Friday, February 23, 2024

वृत्त क्रमांक 163

शासकीय आणि खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना

बीएच मालिकेत नोंदणी क्रमांकासाठी अर्ज करण्याची सुविधा 

नांदेड (जिमाका) दि. 23 :- केंद्र शासनाने 26 ऑगस्ट 2021 अधिसूचना अन्वये खाजगी क्षेत्रात काम तसेच शासकीय कार्यालयात, विभागामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना बीएच मालिकेमध्ये नोंदणी क्रमांक मिळण्याविषयी अर्ज करण्यासाठी तसेच त्यामध्ये अशा वाहनांवर आकारण्यात येणाऱ्या कराविषयी तरतुद केली आहे. ही अधिसूचना 15.09.2021 पासून अंमलात आली आहे. 

बीएच मालिकेतील नोंदणी चिन्हासाठी खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या अर्जदारास नमूना 60 मध्ये काम करत असल्याबाबतचे प्रमाणपत्र (Working Certificates) व शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या अर्जदारास कार्यालयीन ओळखपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील. अर्जदारास नियम 48 मध्ये नवीन परंतुकानुसार बीएच मालिकेतील नोंदणी क्रमांकासाठी अर्ज करणे अर्जदारास ऐच्छिक असणार आहे.

खाजगी संस्थेतील तथा शासकीय सेवेतील वाहनधारक यांचे संस्थेची, शासकीय कार्यालयाची भारतातील विविध राज्यात कार्यालय आहेत. तसेच अशा वाहन धारकांकडून सादर करण्यात आलेल्या वास्तव्याचा दाखला व वेतन देयके याबाबत व सदर वाहन धारक सद्यस्थितीत ज्या विभागात, कंपनीत कार्यरत आहे, त्याच विभागात, कंपनीमध्ये तो यापूर्वी इतर राज्यात कार्यरत होता का ? ही बाब तपासल्यानंतर त्यांचे वाहन बीएच नोंदणीसाठी ग्राहय धरण्यात येतील. बीएच सिरिजचा लाभ प्रति व्यक्ती फक्त एक वाहनासाठीच देण्यात येईल. 25 लाख किंवा त्यापेक्षा जास्त किंमतीची चारचाकी वाहने तसेच 2 लाख किंवा त्यापेक्षा जास्त किंमतीची दुचाकी वाहने बीएच सिरीज नोंदणीसाठी वाहन धारकाचे आयटी रिर्टन किंवा बँक खात्याचे विवरणपत्र सादर करण्यात यावे. भारतीय सुरक्षा दलातील वाहनधारकांच्या वाहनांचे बीएच सीरिजमध्ये नोंदणी करतांना त्यांनी फक्त सुरक्षा दलाचे ओळखपत्र सादर करावे. खाजगी किंवा शासकीय क्षेत्रात काम करणाऱ्या अर्जदारांनी यांची नोंद घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000

 

 

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...