Friday, February 23, 2024

वृत्त क्रमांक 164

 

टीबी फोरमची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालय येथे संपन्न

 

जिल्हाधिकाऱ्यांकडून मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करवाल यांचे कौतुक...

 

नांदेड (जिमाका) दि. 23 :- क्षयरोग दूर करण्यासाठी जास्तीत जास्त संशयीत लोकांची तपासणी करणे व निदान झालेले क्षयरुग्ण यांना औषधोचाराखाली आणणे हा राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहेत्यानुसार आरोग्य विभागाने संशयित क्षयरुग्ण शोधून त्यांना नियमित औषधोपचारखाली आणावेअशा सूचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिल्या. जिल्हा टी बी फोरम समितीचा आढावा घेतांना ते बोलत होते.

 

जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करवालजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदेजिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नीलकंठ भोसीकरजिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सतिश कोपुरवाडसहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सुर्यवंशीअतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉसंजय परकेनिवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्या झिनेशहर क्षयरोग अधिकारी डॉ. मो. बदिउद्दीनवैद्यकीय अधिकारी डॉगणपत मिर्दुडेजिल्हा कार्यक्रम समन्वयक डॉ. मोखाजा मोईनुद्दीन आदी उपस्थित होते.

 

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत म्हणालेजास्तीत जास्त संशयित क्षयरुग्णांना शोधून त्यांचे निदान करण्यासाठी तपासणी करावी व क्षयरुग्ण आढळल्यास त्याला औषधोपचाराखाली आणून बरे करावे. 2023 वर्षासाठी नांदेड जिल्ह्यातील 95 ग्रामपंचायतीची पडताळणी करण्यात आली व त्यांच्यामध्ये 86 ग्रामपंचायत टी बी मुक्त ग्रामपंचायत प्रमाणपत्रासाठी पात्र ठरले आहे व हा उपक्रम प्रत्येक वर्षी राबविण्यात येणार आहेहा उपक्रम राबवण्यासाठी नांदेड जिल्ह्यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायत विकास आराखडामध्ये भरीव निधीची तरतूद करण्यात आली.

 

त्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करवाल यांच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल पंचायत राज मंत्रालय दिल्ली यांच्याकडून घेण्यात आली आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करवाल आणि जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड यांचे अभिनंदन केले.

00000




No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...