कोविडसह इतर संकटे कायमचे दूर होऊ दे
Monday, September 26, 2022
उद्योजकांसाठी कार्यशाळा व प्रदर्शनाचे आयोजन
नांदेड (जिमाका) दि. 26 :- जिल्ह्यातील उद्योजकांसाठी निर्यात गुंतवणुक वृध्दी कार्यक्रम निर्यात प्रचलन तसेच एक जिल्हा एक उत्पादन या विषयावर दोन दिवशीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे. कार्यशाळा गुरुवार 29 सप्टेंबर व प्रदर्शन गुरुवार 29 व शुक्रवार 30 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 10 ते 5 या कालावधीत जिल्हा उद्योग केंद्र (उद्योग भवन), औद्योगिक वसाहत, शिवाजीनगर, नांदेड येथे होईल. जिल्ह्यातील सर्व उद्योजकांनी या कार्यशाळा व प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांनी केले आहे.
निर्यातदार उद्योग घटकांना लागणाऱ्या आवश्यक बाबी जसे विविध परवानग्या नोंदणी व विविध योजना या बाबींची माहिती देण्यात येणार आहे. या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यासाठी डीजीएफटी (DGFT) व एपीइडीए (APEDA) या संस्थेचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. तसेच निर्यात संबंधी येणाऱ्या अडचणी, तसेच उद्योग विभागाचे सहकार्याने उद्योग सुरु केलेल्या उद्योजकांचे उत्पादनांचे प्रदर्शन या ठिकाणी असणार आहे, असेही जिल्हा उद्योग केंद्राच्यावतीने कळविले आहे.
0000
राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान
योजनांसाठी अर्ज करण्यास 28 ऑक्टोंबरपर्यत मुदत
नांदेड (जिमाका) दि. 26 :- राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या योजनेसाठी इच्छूकांनी संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा तसेच अधिक माहितीसाठी प्रतिष्ठानचे www.rrrlf.gov.in
भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभांतर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकत्ता यांच्या समान व असमान निधी योजनेतर्गंत राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्वांगीण विकासासाठी अर्थसहाय्याच्या विविध योजना ग्रंथालय संचालनालय, मुंबई यांच्यामार्फत राबविण्यात येतात. समान व असमान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यात प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. त्यानुसार 2022-23 साठी राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. त्या संदर्भांतील नियम, अटी व अर्जाचा नमुना राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या www.rrrlf.gov.
सन 2022-23 साठीच्या समान निधी योजना (Matching scemes) पुढील प्रमाणे आहे. इमारत बांधकाम व विस्तार अर्थसहाय्य योजना, टिप :- उपरोक्त योजने व्यतिरिक्त समान निधी योजनेंतर्गत इतर योजनांचा लाभ केंद्रीय पध्दतीने देण्यात येत असल्यामूळे इतर योजनेसाठीचे प्रस्ताव सादर करु नयेत. सन 2022-23 साठीच्या असमान निधी योजना (Non Matching scemes) पुढीलप्रमाणे आहेत. ग्रंथालय सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना ग्रंथ, साधन सामग्री, फर्निचर, इमारत बांधकाम व इमारत विस्तार यासाठी असमान निधीतून अर्थसहाय्य. "राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान ज्ञान कोपरा" विकसीत करण्यासाठी अर्थसहाय्य. महोत्सवी वर्ष जसे 50/60/75/100/125/150 वर्ष साजरे करण्यासाठी अर्थसहाय्य. राष्ट्रीय स्तरावरील चर्चासत्र, कार्यशाळा, प्रशिक्
0000
नांदेड जिल्ह्यात 104 गायवर्ग पशुधन लम्पी बाधित
2 लाख 35 हजार 853 पशुधनाचे प्रागतिक लसीकरण
नांदेड (जिमाका) दि. 26 :- नांदेड जिल्ह्यात लम्पी बाधित पशुधनाची संख्या (गाय वर्ग) 104 एवढी झाली असून जिल्हा प्रशासनातर्फे लसीकरणावर अधिक भर दिला आहे. सोमवार दिनांक 26 रोजी संपूर्ण जिल्हाभर लसीकरणावर नियोजनबद्ध भर देऊन 34 हजार 238 एवढ्या पशुधनाचे लसीकरण करण्यात आले. आजवर जिल्ह्यात एकुण 2 लाख 35 हजार 853 पशुधनाचे प्रागतिक लसीकरण पूर्ण झाले आहे.
लम्पी हा आजार गोठ्यातील अस्वच्छता, पशुधनाच्या अंगावरील गोचिड व इतर किटकांमुळे होण्याचा संभव अधिक असतो. हे लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनातर्फे ग्रामपातळीवर जाऊन मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे.
आजच्या घडीला नांदेड जिल्ह्यातील 21 गावे लम्पी बाधित आहेत. या 21 गावातील एकुण गाय वर्ग पशुधन हे 10 हजार 266 एवढे आहे. यातील 104 बाधित पशुधनाला वेगळे काढून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. बाधित गावाच्या 5 किमी परिघातील गावांची संख्या 141 एवढी आहे. एकुण गावे 162 झाली आहेत. या बाधित 21 गावांच्या 5 किमी परिघातील 162 गावातील (बाधित 21 गावांसह) एकुण पशुधन संख्या ही 59 हजार 138 एवढी आहे. लम्पीमुळे मृत पशुधनाची संख्या 8 एवढी झाली आहे. उपलब्ध लसमात्रा 2 लाख 60 हजार एवढी असून पशुपालकांनी घाबरून न जाता आपल्या पशुची स्वच्छता, गोठ्यातील स्वच्छता व पशुवैद्यकीय अधिकारी यांनी सांगितल्याप्रमाणे काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी केले आहे.
000000
वृत्त क्र. 1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
जवाहर नवोदय विद्यालयाची शिकवणी 4 नोव्हेंबर पासून सुरु होणार नांदेड, दि. 28 : - बिलोली तालुक्यातील शंकरनगर येथील जवाहर नवोदय विद्यालय...