Friday, February 23, 2024

 वृत्त क्रमांक 162 

अनाथ बालकांना विविध प्रमाणपत्र देण्यासाठी

23 फेब्रुवारी ते 5 मार्च कालावधीत पंधरवडाचे आयोजन 

नांदेड (जिमाका) दि. 23 :- नांदेड जिल्ह्यातील पात्रताधारक अनाथ मुलांना आधार कार्ड, रेशनकार्ड, जातीचा दाखला, अधिवास व राष्ट्रीयत्वाचा दाखला व मतदान ओळखपत्र आदी उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय व महसूल विभागाच्या समन्वयातून अनाथ बालकांसाठी 23 फेब्रुवारी ते 5 मार्च 2024  या कालावधीमध्ये पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे. 

शासनाच्या निर्देशानुसार 23 फेब्रुवारी ते 5 मार्च 2024  या कालावधीमध्ये अनाथ मुलांना आधार कार्ड, रेशनकार्ड, जातीचा दाखला, अधिवास व राष्ट्रीयत्वाचा दाखला व मतदान ओळखपत्र इत्यादी उपलब्ध करुन देण्याबाबत संपूर्ण राज्यात पंधरवडा राबविण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. नांदेड जिल्ह्यात देखील हा पंधरवडा यशस्वीपणे राबविण्यात येणार आहे. यासाठी महसूल विभागाच्या समन्वयातून हे प्रमाणपत्र अनाथ मुलांना शासन आपल्या दारी या संकल्पनेच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. 

या पंधरवड्यात जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या जिल्हास्तरावर समर्पित कक्षासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आर.आर. कांगणे यांचा मो. क्र. 9421382042 तसेच जिल्हा बाल संरक्षण अधिकारी श्रीमती विद्या आळणे  यांचा मो.क्र. 9730336418, 9830049738 यांच्याशी संपर्क साधावा. अनाथ बालकांना व त्यांच्या नातेवाईकांनी प्रमाणपत्राबाबत आवश्यक कार्यवाही करण्याच्या अनुषंगाने या समर्पित कक्षास 23 फेब्रुवारी ते 5 मार्च 2024 या कालावधीत भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा महिला बाल विकास अधिकारी आर.आर. कांगणे यांनी केले आहे.

0000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1145   सत्यापनकर्ता (व्हेरीफायर) लॉगिन मधून पीक पाहणी दुरुस्ती ची  कार्यपद्धत   नांदेड दि.  27   नोव्हेंबर :   संपूर्ण राज्या...