Friday, January 18, 2019

विद्यार्थ्यांना सहज समजेल
असे प्रयोग शिक्षणात व्हावे
-         अशोक काकडे 
नांदेड, दि. 18 :- विद्यार्थ्यांना पाठ न करता सहज आकलन होईल, समजेल असे प्रयोग या शिक्षणाच्या वारी मध्ये पाहायला मिळाले याच दृष्टीने मुलांचे शाळेत शिक्षण व्हावे, असे मत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी आज व्यक्त केले. 16 ते 18 जानेवारी दरम्यान चांदोजी पावडे मंगल कार्यालयात आयोजित शिक्षणाची वारी या कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी डायटच्या प्राचार्या जयश्री आठवलेश्रीकृष्ण देशमुख, दिलीप बनसोडे, बंडू आमदूरकर, शोभा मोकले, नंदिनी पुणेकर, डॉ.अतुल चंद्रमोरे, उमेश नरवाडे, संजय शेळगे, संतोष केंद्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी काकडे म्हणाले, वारीच्या स्टॉल मधील नावीन्यपूर्ण प्रयोग शाळेत कशाप्रकारे करता येतील याचे शिक्षकांनी चिंतन करून तंत्रज्ञानातून विद्यार्थ्यांना ज्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत त्याचा प्रत्यक्षात वापर केला पाहिजे. आपण ज्या मुलांना घडवतो ती पंधरा वर्षानंतर मोठी झाली तर खऱ्या अर्थाने शिक्षक म्हणून आपला ऊर भरून येतो. तेंव्हा तो विद्यार्थी माझा आहेअसे शिक्षक आनंदाने सांगू शकतां असे सांगून शिक्षणाच्या वारीचे त्यांनी कौतुक केले. एखादी गोष्ट तावूनसुलाखून घेऊनच शिक्षक प्रतिक्रिया देतात ती खरी असते. वारी आयोजनाच्या सर्वच बाबींवर शिक्षक समाधानी असल्याचे शिक्षकांनी स्टॉलला भेट दिल्यानंतर सांगितले ही वारीची फलश्रुती आहे असे ते म्हणाले.
वारी आयोजनाची भूमिका डॉ.माणिक जाधव यांनी विशद केली. सर्व स्टॉलची थोडक्यात माहिती दिली. शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी वारी ही आमच्यासाठी संधी होती असे सांगून यजमानपद दिल्याबद्दल शासनाचे आभार मानले. शिक्षकांसाठी हे नवे प्रयोग दिशादर्शक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र पांडागळे यांनी तर आभार चंद्रकांत धुमाळे यांनी मानले. कार्यक्रमास शिक्षक संघटनेचे बालासाहेब  लोणेडॉ.जी.एम. सोनकांबळे, बालाजी पांडागळे व्यंकटेश चौधरी, डॉ.विलास ढवळे, ,राजेश कुलकर्णी मिलिंद ढवळे, बळी अंबुलगेकर यांच्यासह स्टॉलधारक सर्व शिक्षकपालक शिक्षण विभाग व जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण विकास संस्थेचे ज्येष्ठ अधिव्याख्याताअधिव्याख्याताकर्मचारी व शिक्षण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. 
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शेख नबील, नंदिनी पुणेकर, जी.आरराठोड  दत्तात्रय मठपती, सुभाष पवनेडी जी पोहणेशिरीषकुमार आळंदे, सुधीर गुट्टे, राम भारतीश्याम पांढरे, विकास ढवळे,डॉ.शेख मुसीर, स्वाती लांजेवार ,संघपाल झिनेडॉ.दादाराव सिरसाठ, वंदना जकाते आदींनी परिश्रम घेतले.
*****


जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू
नांदेड, दि. 18:-   जिल्ह्यात 17 जानेवारी पासून शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे, अशी  माहिती अप्पर जिल्हादंडाधिकारी यांनी कळविले आहे. 
आगामी काळात निवडणुका, सण, उत्सव आणि विविध प्रकारची संभाव्य आंदोलनाची शक्यता यांच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था कायम रहावी म्हणून अप्पर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात दि. 17 ते 31 जानेवारी 2019 रोजीच्या मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे.  त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याचा जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी , विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू राहणार नाही.
0000




बावरीनगर दाभड येथे
अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेनिमित्त
पोलीस अंमलदारांना अधिकार प्रदान
नांदेड, दि. 18 :- बावरीनगर दाभड येथे 20 ते 21 जानेवारी 2019 पर्यंत बौद्ध बांधवाच्यावतीने 32 व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.  या परिषदेस 3 ते 4 लाख बौद्ध भाविक व दलित बांधव मोठ्या प्रमाणात राज्य व परप्रांतातून येतात. त्यामुळे या कालावधीत कार्यक्रम शांततेत पार पाडावेत व त्यात कसल्याही प्रकारची बाधा येऊ नये व जिल्ह्यात शांतता रहावी यासाठी प्रभारी पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1959 चे कलम 36 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारान्वये 19 ते 21 जानेवारी 2019 च्या मध्यरात्री पर्यंत नांदेड जिल्ह्यातील पोलीस स्टेशन स्वाधिन अधिकारी अर्धापूर असलेले अमंलदार वरिष्ठ अधिकारी यांना मुंबई पोलीस अधिनियम कलम 36 मधील पोट कलम अ ते ई प्रमाणे पुढील अधिकार प्रदान केले आहेत.
प्रदान करण्यात आलेले अधिकार पुढीलप्रमाणे - रस्त्यावरील व रस्त्याने जाणाऱ्या मिरवणुकीतील किंवा जमावातील लोकांनी कशा रितीने चालावे व कोणत्या रितीने वागावे याविषयी निर्देश देणे. अशा कोणत्याही मिरवणुका या कोणत्या मार्गाने, कोणत्या वेळात काढाव्यात किंवा काढू नयेत असे मार्ग व अशा वेळा विहित करणे. सर्व मिरवणुकीच्या व जमावाच्या प्रसंगी व पुजा अर्चेच्या प्रार्थनास्थळाच्या सर्व जागेच्या आसपास पुजा-अर्चेच्या वेळी कोणत्याही रस्त्यावर किंवा सार्वजनिक जागा येथे गर्दी होणार असेल किंवा अडथळा होण्याचा शक्यता असेल अशा सर्व प्रसंगी अडथळा न होऊ देणे. सर्व रस्त्यावर किंवा रस्त्यामध्ये, सर्व धक्क्यावर किंवा धक्क्यामध्ये आणि सार्वजनिक स्नानांच्या, कपडे धुण्याच्या व उतरण्याच्या जागेच्या ठिकाणी व जागेमध्ये, इतर सार्वजनिक स्थळी, लोकांच्या जाण्या-येण्याच्या जागेमध्ये इतर कर्कष्य वाद्य वाजविण्याचे नियम करण्याबाबत व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सुचना देण्यासंबंधी. तसेच सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ किंवा कोणत्याही सार्वजनिक करमणुकीच्या ठिकाणी ध्वनिक्षेपकांचा उपयोग करण्याचे नियम करणे त्यावर नियंत्रण ठेवण्याबाबत.  मुंबई पोलीस अधिनियम 1959 चे कलम 33, 35, 37 ते 40, 42, 4345 या अन्वये दिलेल्या कोणत्याही आदेशास अधिन असलेले व त्यास पुष्टी देणारे आदेश देण्याबाबत.
हा आदेश लागू असेपर्यंत सदरच्या पोलीस स्टेशनचे परिसरात जाहीर सभा, मोर्चे, निदर्शने, पदयात्रा इत्यादी कार्यक्रम संबंधीत पोलीस फौजदार किंवा त्याच्या वरिष्ठांकडून तारीख व वेळ सभेची जागा, मिरवणुकीचा, मोर्चाचा मार्ग व त्यात दिल्या जाणाऱ्या घोषणा, पूर्व परवानगी शिवाय आयोजित करु नये. संबंधीत पोलीस अधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करावे. सदर जाहीरसभा, मिरवणुका, पदयात्रा यात समायोजित घोषणा सोडून ज्या घोषणांनी शांतता व सुव्यवस्थेला बाधा होऊ शकते अशा घोषणा देऊ नये. हा आदेश लग्नाच्या ठिकाणी, प्रेत यात्रेस लागू नाही. या आदेशाचे उल्लंघन केल्यास मुंबई कायदा 1959 चे कलम 134 प्रमाणे अपराधास पात्र ठरेल, असेही आदेश प्रभारी पोलीस अधीक्षक डॉ अक्षय शिंदे यांनी जारी केले आहेत.
000000


तंत्रनिकेतनच्या प्रवेश प्रक्रियेत यावर्षी बदल
- डॉ. वाघ
नांदेड, दि. 18:-  राज्यात तंत्रनिकेतनच्या विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेत वाढ होण्यासाठी पध्दतीत सुधारणा करुन 1 मे पासून नोंदणी सुरु होणार असल्याची माहिती तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. अभय वाघ यांनी येथील शासकीय तंत्रनिकेतनच्या अधिकारी वर्गास संबोधित करताना सांगितले. यावेळी सहसंचालक महेश शिवणकर उपस्थित होते. यावेळी श्री शिवणकर, संस्थेचे प्राचार्य डॉ. जी. व्ही. गर्जे यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. वाघ म्हणाले, देशाच्या विकासात युवावर्गास आणण्याची जबाबदारी लक्षात घेवून तंत्रनिकेतनातून नव्या तंत्रज्ञानाला पूरक अभ्यासक्रम बदल करण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण करतांना प्रत्यक्ष औद्योगिक प्रशिक्षण अंतर्भूत आहे. ग्रामीण, शहरी मुलांना स्वत:च्या पायावर उभे राहण्याची ताकद पदविका अभ्यासक्रमात असून पदविका अभ्यासक्रमाची उपयुक्तता जनसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांना पदविका अभ्यासक्रमासाठी उपलब्ध असलेल्या विविध शाखांची प्रवेश नियमाबद्दल माहिती दयावी. त्यासाठी  सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमुद केले. डॉ. वाघ यांनी संस्थेचा परिसर मध्यवर्ती असल्याने विकासाला मोठी संधी उपलब्ध असून नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत असताना त्यास पुरक शाखा सुरु कराव्यात, असेही सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून अभ्यासाविषयक सूचना दिल्या तसेच त्यांच्या अडचणी समजून घेतल्या.
यावेळी प्राचार्य डॉ. गर्जे यांनी संस्थेची माहिती दिली. कार्यक्रमास संस्थेचे अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभाग प्रमुख यंत्र प्रा. आर. एम. सकळकळे यांनी केले.
000000

युवकांनी विज्ञानासोबत
अध्यात्माची कास धरावी
- डॉ. कासराळीकर
नांदेड, दि. 18:-  मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त येथील शासकीय तंत्रनिकेतन येथे आयोजित व्याख्यानात बोलतांना डॉ. दीपक कासाराळीकर यांनी विज्ञान तंत्रज्ञानासोबतच अद्यात्माची कास युवा पिढीने धरणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले.
 डॉ. कासाराळीकर यांनी अधात्मात आजच्या विज्ञानाचे प्रतिबिंब आढळून येते, हे सखोल अभ्यास केल्यास समजू शकते, असे उदाहरणासह सांगितले. यावर्षी ग. दि. माडगूळकर, पु. ल. देशापांडे सुधीर फडके या मराठी थोर साहित्यिक संगीतकारांचे जन्मशताब्दी वर्ष असल्याने हे वर्ष मराठी भाषेसाठी माणसांसाठी विशेष महत्वाचे आहे असेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन संस्थेचे प्राचार्य डॉ. जी. व्ही. गर्जे यांनी मराठी भाषा संगणकीय भाषा होणे आवश्यक असून इंग्रजी भाषा जशी  सहजतेने संगणकात वापरता येवू शकते तशी मराठी वापरता आली पाहिजे याची जबाबदारी युवकांवर असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त विद्यार्थ्यांसाठी निबंध, वाद-विवाद, मराठी भाषा ज्ञान चाचणी, परभाषीय विद्यार्थ्यांसाठी मराठी हस्ताक्षर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिमखाना उपाध्यक्ष प्रा. डी. एम. लोकमनवार, प्रा. दमकोंडवार, प्रा. कंधारे, प्रा. मलिक, प्रा.कळसकर, प्रा. यादव, डॉ. जोशी, प्रा. मुधोळकर, सर्वश्री. जगताप, भरणे, झंपलवाड, पावडे यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन शिवराज लाकडे यांनी केले तर आभार प्रा.लोकमनवार यांनी मानले.
00000


राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी
शिष्यवृत्ती योजना परीक्षेची गुणाची यादी प्रसिद्ध
नांदेड, दि. 18 :- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचेमार्फत 9 डिसेंबर 2018 रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजनेंतर्गत परीक्षेत विद्यार्थ्यांना प्राप्त गुणाची यादी www.mscepune.in www.nmms.mscescholarshipexam.in या संकेतस्थाळवर पाहता येणार आहे.
विद्यार्थ्यांच्या नाव, जात, दिव्यांगत्वात, जन्म दिनांक आदी बाबत दुरुस्ती असल्यास दुरुस्ती बुधवार 23 जानेवारी 2019 पर्यंत परिषदेकडे nmms.msce@gmail.com या ईमेलवर शाळेमार्फत पाठविण्यात यावी. मुदतीनंतर येणाऱ्या अर्जाचा, दुरुस्तीचा विचार केला जाणार नाही. प्राप्त सर्व दुरुस्त्यांचा विचार करुन शिष्यवृत्तीस पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची निवड यादी परिषदेच्या संकेतस्थळावर यथावकाश जाहिर करण्यात येईल. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना कार्बनलेस उत्तरपत्रिका देण्यात आली असल्याने पेपरची गुणपडताळणी केली जात नाही.
भारत सरकारच्यावतीने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना राबविली जात आहे. आर्थिक मागास विद्यार्थ्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या प्रज्ञेची जोपासना तसेच त्यांचे बारावी पर्यंत शिक्षण पूर्ण व्हावे हा योजनेचा उद्देश आहे. प्रज्ञावान विद्यार्थ्यांना दरमहा शिष्यवृत्तीच्या स्वरुपात आर्थिक मदत करण्यात येते. ही शिष्यवृत्ती बारावी पर्यंत असून सन 2017-18 पासून शिष्यवृत्ती दरमहा 1 हजार रुपये प्रमाणे वार्षिक 12 हजार रुपये आहे. आठवीतील आर्थिक दुर्बल घटकातील ज्या पालकांचे उत्पन्न 1 लाख 50 हजार रुपयापेक्षा कमी आहे व जे विद्यार्थी अनुदानित शाळेत शिकत असतात त्या विद्यार्थ्यांना परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे या शिष्यवृत्तीचे वाटप होते, असे पुणे येथील महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेचे आयुक्त यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
00000



महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...