभ शासन आपल्या दारी उपक्रमांतून एका छताखाली देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. आतापर्यंत जवळपास 2 कोटी 60 लाखांहून अधिक लाभार्थ्यांना या उपक्रमातून लाभ देण्यात आले. याच भावनेतून एकाच छताखाली रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी नमो महारोजगार मेळावा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

            नागपूरचा नमो रोजगार महामेळावा यशस्वी झाला. जवळपास 350 हून अधिक कंपन्यांनी यात सहभाग नोंदवला. त्याचे यश पाहूनच आपण दरवर्षी विभागस्तरावर महारोजगार मेळावा घेण्याचा निर्णय घेतला. यासाठी मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष मुख्य समन्वयक म्हणून काम करत आहे. बेरोजगार युवक- युवतींना रोजगार मिळेलयासाठी सरकार प्रयत्न करत आहे. या मेळाव्यात सहभागी तरूण-तरूणींची कुशलअकशुलनिमकुशल अशी वर्गवारी करून कंपन्यांच्या मागणीप्रमाणे त्यांना आवश्यक असलेले मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे काम केले जाईलअसे मुख्यमंत्री म्हणाले.

मराठवाडा कायमच विकास प्रक्रियेत अग्रस्थानी- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

            कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दृकश्राव्य संदेश दाखवण्यात आला. यात उपमुख्यमंत्री म्हणाले कीमराठवाडा हा कायमच शासनाच्या विकास प्रक्रियेत अग्रस्थानी राहिला असून हिंगोली येथे भारतरत्न नानाजी देशमुख कौशल्य विकास केंद्र सुरु करण्यात आले आहे. एकीकडे मराठवाड्यात सिंचन सुविधापायाभूत  सुविधा वाढवल्या जात आहेत तर दुसरीकडे या भागात मोठे उद्योग यावेतत्यामाध्यमातून युवा पिढीला रोजगार मिळावा हाही प्रयत्न होत आहे. त्यासाठी आवश्यक कौशल्ये दिली जात आहेत.  या सर्व एकत्रित प्रयत्नातून उद्याच्या मराठवाड्याचे चित्र वेगळे असणार आहे.

            रोजगार संधी आणि करिअर मार्गदर्शन हा दुहेरी उद्देश डोळ्यासमोर ठेऊन नमो महारोजगार मेळावे आयोजित केले जात असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस पुढे म्हणाले कीनागपूर येथे आयोजित महारोजगार मेळाव्यात 10 हजार तरूणांना रोजगार मिळालाया रोजगार मेळाव्याच्या यशस्वीतेतूनच मंत्रिमंडळाच्या बैठकीत विभाग आणि जिल्हास्तरावर महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्याचा व प्रत्येक मेळाव्यासाठी निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लातूर येथे आयोजित विभागीय नमो महारोजगार मेळाव्यात 16 हजाराहून अधिक युवक-युवतींनी नोंदणी केली असून 200 हून अधिक  कंपन्या सहभागी झाल्या असल्याची माहिती मिळाल्याचे ते म्हणाले.

कौशल्य आणि रोजगार संधीसाठी नेटाने प्रयत्न- मंगल प्रभात लोढा

            कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले की,  रोजगार मेळावे आयोजित करण्याची मूळ संकल्पना ही तत्कालीन कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांची होती. त्यांनी राज्यात रोजगार मेळावेस्टार्टअपची कल्पना रुजवली आणि आपण ती पुढे नेत आहोत. नागपूर येथील रोजगार मेळाव्यानंतर आता लातूर येथे विभागीय नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन होत आहे. राज्यभरातही ते आयोजित होतील. कौशल्य विकास आणि रोजगारासंबंधीच्या सर्व योजनांची माहिती येथे उभारण्यात आलेल्या स्टॉलमध्ये मिळेल. युवक-युवतींच्या कौशल्य विकास आणि रोजगाराचे कामत्यांना रोजगार संधीची उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न नेटाने केले जातीलअशी ग्वाही श्री.  लोढा यांनी दिली.

लातूरच्या औद्योगिक विकासासाठी नमो महारोजगार मेळावा उपयुक्त - संजय बनसोडे

            लातूरची ओळख पूर्वी व्यापारी शहर अशी होतीत्यानंतर सहकार चळवळीने जिल्हा ओळखला जावू लागला. आता शिक्षणातील लातूर पॅटर्न सर्वपरिचित आहे. राज्य शासनामार्फत लातूर येथे होत असलेल्या नमो महारोजगार मेळाव्यामुळे लातूर जिल्ह्यातील युवक-युवतींना रोजगारस्वयंरोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे लातूरच्या औद्योगिक विकासासाठी हा मेळावा उपयुक्त ठरेलअसा विश्वास क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केला. तसेच तरुणांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन सदैव प्रयत्नशील असल्याचे सांगितले.

            मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रममुद्रा योजना आणि उमेद अभियान अंतर्गत लाभार्थ्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते धनादेश वितरीत करण्यात आले. प्रास्ताविक कौशल्य विकासच्या सहायक आयुक्त रेणुका कंबालवार यांनी केले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.

करिअर दिंडीने कार्यक्रमाला प्रारंभ

            विभागीय नमो महारोजगार मेळावा आणि करिअर मार्गदर्शन शिबिराची सुरुवात करिअर दिंडीने झाली. या दिंडीमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी रोजगार आणि स्वयंरोजगाराविषयी घोषणा देत आणि फलकाद्वारे करिअरविषयी संदेश दिला. यामध्ये करिअर मार्गदर्शन विषयक ग्रंथांची पालखी घेवून विद्यार्थी सहभागी झाले होते. यानंतर कौशल्य ज्योत प्रज्वलित करून नमो महारोजगार मेळावा आणि करिअर मार्गदर्शन शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. प्रारंभी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशीआमदार राजेंद्र पाटणी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

००००






 नमो महारोजगार मेळाव्यात आज उमेदवारांच्या मुलाखती आणि विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचे करिअर विषयक मार्गदर्शन

·         24 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 पासून मुलाखतींना होणार सुरुवात

·         सुमारे 16 हजार युवक-युवतींनी केली ऑनलाईन नोंदणी

लातूर, दि. 23 :  राज्य शासनामार्फत लातूर येथे आयोजित करण्यात आलेल्या विभागस्तरीय नमो महारोजगार मेळावा आणि करिअर मार्गदर्शन शिबिराचे 23 फेब्रुवारी 2024 रोजी उद्घाटन झाले. या मेळाव्यात आज, 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 पासून रोजगार इच्छुक उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती होणार आहेत. लातूर शहरातील बार्शी रोडवरील शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन समोरील मैदानात आयोजित या मेळाव्यासाठी सुमारे 16 हजार युवक-युवतींनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. या मेळाव्यात 24 फेब्रुवारी रोजी विविध क्षेत्रातील मान्यवरांचे मार्गदर्शनही आयोजित करण्यात आले आहे.

नमो महारोजगार मेळाव्यामध्ये सहभागी झालेले विविध उद्योग, आस्थापना यांच्यामार्फत रोजगार इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्याची प्रक्रिया सकाळी 9 पासून सुरु होणार आहे.  मुख्य सभामंडपात सकाळी 11 पासून विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन आणि लाभार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. या कार्यक्रमाला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड यांची उपस्थिती राहणार आहे.

यावेळी मराठा चेंबर ऑफ कॉमर्सइंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चरचे महासंचालक प्रशांत गिरबने, सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष विलास शिंदे, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) क्षेत्रातील तज्ज्ञ रोहित पांढारकर यांचे, तसेच  स्टार्टअप मधील संधी व आव्हाने याविषयी राजीव रंजन आणि कुणाल क्षीरसागर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच फिजिओथेरेपी व वैद्यकीय करिअरमधील संधी याबाबतही मार्गदर्शन आयोजित करण्यात आले आहे. स्पर्धा परीक्षेला सामोरे जाताना या विषयावर प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी आणि प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी हे युवक-युवतींना मार्गदर्शन करणार आहेत.

*****



वृत्त क्रमांक 164

 

टीबी फोरमची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालय येथे संपन्न

 

जिल्हाधिकाऱ्यांकडून मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करवाल यांचे कौतुक...

 

नांदेड (जिमाका) दि. 23 :- क्षयरोग दूर करण्यासाठी जास्तीत जास्त संशयीत लोकांची तपासणी करणे व निदान झालेले क्षयरुग्ण यांना औषधोचाराखाली आणणे हा राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहेत्यानुसार आरोग्य विभागाने संशयित क्षयरुग्ण शोधून त्यांना नियमित औषधोपचारखाली आणावेअशा सूचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिल्या. जिल्हा टी बी फोरम समितीचा आढावा घेतांना ते बोलत होते.

 

जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करवालजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदेजिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नीलकंठ भोसीकरजिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सतिश कोपुरवाडसहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सुर्यवंशीअतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉसंजय परकेनिवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्या झिनेशहर क्षयरोग अधिकारी डॉ. मो. बदिउद्दीनवैद्यकीय अधिकारी डॉगणपत मिर्दुडेजिल्हा कार्यक्रम समन्वयक डॉ. मोखाजा मोईनुद्दीन आदी उपस्थित होते.

 

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत म्हणालेजास्तीत जास्त संशयित क्षयरुग्णांना शोधून त्यांचे निदान करण्यासाठी तपासणी करावी व क्षयरुग्ण आढळल्यास त्याला औषधोपचाराखाली आणून बरे करावे. 2023 वर्षासाठी नांदेड जिल्ह्यातील 95 ग्रामपंचायतीची पडताळणी करण्यात आली व त्यांच्यामध्ये 86 ग्रामपंचायत टी बी मुक्त ग्रामपंचायत प्रमाणपत्रासाठी पात्र ठरले आहे व हा उपक्रम प्रत्येक वर्षी राबविण्यात येणार आहेहा उपक्रम राबवण्यासाठी नांदेड जिल्ह्यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायत विकास आराखडामध्ये भरीव निधीची तरतूद करण्यात आली.

 

त्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करवाल यांच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल पंचायत राज मंत्रालय दिल्ली यांच्याकडून घेण्यात आली आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करवाल आणि जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड यांचे अभिनंदन केले.

00000




वृत्त क्रमांक 163

शासकीय आणि खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना

बीएच मालिकेत नोंदणी क्रमांकासाठी अर्ज करण्याची सुविधा 

नांदेड (जिमाका) दि. 23 :- केंद्र शासनाने 26 ऑगस्ट 2021 अधिसूचना अन्वये खाजगी क्षेत्रात काम तसेच शासकीय कार्यालयात, विभागामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना बीएच मालिकेमध्ये नोंदणी क्रमांक मिळण्याविषयी अर्ज करण्यासाठी तसेच त्यामध्ये अशा वाहनांवर आकारण्यात येणाऱ्या कराविषयी तरतुद केली आहे. ही अधिसूचना 15.09.2021 पासून अंमलात आली आहे. 

बीएच मालिकेतील नोंदणी चिन्हासाठी खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या अर्जदारास नमूना 60 मध्ये काम करत असल्याबाबतचे प्रमाणपत्र (Working Certificates) व शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या अर्जदारास कार्यालयीन ओळखपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील. अर्जदारास नियम 48 मध्ये नवीन परंतुकानुसार बीएच मालिकेतील नोंदणी क्रमांकासाठी अर्ज करणे अर्जदारास ऐच्छिक असणार आहे.

खाजगी संस्थेतील तथा शासकीय सेवेतील वाहनधारक यांचे संस्थेची, शासकीय कार्यालयाची भारतातील विविध राज्यात कार्यालय आहेत. तसेच अशा वाहन धारकांकडून सादर करण्यात आलेल्या वास्तव्याचा दाखला व वेतन देयके याबाबत व सदर वाहन धारक सद्यस्थितीत ज्या विभागात, कंपनीत कार्यरत आहे, त्याच विभागात, कंपनीमध्ये तो यापूर्वी इतर राज्यात कार्यरत होता का ? ही बाब तपासल्यानंतर त्यांचे वाहन बीएच नोंदणीसाठी ग्राहय धरण्यात येतील. बीएच सिरिजचा लाभ प्रति व्यक्ती फक्त एक वाहनासाठीच देण्यात येईल. 25 लाख किंवा त्यापेक्षा जास्त किंमतीची चारचाकी वाहने तसेच 2 लाख किंवा त्यापेक्षा जास्त किंमतीची दुचाकी वाहने बीएच सिरीज नोंदणीसाठी वाहन धारकाचे आयटी रिर्टन किंवा बँक खात्याचे विवरणपत्र सादर करण्यात यावे. भारतीय सुरक्षा दलातील वाहनधारकांच्या वाहनांचे बीएच सीरिजमध्ये नोंदणी करतांना त्यांनी फक्त सुरक्षा दलाचे ओळखपत्र सादर करावे. खाजगी किंवा शासकीय क्षेत्रात काम करणाऱ्या अर्जदारांनी यांची नोंद घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000

 

 

 वृत्त क्रमांक 162 

अनाथ बालकांना विविध प्रमाणपत्र देण्यासाठी

23 फेब्रुवारी ते 5 मार्च कालावधीत पंधरवडाचे आयोजन 

नांदेड (जिमाका) दि. 23 :- नांदेड जिल्ह्यातील पात्रताधारक अनाथ मुलांना आधार कार्ड, रेशनकार्ड, जातीचा दाखला, अधिवास व राष्ट्रीयत्वाचा दाखला व मतदान ओळखपत्र आदी उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय व महसूल विभागाच्या समन्वयातून अनाथ बालकांसाठी 23 फेब्रुवारी ते 5 मार्च 2024  या कालावधीमध्ये पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे. 

शासनाच्या निर्देशानुसार 23 फेब्रुवारी ते 5 मार्च 2024  या कालावधीमध्ये अनाथ मुलांना आधार कार्ड, रेशनकार्ड, जातीचा दाखला, अधिवास व राष्ट्रीयत्वाचा दाखला व मतदान ओळखपत्र इत्यादी उपलब्ध करुन देण्याबाबत संपूर्ण राज्यात पंधरवडा राबविण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. नांदेड जिल्ह्यात देखील हा पंधरवडा यशस्वीपणे राबविण्यात येणार आहे. यासाठी महसूल विभागाच्या समन्वयातून हे प्रमाणपत्र अनाथ मुलांना शासन आपल्या दारी या संकल्पनेच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. 

या पंधरवड्यात जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या जिल्हास्तरावर समर्पित कक्षासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आर.आर. कांगणे यांचा मो. क्र. 9421382042 तसेच जिल्हा बाल संरक्षण अधिकारी श्रीमती विद्या आळणे  यांचा मो.क्र. 9730336418, 9830049738 यांच्याशी संपर्क साधावा. अनाथ बालकांना व त्यांच्या नातेवाईकांनी प्रमाणपत्राबाबत आवश्यक कार्यवाही करण्याच्या अनुषंगाने या समर्पित कक्षास 23 फेब्रुवारी ते 5 मार्च 2024 या कालावधीत भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा महिला बाल विकास अधिकारी आर.आर. कांगणे यांनी केले आहे.

0000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...